भांड्याची स्वच्छता करणं किंवा भांडी धुणं हे अनेकांना किचकट काम वाटतं. खास करून लोखंडाची कढई. लोखंडांची कढई सतत वापरून अनेकदा काळी होते तसंच कढईवर चिकट थर साचू लागतो. वेळेत जर कढई स्वच्छ केली नाही तर हा चिकट थर निघणं कठीण होतं. Kithen Hacks Marathi how to clean your metal frying pan
मात्र काळी आणि चिकट झालेली लोखंडाची कढई Frying Pan कशी स्वच्छ करावी हे ठाऊक नसल्याने अनेकजण लोखंडी कढई वापरणं टाळतात आणि नॉनस्टिक कढईचा Non Stick Utensins पर्याय निवडतात.
नॉनस्टिक कढईत स्वयंपाक Cooking बनवणं आणि ती स्वच्छ ठेवणं सोप असलं तरी नॉनस्टिक भांड्यात शिजवलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे लोखंडी कढईचा वापर करणं य़ोग्य. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही लोखंडी कढई स्वच्छ ठेवू शकता.
अगदी कमी पैशात किंवा घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या मदतीने तुम्ही काळी झालेली लोखंडी कढई स्वच्छ करू शकता.
काॅस्टिक सोडा- काळी कढई स्वच्छ करण्यासाठी काॅस्टिक सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात एक चमचा काॅस्टिक सोडा मिसळा. या भांड्यात कढई बुडवून ठेवा. जवळपास अर्धा ते एक तासासाठी कढई या पाण्यात ठेवा. यानंतर कढई स्वच्छ धूवून घ्या. कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा पूर्णपणे दूर होईल,
लिंबू आणि मीठ- लोखंडी कढई स्वच्छ धुण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे लिंबू आणि मीठ. यासाठी तुम्ही वापरलेल्या रस काढलेल्या लिंबाचा देखील वापर करू शकता. यासाठी कढईमध्ये पाणी भरून ते गॅसवर तापवण्यासाठी ठेवा. या पाण्यात एका लिंबाचा रस टाका किंवा तुम्ही लिंबाचे २-३ वापरलेले तुकडे देखील टाकू शकता.
त्यानंतर यात १ चमचा मीठ टाकून पाण्याला उकळी येऊ द्या. ५ मिनिटांसाठी पाणी उकळल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर पाणी ओतून स्क्रबरच्या मदतीने कढई स्वच्छ घासा. यामुळे कढईचा काळपटपणा पूर्ण दूर होऊन कढई नव्या प्रमाणे चमकू लागेल.
हे देखिल वाचा-
डिटर्जंट आणि बेकिंग सोडा- सतत वापरून काळी झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते तापवत ठेवा. या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापू द्या.
त्यानंतर या गरम पाण्यात कढई १५ ते २० मिनिटांसाठी बुडवून ठेवा. कढई पाण्यातून काढून स्क्रबरच्या मदतीने स्क्रब करा. यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा- काळी आणि चिकट झालेली लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी कढईत पाणी भरून गॅसवर तापत ठेवा. पाण्यामध्ये १-२ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा बेकिंग सोडा टाकून मिसळा.
२-३ मिनिटांसाठी पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी फेकून लिक्विड डिटर्जंट आणि स्क्रबरच्या मदतीने कढई घासा यामुळे कढई पुन्हा एकदा चमकू लागेल.
अशा प्रकारे घरातीलच वस्तू किंवा अगदी स्वस्त गोष्टी वापरून तुम्ही काळी आणि चिकट झालेली लोखंडाची कढई अगदी सहज स्वच्छ करू शकता. शिवाय लोखंडाची कढई वापरत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.
लोखंडाच्या कढईत पदार्थ शिजवल्यानंतर ते लगेचच दुसऱ्या भांड्यात काढावेत.
पदार्थ काढल्यानंतर कढई लगेचच डिटर्जंटने घासून स्वच्छ धुवून ठेवावी.
कढई धुतल्यानंतर ती पूर्ण कोरडी करून ठेवावी.
कढईचा लगेच वापर होणार नसेल तर कढई कोरडी करून तिला थोडं तेल लावून ठेवावं.
यामुळे कढईला गंज पकडत नाही.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.