if you getting these signals from electric bike then change battery
सध्या भारतात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्या जात आहेत. परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे स्कूटरची बॅटरी खराब होते. बॅटरी खराब झाल्यावर कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊया.
जर तुमच्या स्कूटरमधून पुढील संकते मिळत असतील तर बॅटरी लगेच बदलावी.
सामान्य पेक्षा वेगळा आवाज
जर इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना नेहमीपेक्षा वेगळा आवाज येत असेल, तर ते स्कूटरच्या बॅटरीमध्ये समस्या असल्याचे लक्षण असू शकते. कधीकधी अंतर्गत शॉर्ट सर्किटचा धोका असतो आणि कधीकधी बॅटरी जास्त गरम होते तेव्हा नेहमीपेक्षा वेगळा आवाज येतो.
मंद प्रकाश
स्कूटर चालवताना दिव्यांची चमक लक्षणीयरीत्या कमी झाल्यास किंवा बॅटरी क्षमतेनुसार चार्ज होत नसेल तर बॅटरीचे आयुष्य संपत आले आहे समजावे. तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास लगेच बॅठरी बदलावी.
स्कूटर लवकर सुरू न होणे
इलेक्ट्रिक स्कूटर सुरू करण्यात अडचण येत असेल किंवा सुरू व्हायला खूप वेळ लागत असेल, तर स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही समस्या असू शकते. बॅटरीचे आयुष्य संपल्यामुळे स्कूटर लवकर सुरू होत नाही.
बॅटरी लीक होणे
अनेक वेळा जेव्हा स्कूटरची बॅटरी खराब होते तेव्हा ती एकतर फुगते किंवा लीक होते. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये स्कूटर आणि प्रवासी धोक्यात येऊ शकतात. कारण अशा स्थितीत बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका जास्त असतो. असे झाल्यास गंभीर दुखापतही होऊ शकते.
स्कूटर सारखी थांबणे
अनेक वेळा स्कूटर थोड्या अंतरावर जाऊन थांबत असेल तर बॅटरीचे आयुष्य संपले आहे समजावे. तसेच चार्जिंग करून देखील असा त्रास होत असेल तर इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.