Tips For Clean Pressure Cooker esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : करपून काळाकुट्ट झालेला कुकर चुटकीसरशी करा स्वच्छ; या उपयांनी कुकर चमकेल नव्यासारखा!

सकाळ डिजिटल टीम

Tips For Clean Pressure Cooker :

प्रत्येक किचनमध्ये वेगवेगळ्या वस्तू, गोष्टी असतात. काहींच्या घरात ओव्हन असतो तर काहींकडे डबल डोअर फ्रिज असतो. पण, सर्वांच्याच घरात एक वस्तू असतेच ती म्हणजे कुकर. जेवन बनवायची घाई असेल, काहीवेळा भात बनवायचा विसरला असेल, चिकन-मटण पटकन शिजवायचे असेल तर फायद्याची गोष्ट आहे कुकर.

रोजच वापरला जाणार कुकर स्वच्छ मात्र केला जात नाही. तो वरचेवर पाण्याने धुवून वापरला जातो. त्याची खोलवर स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे, तो अधिकच घाणेरडा दिसायला लागतो. आज आपण काही टीप्स पाहुयात.ज्या तुमचा कुकर अधिक चकचकीत आणि स्वच्छ करतील.

बेकिंग सोडा

कुकरवर काळे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त ठरेल. कुकर जिथे काळा आहे, तिथे पाण्याचे काही थेंब 2-3 चमचे बेकिंग सोडा टाका. त्यानंतर स्क्रबरने प्रेशर कुकरला घासून घ्या, यामुळे कुकरचा काळेपणा दूर होईल.

कांद्याचा रस आणि व्हिनेगर

तुम्हाला तुमचा प्रेशर कुकर स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी व्हिनेगर आणि कांद्याचा रस वापरा. ते स्वच्छ करण्यासाठी 4 ते 5 चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात समान प्रमाणात व्हिनेगर मिसळा. आता तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाने प्रेशर कुकर घासून स्वच्छ करा. असे केल्याने डाग आणि तेलकटपणाही निघून जाईल.

व्हिनेगर आणि लिंबू

प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिंबूचा वापर करू शकता. कुकरमध्ये दोन-तीन चमचे व्हिनेगर टाकून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर कुकरमध्ये थोडं कोमट पाणी घाला आणि वीस मिनिटे तसेच ठेवा. यानंतर कुकरला चोथ्याने घासून स्वच्छ करा. तुम्हाला कुकर वरील काळपटपणा दूर झालेला दिसेल.

सेंधव मीठ

काही वेळा पदार्थ उकडत ठेवल्यामुळे प्रेशर कुकर आतून काळा होतो. तेव्हा तो वापरायची सुद्धा इच्छा होत नाही. अशावेळी तुम्ही सैंधव मिठ आणि पाणी एकत्र कुकरमध्ये उकळून घ्या. थोड्यावेळाने स्क्रबने कुकर स्वच्छ करू शकता.

कॉर्न फ्लोअर आणि पाणी

कुकर स्वच्छ करण्यासाठी कुकरमध्ये कॉर्न फ्लॉअर टाका. यामध्ये पाणी टाकून ते उकळून घ्या. काही वेळ पाणी आणि कॉर्न फ्लॉअर उकळल्यानंतर हे पाणी ओतून द्या. त्यानंतर, कुकर स्वच्छ घासून घ्या. तो चकचकीत झालेला दिसेल.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT