IPS Akshat Success Story: UPSC द्वारे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी सुमारे 10 लाख उमेदवार अर्ज करतात. पण त्या 10 लाखांपैकी केवळ 10 किंवा 15 उमेदवार असे आहेत की ते इतिहास घडवतात.
महाराष्ट्र राज्यातील बरेचशे विद्यार्थी यूपीएससी या परीक्षेची तयारी करत आहेत. UPSC चा फुल्ल फॉर्म “Union Public Service Commission” असा होतो आणि मराठी मध्ये याला “केंद्रीय लोकसेवा आयोग” किंवा “संघ लोक सेवा आयोग” असे म्हणतात.
आपल्या सर्वांना माहित आहे की लाखो उमेदवार अनेक वर्षांपासून UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करतात, परंतु तरीही ते ही परीक्षा उत्तीर्ण करू शकत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला त्या 10-15 उमेदवारांपैकी एकाची यशोगाथा सांगणार आहोत. ज्याने अवघ्या 17 दिवसांत UPSC परीक्षेची तयारी केली.
या तयारीतून तो नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनला. ( IPS Akshat Success Story: 17 day UPSC study strategy to become IPS securing 55th rank)
खरं तर आम्ही बोलत आहोत आयपीएस अधिकारी अक्षत कौशलबद्दल. अक्षत 2017 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत 55 वा क्रमांक मिळवून आयपीएस अधिकारी बनला. पण, त्यांनी हे यश त्यांच्या ५ व्या प्रयत्नात मिळवले.
पोस्ट कधी काढणार, अशी विचारणा प्रत्येक जण करत असे. त्याचवेळी चौथ्यांदा त्याला यश मिळालं नाही. अक्षत कौशल च्या म्हणण्यानुसार, त्याने 2012 सालापासून नागरी सेवेची तयारी सुरू केली, तो चार वर्षे या परीक्षेत नापास झाला.
इतकंच नाही तर नैराश्य इतकं वाढलं होतं की त्याने अभ्यासही सोडला होता. हार मानू नये असं मित्रांनी बरंच समजावून सांगितलं, म्हणून अक्षतने पाचव्यांदा प्रयत्न करण्याचा विचार केला. UPSC परीक्षेच्या अवघ्या 17 दिवस आधी जेव्हा तो त्याच्या मित्रांना भेटला तेव्हा मित्रांनी दिलेल्या प्रोत्याहनामुळे पुन्हा परीक्षा देण्यास तयार झाला. (UPSC)
अक्षतच्या कुटुंबियांनीही त्याला प्रोत्साहन दिले. पुन्हा एकदा तयारी सुरु कर असे त्याच्या आई-वडिलांनी त्याला सांगितले. त्याच्या आईनेही त्याला प्रोत्साहन दिले. तेव्हा प्रीलिम्सला अवघे 16 दिवस शिल्लक होते. 2017 मध्ये अक्षतने या 16-17 दिवसांत परीक्षेची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात 55 वा ऑल इंडिया रँक मिळवला.
यानंतर त्याने 17 दिवसांच्या तयारी नंतरच 5 वा प्रयत्न केला. आणि ती परीक्षा अक्षत उत्तीर्ण झाला. अक्षत म्हणतो की, विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. (IAS Success Story)
उमेदवारांनी कोणत्याही गोष्टीबद्दल अतिआत्मविश्वास ठेवू नये. असा आत्मविश्वास कधीच बाळगू नका जो तुम्हाला अपयशापर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे अभ्यास करा, परीक्षेला न घाबरता सामोरेही जा पण अति आत्मविश्वास अजिबात बाळगू नका, असेही अक्षतने सांगितले.
परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी त्यांच्या वरिष्ठांचा आणि त्यांच्या मित्रांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जे UPSC ची तयारी करत आहेत. किंवा ज्यांनी UPSC परीक्षेत पोस्ट काढल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशनल व्हिडिओ तुमच्या कामी येतील. उत्तीर्ण होण्यासाठी वरिष्ठांचा अनुभव खूप उपयुक्त ठरू शकतो.
काही उमेदवार अनेकवेळा ट्राय करतात. पण त्यांच्या पदरी निराशाच येते. शेवटी ते थकतात आणि दुसरा मार्ग अवलंबतात. उमेदवाराला 100% देऊनही यश मिळवता येत नाही असे वाटत असेल, तर त्याने काही काळ विश्रांती घ्यावी आणि नंतर पुन्हा नव्या रणनीतीने परीक्षेची तयारी सुरू करावी. (Officers)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.