Janmashtami 2023 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 : कोल्हापुरात या ठिकाणी आहेत श्रीकृष्णांच्या पायांचे ठसे, पाठोपाठ गायीच्या पायांनाही आहे महत्त्वाचे स्थान

कृष्ण भगवानांची ही खूण आजन्म करवीरवासियांना पाहता येईल, त्याचे दर्शन घेता येतील

Pooja Karande-Kadam

Janmashtami 2023 : कृष्णभक्तांसाठी पर्वणी असलेल्या जन्माष्टमीचा उत्साह देशभर पहायला मिळत आहे. श्रीकृष्णांचा जन्मोत्सव एखाद्या सोहळ्यासारखा साजरा केला जातो. त्यामुळेच मंदिरे सजली आहेत, तर जन्माष्टमीनंतर होणाऱ्या दहीहंडीसाठीही तरूणांचे महिनाभर आधीपासून नियोजन सुरू असते.

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो.महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.

भगवान कृष्ण हिंदू धर्मातील प्रमुख देवांपैकी एक आहेत. ते विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून पुजले जातात. कृष्ण हे संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचे देव असून ते भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि फार मोठ्या प्रमाणावर पूजले जातात. (Janmashtami 2023)

श्रीकृष्णांचा जन्म झाल्यापासूनच त्यांच्यामागे राक्षसांचा फेरा लागला होता. बाळकृष्णाने तेव्हाही महिमा दाखवत राक्षसांचा वध केला. असे हे बालकृष्ण आपल्या करवीर नगरीतही आले होते. आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरेत जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आले कधी आणि त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? (Kolhapur)

तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात. करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले होते. एकदा बलरामासोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे.

माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाल लीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं. पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळ रूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारा पर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. (Gokul

यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव

गोकुळ शिरगावाला प्रति गोकुळ असेही म्हटले आहे. येथे असलेले श्री कृष्णांचे प्राचिन मंदिर दहाव्या शतकातील आहे. बेसाल्ट दगडात याची उभारणी करण्यात आली असून मंदिराचा परिसर भव्य आहे. या मंदिरात हातात पावा असलेली भगवंतांची २ फूट उंचीची मुर्ती आहे. विशेष म्हणजे या मंदिरात शिवलिंग आणि नंदीमहाराजही आहेत.

मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा झरा आहे, ती साक्षात यमुनाच असल्याचे करवीर महात्त्म्यात सांगितले गेले आहे. या मंदिराच्या बाजूला असलेल्या खडकावर पावन भुमीवर प्रभूंची पदचिन्हेही आहेत. तसेच, त्यांच्या मागोमाग द्वारकेवरून आलेल्या गोमातेच्या पायांचे ठसेही इथे आहे.

मंदिर प्रशासनाने या जागेला कुंपन करून छत बांधले आहे. ज्यामुळे कृष्ण भगवानांची ही खूण आजन्म करवीरवासियांना पाहता येईल, त्याचे दर्शन घेता येतील.

ॲड.

गोकुळ शिरगावाला प्रति गोकुळ असेही म्हटले आहे

या मंदिराच्या मागे असलेला झरा छोट्या धबधब्याच्या रूपात तवालात कोसळतो. आणि तेच पाणी पुढे प्रवाहीत होते. पावसाळ्यात या मंदिरांला भेट देण्यासाठी भाविकांची गर्दी होते. तर, जन्माष्टमी, एकादशीलाही इथे पूजा, अभिषेक घातले जातात.

या ठिकाणी विशाळी यात्रा भरते. यात्रेच्यावेळी भजन, किर्तन असे धार्मिक कार्यक्रमही असतात. कर्नाटकातील कोगनोळी आणि कोल्हापुरातील मंगळवारपेठेतील भाविक येथे दिंडी घेऊन दर्शनाला येतात.

( संबंधीत लेख इतिहास संशोधन ॲड.प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीवरून घेतला आहे)

मंदिराच्या बाजूला असलेल्या खडकावर पावन भुमीवर प्रभूंची पदचिन्हेही आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT