Independence Day 2024  esakal
लाइफस्टाइल

Independence Day 2024: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ट्रॅडिशनल अन् वेस्टर्न कपड्यांचा साधा अनोखा मेळ, फॉलो करा ‘या’ सोप्या फॅशन टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

Independence Day 2024 : यंदा आपला भारत देश १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या स्वातंत्र्यदिनाची लगबग आतापासूनच पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीमधुन आपल्या सर्वांची सुटका झाली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरातील लोक अनेक प्रकारे हा स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

या दिवशी शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, ऑफिसमध्ये देशभक्तीवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी अनेक जण तिरंग्यामध्ये रंगून जातात. तिरंगा थीमवर आधारित असलेले कपडे परिधान करण्यावर अनेकांचा भर असतो.

तिरंग्याच्या बांगड्या, साडी, स्कार्फ, कुर्ती, ड्रेस इत्यादी गोष्टी परिधान करण्यात महिला आघाडीवर असतात. यंदाचा स्वातंत्र्यदिन तुम्हाला खास बनवायचा असेल तर, आज आम्ही तुम्हाला काही फॅशन टिप्स देणार आहोत. त्या टिप्सच्या मदतीने तुम्ही स्वातंत्र्यदिन अधिक उत्साहात साजरा करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात त्या टिप्स.

स्वदेशी कपडे

स्वातंत्र्यदिनी तुम्ही अशा प्रकारचे कपडे घाला की, ज्यामध्ये स्वदेशीचा भाव दिसून येईल. जसे की, तुम्ही हातामागावरील कपडे, खादीचे कपडे, तागाचे काप़ड, कापूस आण रेशीम इत्यादी प्रकारचे कपडे १५ ऑगस्टला परिधान करू शकता.

Shilpa Shetty

खास करून तुम्ही ज्या राज्यात राहता, तिथल्या हातामागावरील कपडे घाला. या कपड्यांमध्ये तुम्हाला आरामदायक वाटू शकेल आणि तुमचा लूक ही खास दिसेल.

एव्हरग्रीन पांढरा रंग

१५ ऑगस्टला अनेक महिलांचा आणि पुरूषांचा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्यावर भर असतो. पांढऱ्या रंगामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पॅटर्न्स आणि कपडे देखील मिळू शकतील. तुम्ही साडी किंवा ड्रेस देखील कॅरी करू शकता.

Independence Day 2024

यावर केशरी-हिरव्या रंगाची ज्वेलरी आणि हातात बांगड्या अवश्य घाला. यामध्ये तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल.

तिरंगी स्वरूपातील बांगड्या

१५ ऑगस्टच्या दिवशी तुम्ही ज्या प्रकारचे कपडे परिधान कराल त्यावर ट्राय कलर अर्थात तिरंगी स्वरूपातील बांगड्या अवश्य घाला.

Independence Day 2024

हिरव्या, केशरी अन् पांढऱ्या रंगाच्या बांगड्यांमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या व्हरायटी मार्केटमध्ये पाहायला मिळतील.

क्रिएटिव्ह स्टाईल

जर तुम्हाला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी थोडा वेगळा लूक करायचा असेल, तर तुम्ही थोडे क्रिएटिव्ह व्हा. केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा वापर करून तुम्ही तुमचा लूक डिझाईन करू शकता. यासाठी तुम्ही या रंगांचे पेस्टल व्हेरियंट्स देखील निवडू शकता.

तसेच, वेस्टर्न आणि एथनिकसोबत मेळ साधून कपडे स्टाईल करू शकता. उदा. हिरव्या लांब स्कर्टवर तुम्ही पांढरा किंवा केशरी क्रॉप टीशर्ट परिधान करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: 'आम्ही तुम्हाला सोडणार नाही, बँक गॅरंटी जप्त करू अन् ब्लॅक लिस्टमध्ये टाकू'; नितीन गडकरी कुणावर चिडले?

IND vs BAN 1st Test : Rishabh Pant च्या दमदार खेळीला 'ब्रेक' अन् यशस्वी जैस्वालची फिफ्टी; दोघांचं होतंय कौतुक...

Upendra Limaye : काय सांगता! अभिनेता उपेंद्र लिमये मिरवणुकीत वाजवतोय ताशा? हा व्हिडिओ पाहून नेटकरीही झिंगले

Latest Marathi News Live Updates : वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिका सारखी पद्धत आणण्याचा हा प्रयत्न - जयंत पाटील

प्रियकराचा बदला घेण्यासाठी एअरलाइन क्रू मेंबरला संपवलं; लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर, काजल खत्री नक्की आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT