How to Reuse cooking oil: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीत फटाके फोडणे, चकली, चिवडा यासारख्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची मज्जाच वेगळी असते. हे पदार्थ बनवतांना खुप तेल वापरल्या जाते. तसेच अनेक वेळा पदार्थ तळून झाल्यावर तेल खुप उरते. पण त्याचा वापर आपण तसाच न करता काही सोप्या पद्धतींचा वापर करून स्वच्छ करू शकता आणि तेलाचा वापर करू शकता.
वापरलेले तेल थंड करायला ठेवावे. नंतर तेल गाळणीचा वापर करून गाळून घ्यावे. तेलात असलेले मोठे तुकडे सहज निघून जातील. यामुळे तेलाचा वापर करू शकता. याचे कण स्मोकिंग लेव्हल वाढवतात आणि आरोग्यासाठी घातक असतात.
तेल स्वच्छ करण्यासाठी कॉर्न स्टार्चचा वापर करू शकता. यासाठी तेस आणि कॉर्न स्टार्च मंद आचेवर गरम करावे. चमच्याने ढवळत राहावे. नंतर १० मिनिटं कॉर्न स्टॉर्च तेलात गव्हाच्या गोळ्याप्रमाणे तयार होईल नंतर तेल वेगळे करा. तेल गरम करून लिंबू छोट्या तुकड्यांमध्ये कापून त्यावर घाला. असं केल्यानं लिंबाला काळे कण चिकटतील आणि तेल थंड झाल्यावर एका भांड्यात काढा.
तेल वरील पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर योग्य पद्धतीने साठवावे. यासाठी काचेचे किंवा स्टीलचे भांडे वापरू शकता. तसेच स्वच्छ जागेवर भांडे ठेवावे. तुम्ही फ्रिजमध्ये देखील तेल ठेऊ शकता. यामुळे तेल फ्रेश राहील आणि खराब होणार नाही.तसेच जास्त दिवस वापर करू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.