Janmashtami 2023 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 : जन्माष्टमीदिवशी दही-पोहे खाण्याला का आहे महत्त्व? जाणून घ्या रेसिपी

देवही मत्सांच्या रूपात खातात दही-काला

Pooja Karande-Kadam

Janmashtami 2023 : श्री कृष्ण जन्मोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. कृष्णभक्तीत तल्लीन होणाचा, कृष्णांची भजन किर्तन ऐकणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरते. भगवान कृष्णांचा जन्न मध्यरात्री झाल्याने दोन दिवस त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. कृष्णांच्या मंदिरात रात्र १२ ला पाळणा गायला जातो. जग कल्याणासाठी अवतारलेल्या कृष्णांच्या जन्माचा जल्लोष केला जातो.

दुसऱ्यादिवशी दहीहंडीचे नियोजन असते. नंदलाल कृष्णांना लहानपणीपासून दही, लोणी खाण्याची आवड होती. बरं, ते स्वत: गावप्रमुखाचे पुत्र होते तरी घरी असलेले यशोदामातेने बनवलेले आयते लोणी त्यांना कमीच आवडायचं.

त्यामुळे सवंगड्यांची गट्टी जमवून त्यांनी गोपिकांच्या घरचेही लोणी पळवले. यासाठी एकमेकांच्या खांद्यावर चढून ते दह्याची हंडी फोडायचे. (Dahi poha recipe in marathi)

श्रीकृष्णांना काय आवडतं असा विचार केला तर लोणी आणि दही यांचेच नाव सुचते. पण, तुम्हाला माहितीय का बाळकृष्णांना दहीकालाही खूप आवडतो. दहीकाला का बनवला जातो, त्याची कथा आणि तो कसा बनवायचा याची थोडक्यात माहिती घेऊयात.

रूक्मिणी माता श्रीकृष्णांवर रूसून जेव्हा पंढरपुराजवळच्या दिंडीरीवनात आल्या. तेव्हा त्यांना मनवण्यासाठी श्रीकृष्णांनीही पंढरपुराची वाट धरली. येताना ते गोपाळ, गोमाता यांचा लवाजमा सोबत घेऊनच आले होते. जेव्हा श्रीकृष्णांनी माता रूक्मिणींना मनवले आणि त्या प्रसन्न झाल्या.

तेव्हा भगवंतानी उंच पर्वतावर मोठ्या उत्सवाचे आयोजन केले होते. त्यात सर्व सखे भक्त आपापली शिदोरी घेऊन आले आणि याच, एकत्र जेवणाच्या समारंभाला 'काला' म्हणतात.

“गोपाल काला" हा उत्सव पंढरपुरात वर्षातून दोनदा साजरा केला जातो. प्रथम जून-जुलै महिन्यातून आषाढी पौर्णिमेला आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील कार्तिकी पौर्णिमेला. तनमनाने सारे भाविक एकत्र होतात. विठ्ठलनामाचा, गोपाळकृष्णाचा जयघोष करतात. दिंड्या पालख्या घेऊन वारकरी येथे एकत्र येतात. कीर्तने करतात. काला देतात, घेतात, खातात. (Food)

सारे उत्सवात समरस होऊन जातात. आजही जेव्हा येथे कथेचे वाचन केले जाते तेव्हा पोहे आणि दही एकत्र करून एकमेकांवर टाकतात. गोपाळपुरात वेगवेगळी भक्तमंडळी, वेगवेगळ्या ठिकाणी, आषाढी आणि कार्तिक महिन्यात काल्याचा उत्सव साजरा करतात. दही- पोह्यांनी भरलेले माठ वृक्षांना लटकवून दहीहंडीसारखेच फोडतात.

देवही मत्सांच्या रूपात खातात दही-काला

पंढरपुरात असलेली गोपाळपूरची टेकडी हाच गोवर्धन पर्वत असून तो चंद्रभागेच्या काठावर आहे. गोपाळपूर, विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक असून यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आहेत.

विष्णुपदी श्री गोपाळकृष्ण गोपाळांसह नित्य भोजन करीत असतात. गोपाळपुरात गाई चरून पाणी पाजण्याकरिता चंद्रभागेवर आल्यानंतर गोपाळ आपापल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत असतात. (Janmashtami 2023)

त्यावेळी आपणास त्यातील उष्टा भाग मिळावा, म्हणून कित्येक देव मत्स्यांची रूपे धारण करून श्री चंद्रभागेच्या पात्रात काठावर पडलेले उच्छिष्ट भक्षण करतात, असा उल्लेखही पुराणांमध्ये आढळतो.

श्रीकृष्णांच्या नैवेद्यासाठी दही-काला कसा बनवाल?

साहीत्य-

  1. 3 वाट्या साळीच्या लाह्या

  2. 2 वाट्या ज्वारीच्या लाह्या

  3. अर्धी वाटी चण्याची डाळ

  4. 2 वेलची केळी किंवा 1 साधं केळं

  5. 2-3 कमी तिखट हिरव्या मिरच्या

  6. भरपूर कोथिंबीर 1

  7. टेबलस्पून गोड लोणचं

  8. 1 टेबलस्पून तिखट लोणचं दही लागेल

  9. फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, मीठ आणि साखर चवीनुसार

  10. तुमच्या आवडीची फळं

कृती

1) काला करण्याआधी 2 तास चण्याची डाळ भिजवून ठेवा. दोन्ही लाह्या गॅसवर किंचित भाजून घ्या. नंतर आपल्याला त्या दह्यातच कालवायच्या.

2) काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. केळीही बारीक चिरा. तुम्हाला आवडणारी फळ बारीक चिरून किंवा किसून घ्या.

3) काला करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात दोन्ही लाह्या, चिरलेलं साहित्य, गोड आणि तिखट लोणचं, लागेल तसं दही, साखर, मीठ असं सगळं घाला. नीट कालवून घ्या.

4) वरून हिंग मोहरीची खमंग फोडणी घाला.

5) यात तुम्ही सफरचंदही घालू शकता. (Recipes)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

Congress Candidate List: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगलीतून पृथ्वीराज पाटील, 'कोल्हापूर उत्तर'मधून 'यांना' संधी

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

SCROLL FOR NEXT