Janmashtami 2024  esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2024 : राधा ही बावरी! जन्माष्टमीसाठी मुलींना असं बनवा राधा, सर्वत्र होईल कौतुक

Radha Rani Look : तुम्हालाही यंदा तुमच्या मुलीला राधा राणी बनवायचे असेल तर काही खास आयडिया आम्ही तुम्हाला देतो.

सकाळ डिजिटल टीम

Janmashtami Radha Look :

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते. सण-समारंभांमुळे पाहुणे मंडळींची, देवांचा उत्सव साजरा करण्याचा हा महिना आहे. लवकरच श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने शाळेत विविध स्पर्धाही भरवल्या जातात.

गोकुळाष्टमी निमित्त प्रत्येक शाळेत उत्सवाचे आयोजन केले जाते. शाळेत लहान मुलांना श्री कृष्ण तर मुलींना राधा बनवले जाते. शाळेत मुलांच्या वेषभूशा स्पर्धा घेतल्या जातात. तुम्हालाही यंदा तुमच्या मुलीला राधा राणी बनवायचे असेल तर काही खाय आयडिया आम्ही तुम्हाला देतो.

राधाराणी ही श्री कृष्णांची प्रियसी. पण, तिची भक्ती इतकी होती की देवांनी तिला उच्च स्थान दिले आहे. श्री कृष्णांच्या नावासोबत राधेचेही नाव घेतले जाते. राधा प्रेमळ आहे, तिची कान्हावरची भक्ती अफाट आहे. त्यामुळेच तिलाही देवाचे स्थान मिळालेले आहे. राधा राणीसारखेच तुमच्या मुलीलाही सुंदर बनवायचे असेल तर काय करावं लागेल पाहुयात.

ड्रेस

मुलीला राधा बनवण्यासाठी तुम्ही ड्रेस परफेक्ट निवडा. म्हणजे तुम्ही लेहंगा, घागरा असे ड्रेस तिला घालू शकता. तसेच, हेवी वर्क असलेली ओढणीही तिला शोभुन दिसेल. आजकाल दोन साड्या मिळून साऊथ इंडियन साडीही नेसली जाते. तुम्ही तशीही साडी घेऊ शकता. या साडीवर तुम्ही मॅचिंग दुपट्टा पिनअप केला तर तो वेगळा लुक क्रिएट करता येईल.

मुलींना असे फुलांचे दागिने शोभून दिसतात

ज्वेलरी

आजकाल केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व दागिने एकसारखे घालण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही मुलीसाठी असाच लुक करू शकता. त्यासाठी मोती, राजस्थानी, फुलांचे दागिने वापरू शकता. गळ्यातील लहान-मोठे सेट, कानातले, बाजुबंद, कमरपट्टा, बिंदी असे दागिने मुलीला शोभुन दिसतात.

मेकअप

मुलगी हुबेहुब राधेसारखी दिसावी यासाठी तिला परफेक्ट मेकअप करणे गरजेचे आहे. त्यासाठी अगदी लाईट शेड फाऊंडेशन वापरू शकता. थोडी डार्क लिपस्टीक, तसेच काजळ आणि भुवयांवरती रंगीत गंधाचे टिपके देता येतील.

शाळेतील कार्यक्रमासाठी नटलेली राधा बनलेली एक चिमुकली

राधेच्या लुकला पूर्ण बनवतील या वस्तू

राधाराणीचा लुक परिपूर्ण बनवण्यासाठी तुम्ही तिच्या हातात छोटी घागर देऊ शकता. बाजारात वेलवेट कापड लावलेल्या, त्यावर काचेचे वर्क केलेल्या छोट्या घागरी उपलब्ध आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT