कारमध्ये लाॅक झाल्यास? Esakal
लाइफस्टाइल

Car Safety Tips : कारमध्ये लॉक झालात तर काय कराल?

जर तुम्ही कारने प्रवास Car Travel करत असाल तर तुम्हाला कार लॉक झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, कशाप्रकारे कारच्या बाहेर पडू शकता याची माहिती असणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

कारने प्रवास करणं हे अत्यंत सोयीचं आहे. पण जर कधी तुम्ही कारमध्ये लॉक झालात तर? खरं तर हा विचारच अत्यंत थरकाप उडवणारा आहे. दरवर्षी अशा घटना Accidents घडल्याचं आपण एकत असतो. दुर्दैवाने अशा काही घटनांमध्ये काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. Know how to escape if your car is locked when you are inside Marathi Safety tips

कारमधील काही तांत्रिक बिघाडामुळे Technical Fault कार अचानक लॉक होण्याची संभावना टाळता येत नाही. अशावेळी तुम्ही जर कारच्या आत अडकला असाल तर टेंशन Tension येणं सहाजिक आहे. मात्र कारच्या आत लॉक झाल्यानंतर सर्वप्रथम शांत राहणं गरजेचं आहे.

कारण जर तुम्ही घाबरलात किंवा खूप जास्त गोंधळात पडलात, तणावात गेलात तर तुम्हाला विचार करणं आणि मार्ग सापडणं जास्त कठिण होवू शकतं. यासाठी सर्वप्रथम शांत राहण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्ही कारने प्रवास Car Travel करत असाल तर तुम्हाला कार लॉक झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, कशाप्रकारे कारच्या बाहेर पडू शकता याची माहिती असणं गरजेचं आहे. असे काही पर्याय किंवा टुल्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कारच्या बाहेर येऊ शकता.

सार्वजनिक ठिकाणी कार लॉक झाल्याल ही काळजी घ्या

जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा रहदारीच्या ठिकाणी तुम्हीची कार लॉक झाली आणि तुम्ही कारमध्ये अडकलात तर तुमच्याकडे इतरांची मदत घेण्याचा पर्याय असतो.

यासाठी सर्वप्रथम कारच्या खिडक्या उघडताहेत का याचा प्रयत्न करा. पाॅवर विंडोची सर्व बटनं दाबून पहा. खिडकी उघडल्यास तुम्ही कारमधून बाहेर पडू शकता.

तसंच तुम्ही जोरात हॉर्न वाजवून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता. अनेकदा कार लॉक झाल्यानंतर ती बाहेरून सहज उघडते. त्यामुळे तुम्ही इतरांना सांगून कारचं दार उघडण्यास मदत मिळवू शकता.

घराच्या किंवा कार्यालयाच्या आसपास असाल आणि जर तुमच्या कुटुंबातील किंवा कार्यालयातील व्यक्ती जवळपास असेल तर तुम्ही कॉल करून देखील मदत मागवू शकता.

हे देखिल वाचा-

गाडीची काच तोडा

कारमध्ये कायम काही गरजेचं टूल्स ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रसंगी ते कामी येऊ शकतात. कार लॉक झाल्यास कार बाहेर पडण्यासाठी तुम्ही कारची काच फोडू शकता. यासाठी टूलकिटमधील हॅमर किंवा ग्लास कटर तुमच्या कामी येऊ शकतं. यामुळे कारची काच सहज तोडली जाऊ शकते.

जर तुमच्याकडे हातोडी किंवा ग्लास कटर असे टूल्स नसतील तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारच्या सीटला हेडरेस्ट देण्यात आलेलं असतं. हे हेडरेस्ट सहज निघतं. हेडरेस्ट काढून तुम्ही काच फोडू शकता. तसंच जर कारमध्य एखादी इतर जड वस्तू असेल तर तुम्ही तिच्या मदतीने देखील काच फोडू शकता.

कारची कोणती काच तोडावी

कारची काच तोडताना विंडशिल्ड किंवा मागील मोठी काच फोडण्याचा विचार कदाचित तुमच्या मनात येईल. मात्र अपघातात संरक्षण व्हावं यासाठी याचा खास सेफ्टीचा विचार करून मजबूत बनवण्यात आलेल्या असतात. या काचा फोडणं अवघड जाऊ शकत. यासाठी खिडकीची काच तोडा.

काच तोडताना काचेच्या मध्यभागी प्रहार न करता काचेच्या कोपऱ्यामध्ये करावा. यामुळे काच सहज तोडणं शक्य आहे.

बूट किंवा डिकीतील इमरजन्सी Exit

अनेक कारमध्ये बूट किंवा डिकीमध्ये इमनजन्सी एक्झिट देण्यास आलेला असतो. अनेकांना या बद्दल कल्पना नसते. तुम्ही मागील सिट खाली करून किंवा फोल्ड करून बूटपर्यंत पोहचू शकता. इथं बूट डोर उघडण्यासाठीचा स्विच असतो. ज्यामुळे तुम्ही बूट डोर ओपन करून बाहेर पडू शकता. मात्र हा पर्याय प्रिमियम आणि SUV किंवा KUV कारमध्ये असतो.

अशा प्रकारे तुम्ही कारच्या आत लॉक झाल्यानंतरही विविध पर्यायांचा विचार करून कारच्या बाहेर पडू शकता. शिवाय कायम सोबत सेफ्टी टूल ठेवण्यास विसरू नका.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT