घरात कितीही स्वच्छता केली तरी कुठे ना कुठे धुळ ही असतेच. स्वयंपाकघरात तर हमखास कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी स्वच्छ करायच्या राहून जातात. तर आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील काही गोष्टी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.
तुम्हाला माहितीय का, चहाची चव वाढवणारी एक गोष्ट तुमचं संपूर्ण स्वयंपाकघर चमकावेल. आत्तापर्यंत तुम्ही चहाच्या पानांचा वापर चवदार चहा बनवण्यासाठी किंवा खत म्हणून केला असेल. काही लोक चहाची पाने वापरल्यानंतर ती निरुपयोगी समजून फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही ज्याला कचरा समजत आहात ते वस्तु स्वच्छ करण्यासाठी खुप उपयुक्त आहे. आता यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण होय.
तुम्ही स्वयंपाकघरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी शिजलेल्या चहा पत्तीचा वापर करु शकता. अनेकदा स्वयंपाक घरातील काही भांडी स्वच्छ करताना नाकेनऊ येते. स्टील, अल्युमिनिअमची भांडी लवकर घासली जातात.
पण प्लास्टिकचे डब्बे, काचेचे डब्बे लवकर घासले जात नाहीत. कितीही घासल तरी अनेकवेळा त्याचा चिकटपणा जात नाही. तर तुम्ही चहाच्या पांनाचा वापर करा. चहा पत्तीमुळं अनेक भांडी स्वच्छ होतात. तर जाणून घेऊयात, चहा पत्तीचा साफसफाईसाठी वापर कसा करायचा?
प्लास्टिकचे डबे असे करा स्वच्छ
प्लास्टिकचे डबे स्वच्छ करण्यासाठी चहा केलेली पत्ती पुन्हा पाण्यात उकळवा. आता हे पाणी गाळून घ्या आणि या पाण्यात २ चमचे लिक्विड डिश वॉश मिसळा. स्पंजने स्क्रब केल्यानंतर हे तयार केलेलं मिश्रण प्लास्टिक डब्यावर लावा. त्वरित चिकटपणा निघून जाईल.
काचेच्या वस्तुदेखील अशाच प्रकारे साफ करा. चहपत्तीचे पाणी आमि डिशवॉश काचेच्या भांड्यांवर पडलेलं डाग आणि चिकटपणा घालवतील. यासोबतच, तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्यांचीही काच स्वच्छ करु शकता. स्वच्छतेसाठी, हे लिक्विड भांड्यांवर लावा आणि स्वच्छ सुती कापडाच्या मदतीने हलक्या हाताने पुसून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे काच पूर्णपणे चमकेल.
सिंक साफ करण्यासाठी चहा पत्ती उपयोगाची
सिंक साफ करण्यासाठी, तुम्हाला प्रथम एका भांड्यात एक चमचा चहाची पाने, 2 चमचे डिटर्जंट पावडर किंवा जेल, 2 चमचे बाथरूम क्लीनर आणि 2 चमचे कॉस्टिक सोडा टाकून ते उकळवावे लागेल. गाळणीतून गाळून झाल्यावर ब्रशच्या साहाय्याने सिंकवर हे लिक्विड पसरवा. 15 मिनिटे असेच ठेवल्यानंतर ते घासून स्वच्छ करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.