Independence Day Special Recipe: Sakal
लाइफस्टाइल

Independence Day Special Recipe: स्वातंत्र्यदिन होईल खास, घरीच बनवा 'हे' तिरंगी गोड पदार्थ

पुजा बोनकिले

Independence Day Special Recipe:  दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. देशभरातील सर्व लोक एकत्र येऊन हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे प्रत्येक भारतीय 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्यदिन खास बनवायचा असेल तर घरीच तिरंग्याच्या रंगात गोड पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना खायला देऊ शकता. हे सर्व पदार्थ बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.

laddu

तिरंगा लाडू

स्वातंत्र्यदिनानिमित्त तिंरगी लाडू तयार करू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंगाचे लाडू बनवून एकत्र प्लेटमध्ये सर्व्ह करावे.त्यावर सुकामेवा किंवा पिस्ता टाकून सजावट करू शकता.

barfi

तिरंगा बर्फी

तिरंगा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हा मावा तयार करून तीन वेगळे बाग करायचे आहे. त्या तिन भागांमध्ये खाण्याचा हिरवा आणि केशरी रंग मिक्स करावा आणि एक पांढराच राहू द्या. हे भाग एकत्र करून बर्फी तयार करू शकता,

roll

तिरंगा रोल

तुम्ही घरीच चवदार तिरंगा रोल बनवू शकता. यासाठी खोबऱ्या खिस, साखर आणि खाण्याचा रंगा वापरावा लागेल. हा तिरंगा रोल तयार झाल्यावर त्यावर सिल्व्हर वर्क लावू शकता. हे देखील चांगले दिसेल.

cup cake

स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्याकडे केक बनवायला वेळ नसेल तर कप केक बनवून हा दिवस खास बनवू शकता. कप केक खायला देखील चवदार लागतो आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही आवडीनुसार सुकामेवा टाकून सजावट करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT