handbag Sakal
लाइफस्टाइल

Handbag: बाहेर पडताना महिलांची सोबती हॅण्डबॅग; स्टायलिश लूकमुळे मुलींमध्येही क्रेझ

Handbag: आकर्षक रंगांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग म्हणजे फॅशनप्रेमींचा आवडीचा विषय. फॅशनच्या जगात हॅण्डबॅग हा केवळ वस्तू नसून, तो मुलींच्या स्टाईलचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे.

सकाळ वृत्तसेवा

Handbag: हॅण्डबॅग स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. लेदर बॅग ही क्लासिक आणि टिकाऊ असल्याने फॉर्मल आणि इन्फॉर्मल वेशभूषेसोबत वापरली जाते. कॉलेजच्या मुलींमध्ये सीलिंग बॅगचा वापर जास्त प्रमाणात होतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू सहज कॅरी करता येतात. बॅगमध्ये वस्तू नीट राहतात. हॅण्डबॅगमुळे स्टायलिश लूक येतो.

फॅशनच्या जगात मॅचिंग कपड्यांसोबतच ब्रँडेड अॅक्सेसरीज वापरण्याकडे मुलींचा जास्त कल असतो. केसांची पिन, हॅण्डबॅग किंवा हातातली पर्स शूजपर्यंत सर्वच वस्तू मॅचिंग आणि ब्रँडेड वापरल्या जातात. मुलींच्या बाबतीत बोलायचे झाले, तर कॉलेज ते अगदी ऑफिसपर्यंत, शॉपिंग ते ट्रॅव्हलिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मुलीसाठी महत्त्वाचे काही असते, तर ते म्हणजे हॅण्डबॅग. संभाजीनगरातही मुलींमध्येही हॅण्डबॅगची क्रेझ दिसून येते.

आकर्षक रंगांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग म्हणजे फॅशनप्रेमींचा आवडीचा विषय. फॅशनच्या जगात हॅण्डबॅग हा केवळ वस्तू नसून, तो मुलींच्या स्टाईलचा आणि व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. तो प्रत्येकाच्या पेहरावात आत्मविश्वासाची झलक दर्शवितो.

मग ती ऑफिसला जात असेल, मैत्रिणीसोबत बाहेर पडत असेल किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होत असताना हातात असलेली हॅण्डबॅग आपला संपूर्ण लूकला संपूर्णता देतो. घराबाहेर पडताना हमखास प्रत्येक महिलेची सोबती असते ती म्हणजे हॅण्डबॅग किंवा पर्स. केवळ मोबाईल, पैसे, इतर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वस्तू ठेवण्यासाठी नाही तर ‘स्टाइल स्टेटमेंट’ मेंटेन ठेवण्यासाठीदेखील वापरतात.

म्हणून ब्रँडेड बॅग, हॅण्डमेड पर्स बाजारात उपलब्ध आहेत. पर्स, हॅण्डबॅग, बटवा, झोळी, पिशवी, क्लच, स्लॅक असे एक ना अनेक प्रकारचे बाजारात लहान-मोठे डिझाइन उपलब्ध असल्याने मुली आपल्या आवडीनुसार आणि बजेटमध्ये बसणाऱ्या बॅग खरेदी करतात.

कमरेला लटकणाऱ्या बॅग प्रिय

कॉलेजच्या मुलींमध्ये हॅण्डबॅग, सीलिंग बॅग, क्लच याबरोबरच वेस्टर्न बॅगची क्रेझ अधिक आहे. सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या कमरेला लावण्याऱ्या बॅगची भरपूर मागणी आहे.

हॅण्डबॅगचे प्रकार

क्लच: ही एक इनोव्हेशन बॅग आहे. ज्याला बेल्ट नसतो, दिसायला आकर्षक असते. यात पैसे, कार्ड ठेवता येते.

टोट बॅग: ही बॅग सर्व महिलांची आवडती असते. बॅग मोठी असते, यात आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू ठेवून फिरू शकता.

बकेट बॅग: ही बॅग आकाराने बकेटसारखी दिसते. पाठीवर व एक साइड वापरला येते.

बटवा: बटवा हा पारंपरिक आहे. महिला साडी, घागरा या आऊटफिटवर हा वापरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT