'Aerial Yoga' Sakal
लाइफस्टाइल

Explainer: योगा ट्रेनरच्या 'या' खास टिप्स लक्षात ठेवल्यास 'Aerial Yoga' करण्याचे मिळतील आरोग्यदायी फायदे

पुजा बोनकिले

Aerial Yoga: दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये योगा बद्दल जनजागृती करणे हा या दिनाचा उद्देश आहे. निरोगी आणि तदुंरूस्त राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरते. योगाचे अनेक प्रकार आहेत. पण अलिकडे एरियल योगा जास्त चर्चेत आहे. तुम्ही आलिया भट, हिना खान यासारख्या सेलेब्सला हा योग प्रकार करताना पाहिला असेल. पण हा योग करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जागतिक योगा दिनानिमित्त योगा ट्रेनर नेहा जैन राळेकर यांनी सोप्या शब्दांमध्ये एरियर योगा करताना कोणती काळजी घ्यावी आणि आरोग्यदायी फायद्याबद्दल माहिती दिली आहे.

Aerial yoga म्हणजे काय?

हा योग प्रकार सॅटिनसारख्या मुलायम कापडाचा आधार घेऊन केला जातो. हा योग प्रकार जमिनीपासून थोड्या उंचावर म्हणजेच जमिनीपासून २ ते ३ फिट उंचावर केला जातो. या योग प्रकारामध्ये खाली डोके आणि वर पाय अशाप्रकारच्या योगाचा समावेश असतो, असे नेहा जैन यांनी मुलाखती दरम्यान सांगितले आहे. हा योग करणे एक प्रकारे थ्रिलींग असते. कारण हा योग प्रकार करताना तुमच्या शरीरात लवचिकता असणे गरजेचे असते.

कोणते नियम लक्षात ठेवावे?

एरियल योग करताना आपल्या हाइटनुसार त्याची उंची असावी. म्हणजेच तुमच्या कमरेपर्यंत असावे. मुलायम कापडाचा आधार घेऊन योगा केला जातो. हा योग प्रकार करताना प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावा. एरियल योगचा सराव करण्यापुर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. हा योग प्रकार चुकूनही घरी करून पाहू नका. हा योग प्रकार करताना शरीराला जास्त ताण देऊ नका. हा योग करताना कोणतेही दागिने घालू नका. तसेच पुर्ण बाहीचे कपडे घालावे. शेवटी कुल डाऊन करून थोडावेळ शांत बसावे.

'Aerial Yoga'

एरियल योगाचे फायदे कोणते?

शरीराचे स्नायू लवचिक होतात.

तणाव कमी होतो.

पाठदुखी समस्या कमी होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

मन आणि डोक शांत राहते.

एकाच जागी बसूण काम केल्याने मान आणि पाठीमध्ये वेदना होतात. हा योग केल्यास वेदनेपासून आराम मिळतो.

शरीरातील रक्ताभिसरण सुरळित कार्य करते.

मासिक पाळीत योगा करणे योग्य आहे का?

योगा ट्रेनर नेहा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला मासिक पाळीत योगा करू शकतात. पण जर तुम्हाला पोटात वेदना किंवा त्रास होत असेल तर योगा करणे टाळावे. अशा परिस्थितीत हलके आणि सोपे योगासनांचा सराव करावा.

'Aerial Yoga'

लहान मुले करू शकतात का?

एरियल योगाचा सराव लहान मुलांसाठी देखील आरोग्यदायी आहे. पण हा योग प्रकार ६ वर्षाच्या वरील मुलांनी करावा. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि योग्य वाढ देखील होते.

कोणी करणे टाळावा?

नेहा जैन यांनी सांगितले की जर पाठ दुखी, डोळ्यांचा आजार, उच्च रक्तदाब, चक्कर येणे, हृदया संबंधित विकार असेल तर एरियल योगाचा सराव करणे टाळावे. तसेच गर्भवती महिलांनी हा एरियर योगा करू नये. तुमच्या शरीराला दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर हा योग प्रकरा करणे टाळावा.

कोणते कपडे परिधान करावे?

एरियर योग करण्यासाठी तुम्ही आरामदायक, सैल आणि पुर्ण बाह्याचे कपडे घालावे. ज्यामुळे तुम्हाला हा योग करताना कोणती ही समस्या येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडिया अन् Semi Final च्या मार्गात तगडे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाने उभं केलं विक्रमी आव्हान

Doctor Protest: 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी बंद, एफएआयएमएच्या बैठकीनंतर निर्णय, कारण काय?

Baba Siddiqui Case Update: कोण आहे मुंबई पोलिसांचा सिंघम? ज्यांनी जीव धोक्यात घालून बाबा सिद्दिकींच्या शूटर्सना पकडलं!

Indapur Accident : इंदापूर बारामती मार्गावर ट्रक आणि हायवाचा अपघात; दोघे गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

IND W vs AUS W: रेणुका ऑन फायर! एकाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी धक्का, राधाचाही भन्नाट कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT