आपल्याकडे १५ ऑगस्ट,२६ जानेवारी दिवशी चौकाचौकात जिलेबीचे स्टॉल लागलेले असतात. त्यानंतर कुठल्यातरी कार्यक्रमालाच आपण जिलेबी बनवतो अन् खातो. पण अनेक मार्केट असे आहेत जिथे फास्टफुड सारखेच जिलेबी बनवली जाते अन् ती हजारोंच्या संख्येत विकलीही जाते.
तुम्ही आजवर २०० ते ५०० रूपये किलो अशी जिलेबी खाल्ली असेल. पण आज आम्ही ज्या जिलेबीबद्दल सांगणार आहोत ती ७०० रूपयाला एक मिळते. आपल्या सर्वांना माहित आहे की पश्चिम बंगाल मिठाईसाठी खूप प्रसिद्ध आहे. परंतु तुम्ही पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात बनवलेली जिलेबी क्वचितच कुठेही पाहिली असेल.
जिलेब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. या गोल वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस हे मिक्स केले जाते.
बांकुरा जिल्ह्यातील केंजाकुरा येथे ही अनोखी जिलेबी मिळते. इथे भाद्र महिन्यातील संक्रांतीच्या दिवशी जत्रेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये ही जिलेबी खास आकर्षणाचे केंद्र आहे.
या जिलेबीचा आकार गाडीच्या चाकासारखा आहे. या रस्त्यावरून जाणारा माणूस ही जिलेबी पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. ही जिलेबी आधीच बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. पण आता शेजारच्या झारखंडमधूनही लोक ही जिलेबी खायला येतात.
बांकुरा या प्राचीन शहराच्या केंजाकुरा येथील द्वारकेश्वर नदीच्या काठावर दीर्घकाळापासून भादू पूजा साजरी केली जाते . आजूबाजूच्या सर्व घरांमध्ये भांदूची (पारंपरिक नाव) पूजा केली जाते. तसेच, लोकगीते गायली जातात. प्रत्येक घरात गाण्याची, नाचण्याची आणि खाण्याची आणि पिण्याची परंपरा आहे. याच काळात जिलेबी बनवण्याची प्रथा रूढ झाली.
कालांतराने जंबो जिलेबी बनवण्यासाठी लोक एकमेकांशी स्पर्धा करू लागले. त्यामुळे जिलेबीचा आकार वाढत गेला. बदलत्या काळानुसार या जिलेबीची प्रतिष्ठा वाढू लागली. मात्र, ही एक संपूर्ण जिलेबी कोणीही खाऊ शकत नाही.
बहुतेक लोक ही जिलेबी इतरांना भेट देण्यासाठी म्हणून खरेदी करतात. भाद्र महिन्यातील भादूपूजेच्या दिवशी ही जिलेबी आकर्षणाचा पदार्थ असतो. एका जिलेबीची किंमत 300 ते 700 रुपयांपर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.