International Yoga Day 2024 : आजकाल अनेक जण फिट राहण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, योगा आणि वर्कआऊट्स करतात. जेणेकरून शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
मानसिक आणि शारिरीक आरोग्य तंदूरूस्त ठेवण्यासाठी तुम्ही योगाची मदत नक्कीच घेऊ शकता. आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटी त्यांच्या योगाबद्दल आणि फिटनेसबद्दल चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर देखील तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अमृता अगदी न चुकता रोज योगा करून फिट राहते. तिच्या फॅशन सेन्ससोबतच फिटनेसच्या ही चर्चा कायम होताना दिसतात. शूट आणि व्यायाम यांचा योग्य समतोल साधत अमृता रोज योगा करते आणि फिट राहते.
नुकतेच अमृताने योगा दिनाच्या निमित्ताने अमृताने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर खास योगा व्हिडिओ शेअर करून सगळ्यांना फिट राहण्याची प्रेरणा दिली आहे. योगा हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे कायम तिच्या सोशल मीडिया वरून कळत.
यंदाच्या योग दिनाच्या निमित्ताने अमृताने तिच्या व्हिडिओ मधून खास संदेश दिला आहे. या व्हिडिमोमध्ये अमृता म्हणते की, ‘योगा करण हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. शूट मधून कायम वेळ काढून मी योगा करतेय. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा ब्रिदिंग हे नीट जमलं पाहिजे तुम्हाला आसन नाही आली, तरी चालेल. परंतु, तुम्हाला व्यवस्थित ब्रिदिंग जमलं पाहिजे. रोजच्या जीवनात रोज न चुकता योगा करणं हा टास्क असला तरी त्यातलं सातत्य जपून कायम व्यायाम केला पाहिजे’.
अमृता तिच्या शूट मधून देखील वेळ काढून सातत्य जपत योगा करते आणि यातून फिट राहते. प्रत्येक माणूस हा फिट राहण्यासाठी व्यायाम करतोच. मात्र, एक कलाकार म्हणून कामासोबत व्यायाम करण्याकडे देखील तिचा कल हा नेहमीच असतो. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अमृताने अनेकांना योगा करण्यासाठी प्रेरणा दिली आहे आणि योगाचे महत्त्व समजावून सांगितले आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अमृता सध्या ‘ड्रामा ज्युनिअर’ या झी मराठीवरील कार्यक्रमासाठी परीक्षक बनली आहे. यासोबतच ती ‘36 डे’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वर्षभरात ती अनेक हिंदी मराठी प्रोजेक्ट्स मधून काम करताना दिसणार आहे. कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव अश्या अनेक मराठी चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काही शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.