अन्नात जे मसाले घातले जातात, ते चविष्ट आणि निरोगी ठेवणे गरजेचे
अन्नात जे मसाले (Spices) घातले जातात, ते चविष्ट आणि निरोगी ठेवणे म्हणचे महत्त्वाचे काम असते. पण हे मसाले नीट ठेवले गेले नाहीत तर लवकर खराब होण्याबरोबरच त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात (Kitchen) वापरले जाणारे मसाले दीर्घकाळापर्यंत सहज कसे फ्रेश ठेवाल तसेच त्यांची चव कशी टिकवून ठेवू शकता हे जाणून घेऊया.
दीर्घकाळ मसाला साठवून ठेवण्याच्या टिप्स-
हवाबंद डब्यात मसाले ठेवा:
हवेच्या संपर्कात आल्यामुळे मसाल्यांची चव लवकर खराब होते. मसाल्यांचा स्वाद टिकवून ठेवण्यासाठी आपण ते काचेच्या किंवा मेटलच्या डब्यात भरून साठवून ठेवू शकता. पावसाळ्यात काचेच्या भांड्यात ठेवलेले मसाले हे प्लास्टिक आणि स्टीलपेक्षा अधिक सुरक्षित असतात. डब्यात मसाले साठवून ठेवताना ते झाकण घट्ट बंद करा. मसाल्याचे पदार्थ जास्त काळ हवेच्या संपर्कात राहून त्वरीत खराब होऊ शकतात.
मसाले फ्रीजमध्ये ठेवू नका:
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की मसाले फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होत नाहीत, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. खूप थंड ठिकाणी ठेवल्याने मसाल्यांची चव पटकन खराब होते. पण हे मसाले हवाबंद काचेच्या बरणीत बंद करून फ्रीजमध्ये ठेवले तर ते दीर्घकाळ ताजेतवाने राहतील आणि त्यांची चवही टिकून राहील.
मीठ:
मसाले साठवताना मसाल्यांच्या मधोमध मीठ घातलं तर ते बराच काळ ताजेतवाने राहतील.
मसाल्याचे डबे ओलाव्यापासून दूर ठेवा:
कधीही मसाले फ्रीजमध्ये साठवून ठेवू नका. मसालेदार पदार्थ काढून टाकतानाही चमचा पूर्ण कोरडा असल्याची खात्री करून घ्या. मसाल्याचे डबे ओलाव्यापासून दूर ठेवा.
डार्क प्लेसमध्ये स्टोअर करा :
मसाले साठवताना नेहमी लक्षात ठेवा की, त्यावर थेट सूर्यप्रकाश पडू नये. अनेक वेळा उन्हामुळे मसाले खराब होण्याचीही शक्यता असते.
मसाल्यांची एक्स्पायरी डेटही लक्षात ठेवा:
मसाले साठवताना त्यांच्या डब्यांवर त्यांची एक्स्पायरी डेट लिहायला विसरू नका. असे केल्याने त्या विकत घेऊन किती दिवस गेला आहे, याची जाणीव होईल. बरेच दिवस न वापरले जाणारे मसाले प्रत्यक्षात आतून खराब होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.