Kitchen Hacks: भारतीय स्वंयपाकघरात आलं-लसूणचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोणताही पदार्थ आलं-लसूणाशिवाय अपुर्ण राहतो. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याचे सेवन केल्यास अनेक आजार दूर राहतात तसेच जेवणाची चव देखील वाढते.
अनेक लोक मोठ्या प्रमाणता लसूण-आलं विकत घेऊन ठेवतात. पण पावसाळ्यात आर्द्रतेमुळे खराब होऊ शकते. अशावेळी हे पदार्थ जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी पुढील सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
लसूण सहा महिने आरामात साठवता येतात. लसूण खरेदी करताना लक्षात ठेवा त्याला कोंब आलेले नसावे. लसूण मोकळ्या हवेत ठेवावे.कोणत्या डब्ब्यात किंवा पिशवीत ठेऊ नका.
अनेक लोक लसूण फ्रिजमध्ये ठेवत नाहीत. तुम्हाला जर लसूण जास्त दिवसांसाठी चांगला आणि ताजा ठेवायचा असेल तर फ्रिजमध्ये ठेवावे. यासाठी लसूण चे तुकडे किंवा पेस्ट करून ठेऊ शकता.
लसूण दीर्घकाळ चांगले राहण्यासाठी लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या सोलाव्या किंवा हवा बंद डब्यात आणि फ्रिजमध्ये ठेवावे. लसूण दोन ते तिन आठवडे चांगले राहते.
एका हवाबंद पिशवीत आलं ठेऊन फ्रिजमध्ये साठवून ठेऊ शकता. हवाबंद पिशवीमुळे ओलावा आणि ऑक्सिजन आल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आले खराब होणार नाही. आल्यावर बुरशी देखील येणार नाही. या पद्धतीने आलं साठवल्यास दोन महिने चांगले राहते.
कापलेले आलं साठवून ठेवायचे असेल तर प्लॅस्टिक पिशवीत बांधून फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे आठवडाभर खराब होणार नाही.
बारिक कापलेले आलं फ्रिजमध्ये हवा बंद डब्ब्यात ठेऊ शकता. यामुळे तुम्ही सहज एक ते दोन आठवडे आलं वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.