Indian Citizenship: Sakal
लाइफस्टाइल

Indian Citizenship : भारतीय सोडतायेत आपलाच देश, ही आहेत यामागची महत्त्वाची कारण...

Indian Citizenship: भारतीय नागरिकत्व सोडण्यामागे कोणती महत्वाची कारणे आहेत हे सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया.

पुजा बोनकिले

Indian Citizenship: दरवर्षी भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये तब्बल 2.16 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात स्थायिक झाले आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्या प्रश्नाला उत्तर देत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली.

एवढ्या मोठ्या संख्येने लोक आपले भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का?, असाही प्रश्न आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी उपस्थित केला होता.

विदेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय अमेरिका, लंडन, फ्रान्स, युएई, सिंगापूर, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांची निवड करतात. गेल्या 5 वर्षात अनेक लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं असून ते इतर देशाचे नागरिक झाले आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, हे जाणून घेऊयात.

कर सवलत आणि व्यावसायिक वातावरण

विदेशात विविध कर सवलत आणि व्यवसाय करण्यासाठी विविध सुविधा देतात. यामुळे भारतीय लोकांचे विदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

नोकरीच्या अनेक संधी

अनेक भारतीय कामासाठी विदेशात गेले आहेत. तेथील भरपुर पगार , कामाचे चांगले वातावरण पाहून तेथेच स्थायिक होतात. तसेच कामाचे तास ठरलेले असल्याने भारतीयांचे विदेशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाणे अधिक आहे.

उत्तम जीवनशैली

भारतीयांना विदेशातील जीवनशैली आकर्षित करते. विदेशात मिळणाऱ्या सुविधांचा जीवनशैलीवर देखील सकारात्मक परिणाम होतो. यामुळे देखील भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर देश सोडून जात आहे.

पासपोर्ट

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२४ च्या अहवालानुसार भारतीय पासपोर्ट ८२ व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टचा वापर करून फक्त ५८ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळतो. पण जगातील ज्या देशांत भारतीय स्थायिक आहेत त्यांचे पासपोर्ट भारतीयांपेक्षा जास्त मजबूत आहेत. जसे की अमेरिकन पासपोर्ट १८६देश आणि ब्रिटिश पासपोर्ट १९० देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश देतो. तसेच फ्रान्सचे १९२ , युएईचे १८५ ऑस्ट्रेलियाच्या पासपोर्टवरून १८९ देशात लोक व्हिसाशिवाय जाऊ शकतात.

दुहेरी नागरिकत्व नसणे

भारतात एकेरी नागरिकत्व आहे. भारत सोडून जाण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण भारताने दुरेही नागरिकत्वाचा नियम सुरू केल्यास देश सोडून जाण्याचा आकडा कमी होऊ शकतो. विदेशातील नागरिकत्व असलेल्या भारतीयांसाठी ओसीआय कार्ड (OCI) उपलब्ध आहे. याचा अर्थ व्यक्ती भारतात राहू शकतो, काम करू शकतो तसेच आर्थिक व्यवहार देखील करू शकतो. पण मतदान करू शकत नाही, सरकारी नोकरी करू शकत नाही, जमीन विकत घेऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT