Interesting Facts esakal
लाइफस्टाइल

Interesting Facts: अंडी घालणारं कबुत्तर स्तनांशिवाय आपल्या नवजात पिल्लांना दूध पाजतात, कसे? जाणून घ्या

कबुत्तराला स्तन नाही पण तरीही ते आपल्या पिल्लांना दूध पाजतं.

धनश्री भावसार-बगाडे

How Pigeon Feed Milk Without Breast : निसर्ग आपल्या आसपासच असला तरी त्यात बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला माहितही नसतात. सगळेच प्राणी आणि पक्षी सस्तन नसतात हे आपण शाळेतच शिकलेलो असतो. त्यामुळे जे सस्तन नसतात ते अंडी घालतात हे आपल्याला माहित आहे. ते आपल्या पिल्लांना दूध पाजू शकत नाहीत. पण कबुत्तर हा पक्षी याला अपवाद आहे असं म्हणायला हरकत नाही.

याला स्तन नसून अंडी घालणारा हा पक्षी आपल्या पिल्लांना दूध पाजतो हे तुम्हाला माहित आहे का? हे कसं शक्य आहे, जाणून घेऊया.

कबुत्तराचं पिल्लू अंड्यातून बाहेर पडल्यावर पुढील तीन दिवस ते पिल्लांना दूध पाजते. मादी आणि नर कबुत्तरांच्या घशात अन्न साठवण्याची थैली असते. ज्याला पीक म्हणतात. यातून एक दूधासारखा पांढरा द्रव पदार्थ बाहेर पडत असतो. मुलाच्या जन्मानंतर पहिले २८ दिवस कबुत्तर त्याच्या चोचीने मुलांना तो पांढरा द्रव खायला घालत असतो.

अजून असे कोणते पक्षी पिल्लांना दूध पाजतात?

पेंग्वीन

पेंग्वीनदेखील सस्तन नाही. तरीही ते पिल्लांना दूध पाजतात. पण यांच्यात नर पेंग्वीन पिल्लांना दूध पाजतात. नर हे अंड्यांची काळजी घेत असतात. त्यामुळेच ते आपल्या पीक मध्ये फॅटी द्रव तयार करतात. तर मादी अन्न शोधासाठी बाहेर पडते आणि नर पेंग्वीन अंड्यांची आणि त्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांची काळजी घेतात.

फ्लेमिंगो

या यादीत फ्लेमिंगो हा पक्षीपण आहे. यात नर आणि मादी असे दोन्हीही पीक मध्ये दूध तयार करतात. ते आपल्या चोचीच्या सहाय्याने पिल्लांना देतात. पण फ्लेमिंगोचं दूध मात्र लाल रंगाचे असते. कारण या पक्षाचा रंग लाल असतो.

ओशन बीटल झुरळं

ओशन बिटल किंवा पॅसिफीक बीटल झुरळाच्या अळ्या मादीच्या आत वाढतात. यावेळी अळ्या जे द्रव वापरतात त्याला वैज्ञानिक दूध म्हणतात. अभ्यासकांच्या मते पृथ्वीवर यापेक्षा जास्त कॅलरी असलेलं दूसरं काही नाही.

डिस्कस मासे

डिस्कस हे रंगीबेरंगी मासेही आपल्या पिल्लांसाठी दूध बनवतात. नर आणि मादी दोघेही त्यांच्या त्वचेपासून दुधासारखे स्लाईम तयार करतात. जन्मानंतर तीन आठवडे पिल्लांना हे स्लाईम दिले जाते.

पांढरे शार्क

पांढऱ्या शार्कच्या शरीरातही दूध तयार होते. ग्रेट व्हाईट शार्कची पिल्लं गर्भाशयातच वाढतात. पण नाळ नसल्याने पोषण त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. म्हणून त्यांच्या गर्भाशयातच दूधासराखे द्रव तयार होते. ज्यामुळे गर्भाला आवश्यक पोषण मिळते आणि त्यांचा विकास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT