Kitchen Hacks : घरात पाल दिसणे हि सामान्य बाब आहे. अर्थात ती घरातल्या भिंतीवर असते ती काही इजा करत नाही. तरीही ती दिसली की लहान मुलं डायनासोर पाहिल्यासारखे किंचाळतात. आणि घरातल्या गृहीणीही दूर पळून जातात.
पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडून गेली तर. बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड मिळत असले तरी ते लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठीही धोकादायक असतात. त्यामूळे पालीला मारण्याचा विचार सहसा कोणी करत नाही.
पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. याशिवाय जेवणामध्ये पाल पडली तर, असं अन्न खाल्लास मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे घरांमधून पाली घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. घरात लहान मुलं असतील तर पेस्ट कंट्रोल करायला भीती वाटते. पाली घरामधून घालवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.
अशाचवेळी पाल पळवून लावण्याचे काही उपाय आहेत. ते उपाय घराच्य किचनमध्येच असतात. ते केल्याने घरातून पाल नाहिशी होते. आणि तूमची आरोग्याची काळजीही दूर होते. त्यामुळेच पाल घालवण्याचे काही उपाय पाहुयात.
स्प्रे
तुम्हाला माहीत नसेल, पण काळी मिरी स्प्रे म्हणून वापरली तर पाल पळून जाचे. यासाठी काळी मिरी पावडरमध्ये पाणी घालून ते एका बॉटलमध्ये ठेवा. पाल दिसली की दुरूनच तिच्या अंगावर ते पाणी स्प्रे करा. त्यामूळे पाल लपून बसणार नाही तर ती घरातून बॅग भरून बाहेर पडेल.
कांद्याचा रस
तुमच्या घरावर ताबा मिळवलेल्या पालीला बाहेर काढण्यासाठी कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. तर, केवळ कांद्याचा रस तुमची मदत करेल.यासाठी कांद्याचा रस घेऊन तो बाटलीत भरून ठेवा. जेव्हाही तुम्हाला भिंतीवर, कोपऱ्यात सरडे दिसेल. तेव्हा लगेच स्प्रे बाटलीने फवारणी करा.
थंड पाणी
पालीला उष्ण जागा आवडतात. म्हणूनच ती कधी बाहेर मोकळ्या वातावरणात दिसत नाही. त्यामुळे तूम्हाला पाल दिसली तर तिच्या अंगावर थंड पाण्याचा शिंतोडा मारा. यामूळेही पाल निघून जाईल.
कॉफी पावडर
पालीपासून मुक्ती मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कॉफीचे गोळे बनवणे. हे गोळे तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवू शकता. यामुळे देखील घरातील पालींची संख्या कमी होते.
मोरपीस
पाली मोरपंखाला घाबरतात. मोरपंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो म्हणून त्या पळतात. घरात प्रत्येक खोलीत मोरपंख ठेवा.
अंड्याच कवच
पाल येण्याच्या ठिकाणी अंड्याचं कवच ठेवल्यानेही पाल घरात येत नाही. खिडक्यांच्या कोपऱ्यात कवच ठेवल्याने पालींना आत येण्यास अटकाव होतो. अंड्याचं कवच दर चार दिवसांनी बदलत राहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.