Kanyakumari Temple esakal
लाइफस्टाइल

Kanyakumari Temple : नारद मुनींनी का मोडला होता कन्यादेवी आणि भगवान शंकरांचा विवाह? जाणून घ्या कन्याकुमारी देवीची कथा

सकाळ डिजिटल टीम

Kanyakumari Temple :

देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. 1 जून रोजी देशभरातील अनेक केंद्रांवर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. याच दिवशी पंतप्रधान पुन्हा एकदा ध्यानधारणा करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मेच्या संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानावस्थेत राहतील.

पंतप्रधान मोदी जिथे ध्यानाला बसले आहेत ते कन्याकुमारीचे मंदिरही प्रसिदध आहे. त्याला विशेष असे कारणही आहे. जगात कुठेच नाही असे कुमारी पार्वती मातेचा अवतार म्हणजे अम्मन देवीचे हे मंदिर आहे. देवी पार्वतीच्या कलेवराचे ५१ तुकडे भारत आणि शेजारी देशात पडले होते.

त्यापैकी पार्वती मातेचा खांदा आणि पाठीचा भाग पडला होता. तिथे हे मंदिर निर्माण झाले आहे. या मंदिरातील देवीची निर्मिती ही बाणासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी झाली असल्याचे सांगितले जाते.

कन्याकुमारीमध्ये तीन समुद्रांचा संगम असलेल्या त्रिवेणीच्या तीरावर कन्याकुमारी देवीचे भव्य मंदिर आहे. दगडांनी बांधलेले हे मंदिर तीन हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी महर्षी परशुराम यांच्या आदेशानुसार ते बांधले होते.

या मंदिराशी अनेक दंतकथाही जोडल्या गेल्या आहेत. दैत्य राजा महाबली यांचा वंशज बाणासुर याने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वरदान दिले.

बाणासूर राक्षसाने चालाखी करून कोणताही पुरूष आणि विवाहित स्त्री मला मारू शकणार नाही, माझा मृत्यू केवळ एका दैवी कुमारीकेच्याच हातून होईल असे वरदान मागितले. तेव्हा भोळ्या महादेवांनी तथास्तू म्हटले.

भगवान शंकरांकडून वरदान मिळाल्यानंतर बाणासूर राक्षस माजला होता. बाणासुराने जनता आणि ऋषींना त्रास देण्यास सुरूवात केली. सर्वत्र त्याने हाहाकार माजवला होता. तेव्हा सर्व ऋषी भगवान विष्णूंकडे आले.

विष्णूने त्यांना आदिशक्तीची उपासना करण्यास सांगितले. देवीने प्रसन्न होऊन देवीने जगाचा उद्धार करण्यासाठी एका कुमारिकेचा अवतार घेण्याचे मान्य केले.

कुमारी कन्येच्या अवतारानंतरही देवीची शिवभक्ती आणि प्रेम कमी झाले नाही. तिने शिवाशी लग्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. शिव देखील प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.

भगवान शिव जेव्हा या विवाह सोहळ्यासाठी येत होते तेव्हा तेव्हा कन्याकुमारीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या शुचिंद्रम गावात मिरवणूक थांबली.  दुसरीकडे कन्याकुमारीचा विवाह पाहून बाणासुराचा वध कसा होईल, अशी चिंता देवांना लागली.

आधी त्यांनी देवीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, जेव्हा हे समजावणे कमी पडले तेव्हा देवांनीच युक्ती ठरवली. देवी कन्या आणि शिवांच्या लग्नाचा मुहूर्त ब्रह्म मुहूर्त होता. पण नारदांनी कोंबड्याचे रूप धारण केले आणि मध्यरात्रीच कोंबडा आरवला. भगवान शंकरांना वाटले की सकाळ झाली आणि आता तो शुभ मुहूर्त गाठू शकणार नाहीत. त्यामुळे भोलेनाथ लग्नाच्या मिरवणुकीसह कैलासला परतले.

तर इकडे, वधूच्या वेषात सजलेल्या देवीला लग्नाची मिरवणूक आली नसल्याचे पाहून तिला दुःख झाले आणि ती क्रोधितही झाली. देवांची वरात माघारी परतल्यानंतर देवीकुमारीच्या दिव्य सौंदर्याची चर्चा बाणासूरपर्यंतही पोहोचली. त्याने देवीला लग्नाचा प्रस्तावही पाठवला. देवीने होकार द्यावा यासाठी बाणासुराने जबरदस्ती केली. त्यानंतर बाणासुर आणि देवी यांच्यात घनघोर युद्ध झाले, जिथे देवीने आपल्या चक्राने त्याचा वध केला.

कसे आहे समुद्रात उभारलेलं हे मंदिर

कन्याकुमारी मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेले आहे. चार दिशांना चार दरवाजे आहेत. गर्भगृहात देवीची मूर्ती आहे. देवीच्या नाकातील नथ हिऱ्यांनी जडलेली आहे, जी दीपप्रज्वलित गर्भगृहात दुरून दिसते. राजा नागराने देवीला अर्पण केलेले हे रत्न आहे असे म्हणतात.

ऐतिहासिक पुराव्यावर विश्वास ठेवला तर मंदिर पांडवांच्या काळात बांधले गेले होते. विजयनगर, चोल, चेरी आणि नायक राजघराण्यांनी वेळोवेळी या मंदिराचे सौंदर्य वाढवले. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यापासून काही उंचीवर असून त्याच्या भोवती 18-20 फूट तटरक्षक भिंत आहे.

कन्याकुमारी देवीच्या लग्नाचे जेवण आजही आहे?

जेव्हा वरात घेऊन भगवान शंकर माघारी परतले. तेव्हा  लग्नाच्या मेजवाणीसाठी तयार केलेले सर्व अन्न समुद्रात फेकून दिले. असे म्हणतात की, आजही कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्याच्या वाळूत अनेक रंगीबेरंगी दगडांचे कण सापडतात, जे डाळी-तांदूळसारखे दिसतात. हे तेच जेवण असल्याचे भाविक म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

Vidhan sabha election 2024: उद्यापासून आचारसंहिता? आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक; महत्त्वाचे निर्णय होणार

'खालच्या दर्जाची वक्तव्ये करून मुश्रीफांनी शाहू महाराज, आंबेडकरांचा अपमान केलाय'; समरजित घाटगेंचा निशाणा

Share Market Today: शेअर बाजार उघडताच कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? पहा यादी

Latest Maharashtra News Updates : बॉम्बच्या धमकीनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले

SCROLL FOR NEXT