jhumka sakal
लाइफस्टाइल

कहाणी झुमक्यांची

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

दागिन्यांच्या परंपरेतील एक सुंदर आणि ट्रेंडी प्रकार म्हणजे ‘झुमका’. ‘झुमका गिरा रे...’ म्हणत या झुमक्यांनी बॉलीवूड गाजवले, तर लोकप्रिय टीव्ही मालिकांतील तुमच्या आवडत्या नायिकांचीही झुमक्यांना पसंती असते. कानातल्यांचे हे प्रकार केवळ फॅशन ट्रेंड्स नाहीत, तर भारतीय संस्कृतीत झुमक्यांना ऐतिहासिक काळापासून महत्त्व आहे.

असे म्हणतात की, झुमक्यांनी तयार होणारा कर्णमधुर स्वर सकारात्मक ऊर्जा आणतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर सारतो. संपूर्ण भारतात झुमके वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. झुमक्यांना समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. झुमक्यांची रचना चोल राजघराण्यातील मंदिरातील पुतळ्यांशी संबंधित असल्याचे मानले जाते. विश्वास नाही बसणार; पण झुमका प्रकाराचे मूळ प्राचीन संस्कृतीत सापडते.

झुमका हा शब्द ‘झुमकी’ या हिंदी शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ ‘छोटी घंटा’ असा होतो. भारतीय परंपरेने तर या कानातल्यांच्या प्रकारात भर टाकली. स्त्रियांसाठीचे कानातल्यांचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. यात झुमके नेहमी बाजी मारतात. झुमक्यांचे वेगवेगळे प्रकार सर्व वयोगटातील महिला वापरतात. परंपरा आणि अभिजाततेचे प्रतीक बनलेल्या झुमक्यांना अनेक नावांनी संबोधले जाते आणि प्रत्येकाची वेगळी शैली आणि रचना आहे.

झुमके पश्चिम बंगालमध्ये ‘झुमको’ म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातीत आपण ‘झुमका’ म्हणतो. महाराष्ट्रातील झुमक्यांवर बंजारा संस्कृतीचा प्रभाव आहे. हरियानामध्ये झुमके ‘मगर’ किंवा ‘कुंडल झुमके’ म्हणून ओळखले जातात. हरियाणवी झुमके त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. तमिळनाडू आणि केरळमध्ये ‘झिमकी’ किंवा ‘जिमिक्की’ म्हणतात. ते ‘जिमिक्की पोन्नू…..’ गाणे आठवले का?

कर्नाटकात ‘मुथिना वाले झिमकी कानातले’ म्हणून ओळखले जातात. इथे झुमक्यांना उत्कृष्ट डिझाइन मिळतात. मणिपूरमध्ये झुमका ‘खोकोर’ म्हणून ओळखला जातो. मणिपुरी झुमके एलिंगट वाटतात. प्रादेशिक भिन्नता झुमक्यांमध्ये स्पष्ट दिसते. राजस्थानी झुमके जरा लांब असतात आणि त्यांत वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांचा वापर होतो. याशिवाय राजस्थानची स्वतःची विशिष्ट शैली आहे.

तिथल्या ‘कर्णफूल झुमका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकारांमध्ये डिस्कच्या आकाराचे कर्णफूल असते आणि एक बेलच्या आकाराचा कप (झुमकी) असतो. ओडिशातील आदिवासी समुदाय त्यांच्या झुमक्यावरील उत्कृष्ट ‘फिलीग्री’ कामासाठी ओळखले जातात. सिल्व्हर फिलीग्री वर्कला जीआय टॅग मिळाला आहे.

फिलीग्री वर्क किंवा तारा कासी हा हस्तकला प्रकार असून ही कला किचकट डिझाइन आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखली जाते. ओडियामध्ये ‘तारा’ म्हणजे वायर आणि ‘कासी’ म्हणजे डिझाइन करणे. चांदीच्या विटांचे पातळ बारीक तारांमध्ये किंवा फॉइलमध्ये रूपांतर केले जाते आणि दागिने किंवा शोपीस तयार करण्यासाठी वापरला जातो. याच प्रकारात झुमके तयार होतात. गुजरातमध्ये चांदी आणि वेगवेगळे मौल्यवान दगड वापरून झुमके तयार होतात.

हिमाचली झुमके त्याच्या सुंदर मुलामा चढवलेल्या चांदीसाठी ओळखले जातात. हैदराबादमधल्या झुमक्यांवर मुघल संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. इथे ‘हुप झुमके’ प्रामुख्याने दिसतात. आंध्र प्रदेशात ‘बट्टलू कानातले’ म्हणूनही झुमके ओळखले जातात. आंध्रातील झुमके अत्यंत नाजूक डिझाइनमध्ये मिळतात.

सहसा विवाह सोहळ्यांतील महत्त्वाचे आभूषण म्हणजे सोन्याचे झुमके. सोन्यामध्ये ‘झुमक्यांचे'’ असंख्य प्रकार मिळतात. ‘डायमंड झुमके’ आणि ‘ऑक्सिडाइज्ड झुमके’ तर अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑक्सिडाइज्ड झुमके कोणत्याही परिधानावर खुलतात आणि क्लासिक वाटतात. सध्या या झुमक्यांना सर्वाधिक मागणी असून अत्यंत सुंदर डिझाइन आणि नावीन्यामुळे हे झुमके ‘व्हिंटेज’ ज्वेलरी वाटतात.

शास्त्रीय नृत्यातही महत्त्वाचे स्थान

असे मानले जाते की, झुमके भरतनाट्यम नृत्यकलाकार आवर्जून घालतात. नृत्य करताना चेहऱ्यावरील हावभाव आणि मानेची हालचाल होते. नृत्य करताना झुमके हळुवारपणे हलतात आणि प्रभाव पाडतात. नृत्यकलाकाराच्या प्रत्येक हालचालीने झुमकाही संगीतमय सिम्फनी तयार करतो. म्हणूनच नृत्यकलाकार आणि तिच्या सहकारी मोहित होऊन नृत्य करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT