Know how to Develop your Personality Read Full Story Latest News  
लाइफस्टाइल

तुमच्या व्यक्तीमत्वाची प्रत्येकानं दखल घ्यावी असं वाटतंय? मग 'या' गोष्टी नक्की करून बघा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतो त्यावेळी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. साधारणतः समोरच्या व्यक्तीचे कपडे, हावभाव, बोलणं, वागणं आणि दिसणं या गोष्टी आपल्याला आवडतात म्हणूनच आपण त्यांच्याशी बोलतो. आपल्यातही असे गुण असावेत किंवा आपलं व्यक्तिमत्व असं असावं असं अनेकदा आपल्याला वाटतं. पण एक व्यक्ती म्हणून आपण खरंच इतके प्रभावी आहोत का? हा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे. 

मुलाखतीसाठी जाताना किंवा कार्यक्रमाला जाताना अनेकदा आपल्याला इतरांपेक्षा कमी आत्मविश्वास असतो. म्हणूनच आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी समजतो. मात्र आता घाबवृ नका. ही बातमी वाचल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास मदत होणार आहे. तसंच तुमची एक वेगळी छाप सगळ्यांवर पडणार आहे. 

या गोष्टी एकदा करून बघा: 

इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका

सर्वांना नेहमीच त्यांना काय वाटतं हे सांगायचं असतं. मात्र आपलं कोणीतरी ऐकण्यासाठी इतरांचं ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. आजकाल सर्वजण आपलं मत ओरडून ओरडून सांगत असतात. मात्र इतर काय सांगत आहेत याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. जर तुम्हाला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व व्हायचं असेल तर इतरांना कान द्या. इतरांना कान द्या म्हणजे इतरांना काय म्हणायचं आहे हे लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही जाणिवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक इतरांचे मत ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये त्यांच्या समस्या दूर करण्याची क्षमता आपोआप येते. 

इतरांशी बोलताना हसून बोला

तुम्ही बोलताना कसे बोलता हे फार महत्त्वाचे आहे. काही लोकांच्या तोंडावर बोलताना काहीच हावभाव नसतात. मात्र बोलताना जर तुम्ही फक्त हसून बोलला तर तुमचं बोलणं इतरांपर्यंत लगेच पोहचू शकतं. हसून बोलणाऱ्या लोकांशी इतर लोक लवकर जोडले जातात.

तुमच्या पेहारावाबाबत सतर्क राहा

तुमचा पेहराव हा तुमच्या व्यक्तीमत्वाचा एक भाग असतो. यासाठीच नेहमी चांगला पेहराव करा. नीटनेटक्या आणि स्वच्छ पेहरावामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते. कारण तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सर्वात आधी लोकांच्या नजरेत येतात ते तुमचे कपडे आणि पेहराव केलेल्या इतर गोष्टी. यासाठी टापटिप आणि आकर्षक राहण्याचा प्रयत्न करा. 

संयम राखा आणि शांत राहा

माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो अथवा जी व्यक्ती रागीट, चिडचिड करणारी असते ती वेळ पडल्यावर योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही.

इतरांशी नम्रपणे आणि काळजीपूर्वक बोला

इतरांशी जोडले जाण्याचा संवाद हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. बोलण्यातून तुमचे व्यक्तिमत्व इतरांना समजत असते. तुम्ही  जसे असता तसेच तुम्ही बोलत असता. म्हणूनच जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक आणि नम्रपणे इतरांशी बोलता तेव्हा तुमच्याबद्दल चांगल्या भावना इतरांच्या मनात निर्माण होत असतात.

वाचन करा 

वाचन, श्रवण  आणि मार्गदर्शन हे व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. यासाठीच चांगली पुस्तके वाचा ज्यामुळे तुमच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT