indira gandhi sakal
लाइफस्टाइल

Indira Gandhi Birth Anniversary: इंदिरा गांधींच्या साड्या संपूर्ण जगासाठी होत्या 'स्टाईल स्टेटमेंट'! आजही आहेत ट्रेंडमध्ये

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही त्यांच्या लूक आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी खूप प्रसिद्ध होत्या.

Aishwarya Musale

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही त्यांच्या लूक आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी खूप प्रसिद्ध होत्या. हा तो काळ होता जेव्हा इंदिरा गांधी त्यांच्या हेयरकटपासून हॅन्डलूमच्या साड्यांपर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या. इंदिरा गांधींच्या राजकीय प्रवासातही या साड्यांचा फार महत्त्वाचा वाटा होता.

कारण इंदिरा गांधी अशा कुटुंबातील होत्या ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली होती. त्याच काळापासून इंदिरा गांधी सुद्धा हॅन्डलूमच्या साड्या नेसत असत पण त्यांच्या साड्या फक्त कॉटन किंवा खादीपुरत्या मर्यादित नव्हत्या. बनारसी सिल्क वगैरेंचाही त्यांच्या साड्यांमध्ये समावेश होता.

त्यांच्या फॅब्रिकमध्ये नेहमीच काहीतरी वेगळे असायचे. इंदिरा गांधींच्या साड्यांमध्ये त्यावेळी जॉर्जेट फॅब्रिकचा समावेश नव्हता. चरखा विणलेल्या साड्या हे त्यांचे स्टाईल स्टेटमेंट होते आणि महिला नेत्या आजपर्यंत हे स्टाइल स्टेटमेंट फॉलो करत आहेत.

काही खास फंक्शन्समध्ये त्या सिल्कच्या साड्यांमध्ये दिसल्या होत्या. आता इथे एक नजर टाका. एका फोटोत इंदिरा गांधी गुलाबी साडी नेसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यासोबत उभ्या आहेत आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये त्या त्यांचे स्टाइल स्टेटमेंट दाखवत आहेत. दुसऱ्या फोटोत इंदिरा गांधी बनारसी सिल्कची साडीमध्ये फ्रेंच एम्बेसेडर जॅक शिराक यांच्यासोबत दिसत आहेत.

इंदिरा गांधी नेहमी अशा प्रकारच्या साड्या नेसत असत-

इंदिरा गांधींना हॅन्डलूमच्या साड्या आवडत. हे त्यावेळचे भारतीय काँग्रेसचे स्टाईल स्टेटमेंट होते. त्यांची स्टाईल त्यांच्या साडीतून दिसत होती. आता तुम्हीच विचार करा की त्या काळात इंदिरा गांधींच्या प्रत्येक रॅलीसाठी, प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक फंक्शनसाठीच्या साड्या, त्यांच्या साड्यांच्या प्रिंट्स वगैरे सगळंच परफेक्ट होतं.

त्या काळात इंदिरा गांधी जेव्हा कधी सभा घ्यायच्या किंवा भाषण करायच्या तेव्हा त्या पदर डोक्यावर ठेवत. त्यावेळी भारतीय राजकारणात महिला नेत्यांची कमतरता होती, पण तरीही इंदिरा गांधींचे हे स्टेटमेंट न बोलता आलेला नियम बनला होता.

अशी साडी कधी नेसली नव्हती-

इंदिरा गांधी अशा कुटुंबातल्या होत्या ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या. तरीही इंदिरा गांधींनी साड्यांच्या बाबतीत स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी हेवी एम्ब्रॉइडरी, जॉर्जेट, शिफॉन किंवा ब्रोकेड बॉर्डर असलेल्या साड्या नेसल्या नाहीत. त्यांच्या साड्या, त्यांच्या साड्यांचे पॅटर्न, प्रत्येक गोष्टीत भारतातील गावांची झलक दिसून आली.

कोणत्याही दागिन्याशिवाय साडी नेसत-

इंदिरा गांधी कोणत्याही दागिन्याशिवाय साडी नेसत असत. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात कोणतेही दागिने घातले असले तरी ते अगदी साधे असेल. आता इथे एक नजर टाका. इंदिराजी पिवळ्या साडीत अतिशय सुंदरपणे बसल्या आहेत. कोणत्याही दागिन्याशिवाय.

टी-शर्टसह साडी-

इंदिरा गांधींना त्यांच्या काळात खूपच अनोखी फॅशन करताना पहिले आहे. आता टी-शर्टसह साडीचे हे कॉम्बिनेशन तुम्हीच पहा.

इंदिरा गांधींनीही अनेक रंगांचे कपडे घातले आहेत. आता पहा इंदिरा गांधींनी राखाडी स्वेटरवर जांभळ्या रंगाची साडी कशी नेसली होती.

इंदिरा गांधींच्या साड्या नेहमीच फॅशन स्टेटमेंट होत्या आणि राहतील. त्यांच्या साड्यांची फॅशन आजही तशीच आहे. त्यांनी कधीही साडी नेसण्याची शैली बदलली नाही. त्यांच्या सिल्कच्या साड्या पार्टीत खूप छान दिसत होत्या आणि त्यांच्या कॉटन किंवा खादीच्या साड्या खूप छान दिसत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT