श्रीधाम पंढरपूर हे भारतातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक आहे. पुराणांनी त्याचे माहात्म्य गायिले आहे. साधुसंतांनी या क्षेत्राचा महिमा गायिला आहे. हे भूलोकीचे वैकुंठ आहे. येथे भगवान द्वारकाधीशांचे साक्षात वास्तव्य आहे. पंढरीला दरवर्षी चार यात्रा भरतात. चैत्र,आषाढ,कार्तिक आणि माघ होय. या चारही यात्रेवेळी वारकऱ्यांची मांदियाळी भरते.
आषाढ यात्रेला जेव्हा देशभरातून पायी दिंड्या पंढरपुरात येतात. तेव्हा देव आमच्यासोबतच वारीत असतो, तो आमच्यासोबत श्रमदान करतो आमचे पायही चेपतो अशी भावना वारकऱ्यांची असते. संत तुकरामांसाठी विठुमाऊली ही सबंध जगाची माऊली आहे. तर, एका अभंगात ते त्याला पंढरीचे भूत असेही म्हणतात. (Kartiki Ekadashi 2023)
जो कोणी या पंढरीत येतो त्याला हे पंढरीचे भूत लागते. अन् हे पंढरीचे भूत लागलेला व्यक्ती विठ्ठलाच्या मानस्मरणात दंग होतो, त्याची तहान-भूक हरते अन् हे भूत मनुष्याच्या मानगुटीवरून उतरत नाही, असेच त्या अभंगात संत तुकाराम म्हणतात.
विठ्ठलाची अनेक रूपे आहेत तशी अनेक नावेही आहेत. तुम्ही आजवर पंढरीनाथ, पांडुरंग म्हणून ओळखत असलेल्या विठू माऊलीची अनेक नावे आहेत. ती कोणती हे पाहुयात
माता रूक्मिणीच्या नावावरून - रुक्मिणीकांत, रुक्मिणीवल्लभ, रुक्मिणीनायक, रुक्मिणीप्राणसंजीवन,रखमादेवीवर, बापरखमादेवीवर
लक्ष्मीदेवीचे पती विष्णू - लक्ष्मीकांत, लक्ष्मीवल्लभ, रमाकांत
राधाराणीच्या नावावरून – राधाकांत, राधानाथ, गोपीनाथ
गोपाळांचा सखा – गोविंद, गोपाळ,गोपसखा, कान्हा, यदुनंदन,नंदनंदन
पांडूरंग , पांडूरंग मायबापा, सखा पांडूरंग
कर्नाटकातील भक्तांनी दिलेली नावे – पांडुरंगे, पंढरीगे, कानडा, श्री पुरंदरविठ्ठलराय, व्यंकटाद्री, रमासखा , कानडा विठ्ठल, कर्नाटकु, कानडा राजा
भक्त पुंडलिकावरून नावे – भक्तवत्सल दिनानाथ, पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल, विठेवर उभा म्हणून विठ्ठल, श्री विठ्ठल, तिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल,
विटेवरून पडलेली नावे - विजय विठ्ठल, विठ्ठल ठाकूर, ताकपिठे विठ्ठल, विठाबाई, विठाई, विठू माऊली, सावळा विठू, विठोबा,
सातव्या शतकात शंकराचार्यांनी देवांना काही नावे दिली. सावळे परब्रह्म, परमात्मा, परब्रह्मलिंग, ब्रह्मांडनायक, विश्र्वंभर, विश्वाचाजनिता, सचितानंद,
पंढरपुर नगरीवरून देवांची नावे - पढरीईश, पंढरीचा राजा, पंढरी निवासा, पंढरीचोर, पंढरीचे भूत, श्रीहरी विठ्ठल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.