International Air Day: निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ हवा आवश्यक आहे. वातावरणातील हवा स्वच्छ असेल तर कोणताही स्वसनासंबंधित आजार उद्भवणार नाही. दरवर्षी १५ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय हवा दिन म्हणून साजरा केला जातो. हवा शुद्ध ठेवण्यासाठी घराच्या सभावताली कोणती झाडे लावावी हे जाणून घेऊया.
हे झाड दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साइड सोडतात. हे एकमेव असे झाड आहे जे दिवसातून २४ तास ऑक्सिजन देते. प्रचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. तसेच या झाडांची पाने देखील औषधी गुणांनी भरलेली आहे.
अशोकाचा झाड सर्वांत जास्त ऑक्सिजन देणार्या झाडांमध्ये समावेश होतो. तसेच विविध प्रकारच्या आजाराला हे झाड उपयोगी आहे. त्यामुळे ही झाडे घर किंवा ऑफिस, विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात दिसतात.
या झाडाची पाने कडू असल्याने कडूनिंब म्हणतात. या झाडामुळे प्रदूण कमी होण्यास मदत मिळते. हे झाड बारामाही हिरवेगार राहते. या झाडाच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण असते. या झाडाचे पान ,फळ, फुल , साल, खोड सर्व औषधीयुक्त आहे.
वडाच्या झाडाची देखील प्रचीन काळापासून पुजा केली जाते. या झाडाला हिंदू धर्मात देखील खुप महत्व आहे. वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते. तसेच भरपुर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे महत्वाचे काम हे जाढ करते.
हे झाड सर्वात लवकर वाढणारे झाड आहेय बांबूचे झाड हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. इतर झाडांच्या तुलनेच बांबूचे झाड ३० टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करते.
तुळशीच्या झाडाला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. या झाडाचे पान, देठ, मंजुळा सर्व औषधीयुक्त आहे. शास्त्रज्ञांच्या मते तुळशीचे झाड दिवसातले वीस तास ऑक्सिजन देते. यामुळे तुळशीचे झाड अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.