Janmashtami 2023 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 : पंढरपुरात आहे गोवर्धन पर्वत अन् वेणू वाजवणाऱ्या श्रीकृष्णांची मूर्ती, पहा खास फोटो

भगवान श्रीकृष्णांच्या पंढरपूर प्रवासाची सुरूवातच गोपाळपुरातून झाली

Pooja Karande-Kadam

Janmashtami 2023 : भगवान कृष्णांचे गाव म्हणून वृंदावन, मथूरा, गोकूळाचा उल्लेख होतो. पण, महाराष्ट्राचा विचार केला तर वैष्णवभक्त पंढरपुरात गर्दी करताना दिसतात. पण, फार कमी लोकांना हे माहिती आहे की, श्रीकृष्णांनी भक्त पुंडलिकासाठी पंढरीक वास्तव्य केलं.

पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरात श्रींचे अस्तित्व जाणवते. याच गोपाळपुराबद्दल माहिती घेऊयात. गोपाळपुरात श्रीकृष्णांनी करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वतही आहे. त्याची कथा काय आहे हेही पाहुयात.

गोपाळपूर हे पंढरपुरापासून दक्षिण दिशेस दीड कि.मी. अंतरावर आहे. गोपाळपूरचे मंदिर हे एका टेकडीवर आहे. या टेकडी अथवा पर्वतास गोपाळपूर पर्वत म्हणून संबोधतात आणि हा पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Janmashtami 2023)

पूर्वी श्रीकृष्ण पंढरपुरास जाण्यास निघालेले पाहून गोवर्धनही निघाले. कदाचित प्रभू रागावतील म्हणून ते येथे दुसऱ्या रूपाने आले. त्यांनी भीमरथी आणि पुष्पावती नदीच्या संगमावरील गोपाळपूर ग्रामाला माथ्यावर धारण केले आणि तेथेच राहिले.

ही कथा स्कन्दपुराणांतर्गत 'पांडुरंग माहात्म्याच्या दुसऱ्या अध्यायात सांगितली गेली आहे. भगवंताच्या प्राकट्याआधी त्यांचे भक्त, पार्षद प्रकट होतात आणि नंतर त्यांचे धाम प्रकट होते.

गोपाळपुरास गेल्यास मंदिराच्या पायथ्याशी प्रतिकात्मक यशोदेच्या दही मंथनाची जागा आहे. पूर्वेस लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. मंदिरास खाली पायथ्यापासून मोठमोठ्या दगडी पायऱ्या आहेत. पायथ्याशी डाव्या बाजूला काही गायी बांधलेल्या असतात. आणि तेथे त्यांना गोसेवा म्हणनू चारा खाऊ घालण्याची मान्यता आहे.

मंदिराच्या पवित्र अशा गर्भगृहात गोपाळ कृष्णांची वेणू वाजविणारी अत्यंत सुंदर आणि देखणी अशी मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूंस पंखा घेऊन उभ्या असलेल्या गवळणी असून, खाली गाय आणि बछड्यांच्या मूर्ती आहेत.

गोपाळपुरातील संत जनाबाई आणि विठुमाऊली

गोपाळपूर हे स्थान अत्यंत पुण्यकारक आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी देवीच्या शोधाकरिता गाई-गोपाळांसह प्रथम या ठिकाणी आले. येथे भीमा आणि पुष्पावती या नद्यांचा संगम असल्यामुळे ही परम पवित्र अशी जागा असून गोपाळांना राहण्यासाठी फारच उत्तम आहे, असे पाहून गाई-गोपाळांसह श्रीकृष्ण येथे क्रीडा करू लागले. येथेही भगवंताने गोपाळांसह काला केला आहे.

श्रीकृष्णाच्या त्रिभंगललित स्वरूपाचे दर्शन घेतल्यानंतर दक्षिण पूर्व दिशेला जनाबाईचे जाते आहे. तेथे एक गुहा आहे. जनाबाईंचा संसार आहे. जनाबाईंच्या गुहेत आत अंधाऱ्या खोलीत श्रीविठ्ठल आणि जनाबाईंचा अर्चाविग्रह आहे आणि येथे एक गोधडी ठेवली आहे. ती गोधडी जनाबाईंची आहे, अशी मान्यता आहे.

गोपाळपुरातील भडजी सांगतात की, भगवान श्रीकृष्णांच्या पंढरपूर प्रवासाची सुरूवातच गोपाळपुरातून झाली. त्यामुळे भक्तांनी विठ्ठालाचे दर्शन घेऊन गोपाळपुरात येतात.

श्रींची पदस्पर्श अन् गायीच्या पायांचे ठसे

गोपाळपुरात काल्याचा आणि गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. वैष्णवांसाठी एक महत्त्वपूर्ण सण आहे 'गोपाष्टमी'. श्रीकृष्ण मूळतः एक गोपाळ आहेत. भगवंत वृन्दावनात गाय चारण्यासाठी जातात, तो उत्सव आजही साजरा केला जातो. (Lord Krishna)

येथे श्रीकृष्ण जन्ममहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव श्रावण महिन्याच्या अष्टमीला जुलै-ऑगस्ट महिन्यात असतो. वैष्णव भक्तांसाठी यापेक्षा महत्वपूर्ण असा दुसरा उत्सव नाही. भगवंत श्रीकृष्णाचे या दिवशी या धरतीतलावर आगमन झाले. 'परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम् ।' या दोन कार्यांसाठी भगवंताचे प्राकट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT