थंड पाणी प्यायल्याने वजन वाढते का? तुम्ही ही गोष्ट अनेकदा ऐकली असेल आणि हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. खरंच थंड पाणी प्यायल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते का? मॉर्डन लाइफस्टाइल आणि चुकीच्या आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक रोज जिम किंवा व्यायाम करतात. असे बरेच लोक आहेत जे वजन कमी करण्यासाठी खाणे पिणे बंद करतात.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर थंड पाण्यापासून दूर राहा
दुसरीकडे, काही लोक आहेत जे त्यांच्या आहारात फक्त सॅलड किंवा उकडलेल्या भाज्या खातात. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या सर्व प्रयत्नांमुळे तुमच्या शरीरातील चरबी वितळण्याऐवजी वाढते. खरं तर, जेवल्यानंतर थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्यायल्यास वजन लवकर कमी होईल.
रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर जेवणानंतर गरम पाणी प्या. फ्रीजमधील पाणी बाहेर काढून लगेच सेवन करू नये कारण त्यामुळे पचनक्रिया बिघडते. यासोबतच अन्न पचण्यात अडचण येते आणि चयापचय स्लो होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही जिममध्ये घाम गाळत असाल तर थंड पाण्यापासून दूर राहा.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते. म्हणूनच अनेकांना ते सकाळी लवकर प्यायला आवडते. जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा ते पचनशक्ती वाढवते. आणि अन्न सहज पचते. तसेच ते चयापचय सक्रिय करते. गरम पाण्याने शरीरातील चरबी कमी होऊ लागते. शरीरातील चरबी सहज बर्न होते. रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास कॅलरीजचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.