Kitchen Hacks  esakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks : चपातीच्या काळवंडलेल्या तव्याकडे बघू वाटतं नाहीय? मिनिटात करा तवा चकचकीत!

चपातीचा तवा चमकवणाऱ्या सोप्या ट्रिक्स

Pooja Karande-Kadam

Kitchen Hacks : घरात वापरला जाणारा चपाती भाजायचा तवा वापरून वापरून इतका काळा पडतो. की कोणी बाहेरची व्यक्ती घरात आली तर आपल्यालाच लाज वाटते. त्यामुळे तवा रोजच स्वच्छ केला जातो. पण, म्हणावा तसा तो स्वच्छ लखलखीत होत नाही.

या तव्यावर केवळ चपातीच नाही. तर, भाकरी, पराठे, ब्रेड भाजण्यासाठीही वापरतात. पण, नियमित वापरल्याने त्यावर तेलाचा थर बसतो. त्यामुळे तो जास्तच काळा पडतो.

तवा केवळ काळा दिसतो म्हणून तो स्वच्छ करावा असं नाहीय. तर, तवा काळा पडल्याने त्यावर कार्बनचा थर बसतो. आणि तवा जाड होतो. त्यामूळे चपाती नीट भाजत नाहीत त्या कच्च्या राहतात. एखाद्या दिवशी वेळ काढून तवा घासला. तरी दुसऱ्या दिवशी परत तो काळाच पडतो. त्यासाठी काय करायचं हे पाहुयात.

तव्यावर साचलेला कार्बन खूप चिकट असतो. खूप प्रयत्न करूनही तो साफ होत नाही. हा कार्बन आपल्या पोटात जाऊन आपल्या आरोग्यालाही हानी पोहोचवतो. म्हणूनच तवा नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे.

मीठ आणि लिंबू

तवा स्वच्छ करण्याच्या कामात तूम्हाला मीठ आणि लिंबाचा वापर करता येऊ शकतो. यासाठी गॅसवर तवा ठेवा आणि त्यावर थोडे पाणी घाला. पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ आणि लिंबाचा रस टाका आणि गॅसचा फ्लेम कमी करा.

गॅस सुरू असतानाच स्क्रबच्या मदतीने तव्याला घासून घ्या. घासल्याने तवा स्वच्छ झाल्यावर तवा खाली उतरा आणि थंड पाण्याने धुवा. तव्यावर जळलेले काळे डाग काही मिनिटांत साफ होतील.

व्हाईट व्हिनेगर

जर तुम्हाला तव्याला नवीन रूप द्यायचं असेल. तर, व्हाईट व्हिनेगर हा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी प्रथम गॅसवर तवा गरम करून त्यावर लिंबाचा रस चोळा. आता त्यावर व्हाईट व्हिनेगर घाला. त्यावर थोडे मीठ देखील शिंपडू शकता.यानंतर स्क्रबने तवा घासा आणि थंड पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा तवा साफ करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एका भांड्यात एक चमचा बेकिंग पावडर, मीठ आणि एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. आता मऊ स्क्रब या तयार मिश्रणात बुडवा आणि त्याने तवा स्वच्छ करा.

तव्यावरील कार्बन

जर तवा खूप जळला असेल तर नुसते साबणाने साफ करून उपयोग होणार नाही. अशावेळी गरम तव्यावर मीठ टाका. त्याचा रंग बदलला की चाकूने कार्बन खरडून घ्या.

तव्यावरील कार्बनचा थर

गरम पाणी

तवा मागून काळा झाला असेल तर, एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात १५ मिनिटे पॅन बुडवून ठेवा. तसेच, पॅनमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिसळा. सॅन्ड पेपरच्या मदतीने हे मिश्रण पॅनवर लावून स्वच्छ करा. हे करताना गरम पाणी सतत वापरत राहा.

टोमॅटोचा रस

जळलेला तवा किंवा कढई स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोच्या रसाचाही खूप उपयोग होतो. तव्यावर टोमॅटोचा रस आणि पाणी टाकून गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर तवा घासून स्वच्छ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT