1947 पासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या या विशेष प्रसंगी, लोक एक आठवडा आधीच एकमेकांना संदेश पाठवू लागतात.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर तुम्ही हा लेख जरूर वाचा कारण या लेखात आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीपर संदेश घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया.
1. स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
2. तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो
किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने
3. चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
4. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे
5. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
6. वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
7. “जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती !”
8. रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”
9. “गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”
10. “वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.