Independence Day 2024 : भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यापूर्वी, ब्रिटिशांनी तब्बल १५० वर्षे भारतावर राज्य केले होते. या जुलमी राजवटीला संपुष्टात आणण्याचे काम भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी केले.
दरवर्षी १५ ऑगस्टला देशभरात ध्वजारोहण, परेड आणि देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह किंवा मित्र-मैत्रिणींसोबत भारतातील काही ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊ शकता. कोणती आहेत ती ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही तुमच्या कुटुंबासह दिल्लीच्या लाल किल्ल्याला भेट देऊ शकता. हे एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच लाल किल्ल्यावरून भाषण केले होते. या लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा मोठा उत्सव साजरा केला जातो. लाल किल्ल्याशिवाय तुम्ही दिल्लीतील इंडिया गेटलाही भेट देऊ शकता.
दिल्लीतील लाल किल्ल्याव्यतिरिक्त तुम्ही यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला कुटुंबियांसह उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला नक्की द्या भेट.
प्रयागराजमध्ये चंद्रशेखर शेखर आझाद पार्क आहे. १९३१ मध्ये चंद्रशेखर आझाद ब्रिटिश सैनिकांशी लढले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले.
वाघा बॉर्डरवर तुम्ही स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करू शकता. या बॉर्डरवर स्वातंत्र्यदिन साजरा करणे हा तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण असेल. ही वाघा बॉर्डर भारत आणि पाकिस्तानमधील महत्वाचे ठिकाण आहे.
वाघा हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर वसलेले एक गाव आहे. १५ ऑगस्टच्या १ दिवस आधी १४ ऑगस्टला या ठिकाणी बीटिंग रिट्रिट सेरेमनी होते. ही सेरेमनी पाहण्यासारखी असते. देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी कित्येक लोक या ठिकाणी दररोज भेट देतात.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. साबरमती हे ठिकाण गुजरातमध्ये स्थित असून या साबरमती आश्रमातूनच गांधीजींनी दांडीयात्रेला सुरूवात केली होती.
हा आश्रम आपल्या देशातील खास ऐतिहासिक वारशांपैकी एक आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.