Bridal  sakal
लाइफस्टाइल

Bridal Fashion: ब्राइडल आउटफिट खरेदीवेळी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

लग्नासाठी शॉपिंग करणे ही थोडी कठीण गोष्ट आहे.

Aishwarya Musale

लग्नसराईचा सिझन आला की बाजारात एकापेक्षा एक फॅशनेबल आउटफिट्स उपलब्ध होतात. लग्नासाठी शॉपिंग करणे ही थोडी कठीण गोष्ट आहे. फक्त तुमच्या ब्राइडल लुकची गोष्ट नसते तर लग्नातील साऱ्या फंक्शनसाठी स्वतःला कसं प्रेझेंट करायचं ही गोष्टही महत्त्वाची असते. मुली जेव्हा ब्रायडल शॉपिंगसाठी जातात, त्यावेळी त्या साधारणत: बेस्ट आउटफीट खरेदी लिमिटेड बजेटमध्ये कशी होईल या विचारात असतात.

कदाचित तुम्हीसुद्धा तुमच्या ब्राइडल लूकसाठी ऑनलाईनपासून ते ऑफलाईनपर्यंत परफेक्ट आऊटफिट शोधले असतील. परंतु कधी कधी इतकी शॉपिंग करूनही मुलींचे समाधान होत नाही. अशा वेळी याचे मुख्य कारण असतं की वधूला खरेदीवेळी आलेलं दडपण. या संदर्भात वधूला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी छोट्या छोट्या गोष्टींचा लक्षात घ्याव्या लागतात. चला तर मग लग्नाच्या खरेदीवेळी शॉपिंग कशी करावी या संदर्भात काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

काही लोकांपासून लांब राहा


मुली जेव्हा वधुच्या शॉपिंगसाठी जातात तेव्हा त्यांच्यासोबत सासरचे आणि माहेरचे लोक असतात. अशा वेळी वधू ते आउटफिट व्यवस्थित घालू शकत नाही. लोकांनी दिलेल्या वेगवेगळ्या सल्ल्यांमुळे परफेक्ट शॉपिंग करणे जिकीरीचे होते. त्यामुळे शॉपिंगला जातेवेळी कमी लोकांना सोबत घेऊन जाणे अधिक हुशारीचे बनते.

योग्य वेळी शॉपिंग 

वेडिंग आउटफिट खरेदी करण्यासाठी योग्य वेळ खूप गरजेची असते. तुम्ही गडबडीत शॉपिंग करणार असाल तर ते चुकीचे ठरू शकते. लेट शॉपिंग झाली तर तुम्हांला हवे तसे आउटफिट मिळणे थोडे कठिण होते. परफेक्ट आउटफिटसाठी वेळ लागू शकतो. यासाठी लग्नाची शॉपिंग तुम्ही आधी एक महिना करू शकता त्याहीपेक्षा आधी शॉपिंग करणे टाळा.

ऑनलाईन सर्च करा 

तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक ट्रेण्डी ब्राइडल दिसायला हवे. तर यासाठी तुम्ही ऑनलाईन रिसर्च जरूर करा. त्यामुळे तुम्हाला लेटेस्ट काही कपड्यांचे ट्रेंज किंवा किंमती बद्दल माहिती मिळू शकते. ऑनलाईन सर्चिंगमुळे ऑफलाईन खरेदी सोपी होऊन जाते. त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत होणाऱ्या चुका टाळल्या जातील.

बजेट तयार ठेवा 

जेव्हा तुम्ही लग्नाच्या शॉपिंगसाठी जाता, तेव्हा तुमचं बजेट फायनल करा. यामुळे अधिकच्या खर्चापासून वाचले जाऊ शकता. अशा शॉप्समध्ये जाणे शक्यतो टाळा जे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल. यामुळे तुमचा जास्तीचा खर्च वाढणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT