Nail sakal
लाइफस्टाइल

Summer Nail Care: ...म्हणून अशी 'घ्या' उन्हाळ्यात आपल्या नखांची काळजी

उन्हाळ्यात लोक आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेतात. पण नखांची काळजी करणे आपण विसरून जातो.

Aishwarya Musale

उन्हाळ्यात लोक आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेतात. पण नखांची काळजी करणे आपण विसरून जातो. तीव्र सूर्यप्रकाश केवळ तुमच्या त्वचेलाच नाही तर तुमच्या नखांनाही नुकसान पोहोचवतो.

यामुळे तुमची नखं कमकुवत होतात. त्यामुळे नखं तुटायला लागतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमचे नखं मजबूत बनवायचे असतील तर तुम्ही यासाठी काही टिप्स देखील फॉलो करू शकता.

हे तुम्हाला तुमच्या नखांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल. उन्हाळ्यात तुमची नखं निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.

हायड्रेटेड राहिले पाहिजे

चांगल्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच ते तुमच्या नखांसाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी असलेल्या गोष्टी खा. यामध्ये काकडी, टरबूज आणि बेरी इत्यादींचा समावेश आहे. या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी आणि नखांसाठी खूप फायदेशीर आहेत.

अतिनील किरणांचा संपर्क टाळा

सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क टाळा. अतिनील किरणांमुळे तुमच्या त्वचेवर टॅन जमा होते. याने तुमची नखं देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे नखं कोरडी होतात. नखांचा रंग फिका पडू लागतो. नखांमध्ये क्रॅक दिसू लागतात. म्हणूनच, जर तुम्ही जास्त वेळ उन्हात घालवत असाल तर तुम्ही नखांसाठी सनस्क्रीन वापरू शकता.

नखं लहान ठेवा

बऱ्याच स्त्रियांना लांब नखं आवडतात. यासाठी विविध प्रकारचे नेल आर्ट केले जाते. पण उन्हाळ्यात वाढलेली नखं तुटण्याचा आणि नुकसान होण्याचा धोका खूप जास्त असतो. म्हणूनच या ऋतूत नखं लहान ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नखं नीटनेटके राहण्यासही मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Share Market Opening: फेडच्या निर्णयामुळे शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 100हून अधिक अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

Share Market Today: फेडच्या व्याजदर कपातीचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

SCROLL FOR NEXT