Eye  Sakal
लाइफस्टाइल

Interesting Fact : iphone सोडा, तुमच्या डोळ्यातच आहे 576 मेगापिक्सलचा कॅमेरा!

अनेकदा आपण या फोनचा कॅमेरा चांगला त्या फोनचा कॅमेरा चांगला अशा चर्चा आपण ऐकत असतो

सकाळ डिजिटल टीम

Interesting Fact About Human Eye : अनेकदा आपण या फोनचा कॅमेरा चांगला त्या फोनचा कॅमेरा चांगला अशा चर्चा आपण ऐकत असतो किंवा त्या संदर्भातील जाहिरात बघत असतो. एवढेच नव्हे तर, नवीन मोबाईल विकत घेताना आपल्यापैकी सर्वच जण बाकी गोष्टींपेक्षा कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे हा प्रश्न आवर्जून विचारत असतो. मात्र, आज आपण आपल्या डोळ्यांबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्टबद्दल जाणून घेणार आहोत.

तुमच्यापैकी किती जणांच्या मनात आपले डोळे किती मेगा पिक्सलचे आहेत असा प्रश्न आला आहे. आपले डोळेदेखील कॅमेरासारखे असतात. मानवी शरीर जितके अधिक जटिल आहे तितकेच ते अधिक मनोरंजकदेखील आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि कार्य आहे. त्यापैकी एक डोळा हा एक सर्वात महत्वाचा अवयव आहे. यातूनच आपण सर्वजण सुंदर जग पाहू शकतो.

नैसर्गिक देणं असलेले आपले डोळे तसे बघितल्यास डिजिटल कॅमेऱ्यासारखा आहे. जर डोळ्यांना कॅमेऱ्याच्या क्षमतेनुसार बघितले गेल्यास आपला डोळा 576 मेगापिक्सेलपर्यंतचे दृश्य दाखवते. म्हणजेच, डोळा एका वेळी 576 मेगापिक्सेल क्षेत्र पाहू शकतो.

आपला मेंदू एकाच वेळी हे सर्व प्रोसेस जरी करू शकत नसला तरी, समोर दिसणारे चित्र संपूर्ण नव्हे तर, त्यातील काही भाग अगदी स्पष्ट आणि हाय डेफिनेशनमध्ये सहज बघू शकतात. संपूर्ण दृश्य अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी आपल्याला आपले डोळे वेगळ्या पद्धतीने केंद्रित करावे लागतात.

वयानुसार होतो परिणाम

माणसाचे वय जसे वाढत जाते त्याप्रमाणे व्यक्तीच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम होत असतो. वयामानानुसार शरिरातील इतर अवयवांप्रमाणे डोळा आणि त्यातील महत्त्वाचा असणारा पडदा कमकुवत होऊ लागतो. त्यामुळे वृद्धापकाळात अनेकांना कमी दिसू लागते.

सामान्य कॅमेरा किती मेगापिक्सेलचा?

सामान्यतः DSLR कॅमेरामध्ये 400 मेगापिक्सेलपर्यंतचे फोटो घेण्याची क्षमता आहे. तर, आज बाजापेठेतील उपलब्ध मोबाईलमध्ये 48, 60 आणि त्याहूनही अधिक मेगापिक्सेलचे कॅमेरे असणारे मोबाईल उपलब्ध आहेत. मात्र, बाजारपेठेतील मोबाईलचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे हा प्रश्न येथून पुढे विचारण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या 576 मेगापिक्सल असणाऱ्या आपल्या डोळ्यांना कसं निरोगी ठेवता येईल याकडे आवर्जून लक्ष द्या. जेणे करून उतारवयातही तुम्ही चशम्याशिवाय सर्व गोष्टी अगदी सहजपणे पाहण्याचा आनंद घेऊ शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यावधी रुपयांचं चरस जप्त

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT