Independence Day 2024  esakal
लाइफस्टाइल

Independence Day 2024 : डोक्यावरील पदर कमरेला खोचून पुढे आल्या या महिला, त्यामुळेच स्वातंत्र्याच स्वप्न साकारणं सोपं झालं

Women Freedom Fighters : आज आपण अशाच काही देशभक्त असलेल्या महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी प्राणांची बाजी लावून देश स्वतंत्र्य करण्यात योगदान दिलं

सकाळ डिजिटल टीम

Women freedom fighters of india :

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा भारत आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटीशांच्या जाळ्यातून भारताला बाहेर काढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आणि आजही पाकिस्तानसारख्या देशातील लोक आपल्यावर सत्ता गाजवण्याचे स्वप्न पाहतात. तेव्हा अनेक सैनिकांना वीरगती प्राप्त होते.

भारताचा स्वातंत्र्यसंग्राम जितका भगतसिंग, सुभाषचंद्र बोस या शहीदांच्या रक्ताने माखलेला आहे. त्याच पद्धतीने भारतातील काही महिलांचे मळवटही ब्रिटीशांच्या रक्ताने भरलेले होते. कारण, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात जितका वाटा पुरूषांचा होता तितकाच तो महिलांचाही होता.

आज आपण अशाच काही देशभक्त असलेल्या महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपल्या प्राणांची तर बाजी लावलीच. पण कोणी आपल्या पतीलाही मारण्यास कमी केले नाही. तर कोणी देशाचे प्रतिक तिरंगा परदेशात फडकवला. जाणून घेऊयात याबद्दल

आज भारताला स्वतंत्र्य होऊन ७८ वर्ष झाली. आजच्या या खास दिनी भारतातील अशा काही महिलांबद्दल माहिती घेऊयात. ज्यांनी भारतमातेला स्वतंत्र्य करण्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. 

परदेशात तिरंगा फडकावणाऱ्या – भीकाजी कामा (Bhikaiji Cama)

भिकाजी कामा या देशातील स्वातंत्र्य संग्रामात अग्रभागी होत्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भिकाजी कामा यांना लोक मॅडम कामा म्हणून ओळखायच्या. विशेष म्हणजे परदेशात तिरंगा फडकावणाऱ्या मॅडम कामा या पहिल्या महिला होत्या. ३३ वर्ष भारतापासून दूर राहून देखील भारतभुमीला स्वतंत्र्य करण्याच्या त्यांच्या स्वप्नात खंड पडला नव्हता. मॅडम कामा यांचे धाडस पाहूनच इतर महिलांना देखील हिम्मत मिळाली.

भीकाजी कामा| Bhikaiji Cama

बेगम हजरत महल (Begum Hazrat Mahal)

बेगम महल यांना राणी लक्ष्मीबाई यांच्या समक्षक म्हणून ओळखले जाते. १८५७ च्या लढाईत ग्राणिम जणतेला स्वतंत्र्याची आणि त्यांच्या ताकदीची जाणीव करून देण्यात बेगम महल यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी ब्रिटीश राजवटीविरोधात आंदोलन पुकारले. त्यांच्यासोबत येण्यासाठी लोकांना बेगम महल यांनी प्रोत्साहीतही केले.

बेगम हजरत महल | Begum Hazrat Mahal

नीरा आर्या (Nira Arya)

नीरा आर्या हे नाव फार कमी लोकांना माहीती आहे. देशासाठी स्वत:चे प्राण देण्यातही मागे-पुढे न पाहणाऱ्या नीरा आर्या यांनी देशासाठी त्यांच्या पतीचेही प्राण घेतले. नीरा आर्या हे नाव सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत तुम्ही कधीतरी ऐकले असेल. नीरा या बोस यांच्या राष्ट्रीय सेनेच्या पहिल्या महिला खबरी होत्या.

देशविरोधी कारवाई केल्याने नीरा यांनी त्यांच्या पतीची हत्या केली. पण हे प्रकरण इथेच थांबले नाही. ब्रिटीशांनी नीरा यांना अंदमान निकोबार येथे नीरा यांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. या कारावासात नीरा यांना अनेकवेळा ऑफर देण्यात आली की, सुभाष चंद्र बोस यांच्या ठिकाणाबद्दल, पुढील रणनितीबद्दल माहिती दे आम्ह तुला जिवंत सोडू, पण नीरा यांनी तोडांतून अवाक्षरही बाहेर न काढता अत्याचार सहन करणे पसंत केले.

नीरा आर्या | Nira Arya

अरूणा आसफ अली (Aruna Asaf Ali)

१९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनात अरूणा अली यांचा सहभाग होता. त्या एक स्वातंत्र्यसेनानी आणि राजकीय नेत्या होत्या. १९३२ मध्ये सविनय अवज्ञा आंदोलनात सहभाग घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

अरुणा असफ अली यांनी काकोरी रेल्वे बॉम्बस्फोटाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आणखी धगधगत बनवलं. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाल्याचे संकेत देण्यासाठी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रध्वज फडकावला.

अरूणा आसफ अली | Aruna Asaf Ali

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT