Jaggery Tea For Health  esakal
लाइफस्टाइल

Jaggery Tea For Health : साखरे ऐवजी गुळाच्या चहाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

न फुटणारा गुळाचा चहा कसा बनवायचा? Gulacha chaha kasa banvaycha?

Pooja Karande-Kadam

Jaggery Tea For Health : आजकाल कोणत्याही डॉक्टरकडे गेलं की, ते आधी तुमच्या खाण्यापिण्याबद्दल चौकशी करतात. खाण्यात काही वेगळं आलं की आपलं आरोग्य बिघडलंच म्हणून समजा. पण केवळ बाहेरीलच नाहीतर घरातील काही पदार्थांचे सेवन केल्यानेही तुमचे आरोग्य बिघडते.

आता घरात असलेल्या साखरेचंच घ्या ना. साखर तसा गोड पदार्थ आपल्याला रोजच भेटायला येतो. सकाळची सुरूवात सकाळच्या चहाने करणारे अनेक लोक आहेत. त्या चहामुळेच आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या सुरू झाल्या आहेत.

चहामुळे वजन वाढलं, चहामुळे मधुमेहाचा त्रास सुरू झाला. या आणि अशा अनेक समस्यांमुळे लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे लोक सांगतात की सेंद्रिय पदार्थांवर भर द्या. आता चहाचच घ्या, चहामुळे वजन वाढत असं वाटत असेल तर तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता.(Jaggery Tea For Health : Jaggery Tea Can we drink Jaggery tea everyday Know in which situations it is beneficial to drink)

गुळाचा चहा घेण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. गुळ खाल्ल्याने अनेक आजारांना आळा बसतो. यामुळे मधुमेह होत नाही, तर तुमची इम्युनिटी पॉवरही वाढते.  असा चहा पिण्याचे फायदे काय काय आहेत हे पाहुयात.

Weight Loss आणि गुळाचा चहा

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सगळेच म्हणतात की, साखर खाणं बंद करा.जर साखर बंद केली तर गुळाचे सेवन करा. गुळ खाणे फायद्याचे ठरू शकते. कारण साखर केवळ साखरेत असते असं नाही. तर आपण खाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत थोड्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढतच जाते.  त्यामुळे जर तुम्ही साखरच कमी खाल्ली तर तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

मायग्रेनच्या समस्येवर लाभदायक

मायग्रेन हा गंभीर डोकेदुखीचा  आजार आहे. मात्र यामध्ये सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळ्या, बऱ्याचदा डोक्याच्या एका बाजूस आणि डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. बहुतांश लोकांना मायग्रेनच्या वेदना होत असताना मळमळ, उलटी सारखे त्रासही होऊ शकतात.

तर काही लोकांच्या वेदना उलटी झाल्यानंतर कमी होतात.तुम्हालाही हा त्रास सतत होत असेल तर त्यावर गुळाचा चहा तुम्हाला लगेचच रिलिफ देऊ शकतो. गुळाच्या चहाचे सेवन तुम्ही करत रहाल. तर मायग्रेनचा आजार कायमचा बरा होण्यास फायदा होतो.  (Jaggery)

पोट फुगणे

हि सामान्य समस्यांपैकी एक आहे. पण हि समस्या त्रासदायक सुद्धा तितकीच आहे. चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना या समस्येला सर्वाधिक तोंड द्यावे लागते. जास्त करून रात्रीच्या जेवणानंतर हि समस्या सर्वाधिक त्रास देऊ लागते. 

अशा आजारापासून तुम्हाला कायमची सुटका करून घ्यायची असेल तर डायटमध्ये गुळाचा समावेश करा. तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटल्यास तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता. याने तुमचा त्रास कमी होतो. (Healthy Food)

आपण रोज गुळाचा चहा पिऊ शकतो का?

तुम्ही मधुमेहाचे रूग्ण नसाल तर तुम्ही गुळाच्या चहाचे रोज सेवन करू शकता.  जर तुम्हाला गुळाच्या सेवनाने काही त्रास होत नसेल. तर, तुम्ही आरामात या चहाचे सेवन करू शकता.

न फुटणारा गुळाचा चहा कसा बनवायचा?

साहित्य - चहाचे भांडे, दूध, चहापावडर, गूळ अथवा गुळाची पावडर, वेलची अथवा वेलची पावडर, गवती चहाची पात, किसलेले आले, पाणी

गुळाचा चहा तयार करण्याची कृती –

सर्वात आधी चहाच्या भांड्यात एक कप चहासाठी अर्धा कप पाणी उकळत ठेवा. पाण्याला आंदण आल्यावर त्यात किसलेलं आलं, अर्धा चमचा चहापावडर, वेलची पावडर, गवती चहा आणि आवडीचे चहाचे मसाले टाका.

चहा चांगला उकळल्यावर त्यात आधी अर्धा कप दूध घाला. दुधाला चांगली उकळी आली की सर्वात शेवटी चहा कपात ओतून घेण्यापूर्वी चहात गूळ पावडर अथवा किसलेला गूळ घाला. त्यानंतर गूळ विरघळला की चहा कपात ओतून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT