Janmashtami 2024 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2024 : गोविंदा रे गोपाळा! मुंबईतील भव्य-दिव्य दहीहंडी अनुभवायचीय तर इथं जायलाच लागतंय

‘गोविंदा आला रे’ म्हणत उंच-उंच मनोऱ्यावर चढत दहीहंडी फोडण्याची मजा काही औरच असते. आणि हा सोहळा ‘याची दही याची डोळा’ पाहणे हे सुद्धा सुखद अनुभव देणारे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Janmashtami 2024 :

सर्वांचाच आवडता देव म्हणजे श्रीकृष्ण. श्री कृष्णांचा जन्मोत्सव दोन दिवसावर आला आहे. घराघरात स्वच्छता केली जात आहे. तसेच मंदिरे आणि घरातही जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण हा सण तरुणांच्याही आवडीचा आहे. कारण जन्माष्टमी नंतर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

‘गोविंदा आला रे’ म्हणत उंच-उंच मनोऱ्यावर चढत दहीहंडी फोडण्याची मजा काही औरच असते. आणि हा सोहळा ‘याची दही याची डोळा’ पाहणे हे सुद्धा सुखद अनुभव देणारे आहे. त्यामुळेच देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते.

तुम्ही ऐकलं असेल की कान्हा जेव्हा लहान होता तेव्हा तो नटखट होतात. गोपिकांच्या घागरी फोडायचा, घरातील दही लोणी पळवायचा. दही आणि लोणी पळवण्यासाठी तो मित्रांची म्हणजे गोपाळांची मदत घ्यायचा.

अनेक मित्रांना एकमेकांच्या खांद्यावर चढवून उंच मनोरा करून त्याच्यावर कृष्णा चढून दह्याने भरलेली मटकी फोडायचा. यामुळे सर्वांनाच लोणी आणि दह्याचा आस्वाद घेता यायचा. कालांतराने हाच एक उत्साहाचा आणि धाडसाचा खेळ बनला आहे.

दहीहंडीची चर्चा आणखी एका गोष्टीने होते ती म्हणजे त्याचे सार्वजनिक रूप आणि त्याच्यावरील बक्षीस आहे. दहीहंडीवरती लाखोंच्या किमतीत बक्षिसांची लयलूट केली जाते. बक्षिसे जिंकणारे गोविंदा ही तितके मेहनती असतात. अनेक दिवस ते सराव करत असतात.

मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातही दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते. यंदा तुम्हीही मुंबईमध्ये असाल तर दहीहंडीचा उत्सव पहायचा असेल तर कुठे जायचं याची माहिती घेऊयात.

लालबाग

मुंबईतील लालबाग हे गणेशोत्सवासाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. लालबागचा राजा इथेच विराजमान होतो. पण हे ठिकाण दहीहंडीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक दिवस सराव करणारे संघ लालबागची दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक असतात. या दहीहंडीला अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावतात.

ठाणे

मुंबईतील जन्माष्टमीला सर्वाधिक चर्चेत असलेलं शहर म्हणजे ठाणे होय. ठाण्यात अनेक मानाच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये संस्कृती दहीहंडी मंडळ आणि संघर्ष प्रतिष्ठाण यांच्या दहीहंडीचे मोठ्या जल्लोषात पार पडते. ठाण्यातील दहीहंडीमध्ये राजकीय चढाओढही पहायला मिळते.

लोअर परळ

मुंबई दहीहंडी उत्सव साजरी करायचे असेल तर लोअर परेलला जावं लागेल. कारण इथे मुंबईतली दुसऱ्या क्रमांकाची मोठी दहीहंडी साजरी केली जाते. तुम्हाला दहीहंडी चा भव्य सोहळा अनुभवायचा असेल तर इथे जायलाच पाहिजे.

घाटकोपर

तुम्ही यंदाच्या जन्माष्टमीच्या सुट्टीत मुंबईमध्ये असाल तर घाटकोपरला नक्की भेट द्या. तर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथली दहीहंडी उंचावर बांधलेली असते आणि ती फोडण्यासाठी गोविंदा पथकांना अथक परिश्रम करावे लागतात. पण जेव्हा छोटा गोविंदा दहीहंडी फोडतो तेव्हा जमलेले सर्व लोक गाण्यांवरती ठेका धरून आनंद साजरा करतात.

दहीहंडीला असलेली गर्दी

वरळी

वरळीमधील संकल्प प्रतिष्ठाणच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षी हजारो लोक भेट देतात. कारण ही एक प्रसिद्ध दहीहंडी असून ही फोडण्यासाठी अनेक स्पर्धक भाग घेतात. या दहीहंडीला सेलिब्रीटींचीही उपस्थिती असते.

या ठिकाणीही असते गर्दी

मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम असतो. मुंबईतील वांद्रे, बोरिवली,दादर या ठिकाणीही उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते. तुम्ही यंदाच्या जन्माष्टमीला मुंबईत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT