Car Purchase करणं म्हणजे प्रत्येकासाठीच आनंदाचा क्षण असतो. कार खरेदी करत असताना अनेकजण नेमकी कोणती कार खरेदी करावी? तिचं बजेट Budget किंवा रंग कोणता असावा? यासाठी मोठी तयारी करतात.
खास करून प्रत्येकजण कोणतीही कार खरेदी करत असताना त्यात बचत कशी होईल, जास्तीत जास्त कश्याप्रकारे सवलत Discount मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील यासाठी प्रयत्नशील असतो. Know How to save money while buying new car from dealer
Car Purchase करत असताना डीलरशीपकडून विविध ऑफर आणि सवलती दिल्या जात असतात. यामुळे आपल्याला आपली मोठी बचत Saving झाली किंवा आपले लाखभर रुपये वाचले याचा आनंद असतो. मात्र कार खरेदी केल्यानंतर तिच कार इतर व्यक्तीने आणखी कमी किमतीत खरेदी केल्याचं अनेकदा लक्षात येत मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते.
खरं तर अनेकदा डिलरकडून विविध गॅजेट्स किंवा इन्श्युरन्स अशा विविध गोष्टींमध्ये मोठं डिस्काउंट देण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात ही एका प्रकारची मार्केटिंग स्किल असते. ज्यामुळे तुम्हाला मात्र लाखभर रुपयांचा चुना लागतो. त्यामुळे कार खरेदी करत असताना अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे लाख रुपये वाचू शकता. या गोष्टी कोणत्या ते जाणून घ्या.
कारच्या किंमतीसोबतच जाणून घ्या या गोष्टी
अनेकजण कार खरेदी करण्यापूर्वी रिसर्च करत असताना विविध कारच्या मॉडलच्या ऑनरोड आणि एक्स शोरुम किंमतींची तुलना करतात. मात्र कार खरेदी करत असताना ऑनरोड किंमतीसोबतच त्या किंमतीमध्ये काय काय देण्यात येत आहे किंवा कारसोबत काय मिळतंय हे तपासणं गरजेचं आहे.
अनेकदा कारच्या ऑनरोड किंमतीमध्ये डिलरकडून अनेक गोष्टींची किंमत जोडून लावण्यात येते. इथेच तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे ही ऑनरोड किंमत आणि त्यात समाविष्ट गोष्टी पडताळणं गरजेचं आहे.
हे देखिल वाचा-
अॅक्सेसरी किटची किंमत तपासा
अनेकदा डीलरकडून कार खरेदी करणाऱ्याला अॅक्सेसरीज किटबद्दल विचारणा न करताच त्याची किंमत कारच्या किंमतीमध्ये जोडण्यात येते. खरं पाहता हे किट खरेदी करावं की नाही? ते डीलरशीपकडूनच खरेदी करावं का इतर ठिकाणाहून हा निर्णय सर्वस्वी कार खरेदीदाराचा असतो.
या अॅक्सेसरी किटमध्ये कार मॅट, सीट कव्हर्स, स्टीयरिंग कव्हर, मड फ्लॅप्स अशा काही अॅक्सेसरीजचा समावेश असतो. या अॅक्सेसरीज किटची डीलरशीपला मोठी किंमत लावली जाते. जवळपास १० ते १५ हजार रुपये या किटचे कारच्या किंमतीमध्ये जोडले जातात. तुम्ही हे किट खरेदी करण्यास नकार देऊ शकता. ज्यामुळे तुमची बचत होईल.
अंडर बॉडी कोटिंग
त्याचप्रमाणे काही वेळेस डीलरशीपकडून कारमध्ये खरेदीदाराला न विचारताच अंडर बॉडी कोटिंग बसवण्यात येतं आणि त्यासाठी मोठी किंमत मोजली जाते. खरं तर अनेक नव्या कारमध्ये या कोटिंगची गरज नसते. कारण अनेक कार कंपन्या ज्या ठिकाणी अंडर बॉडी कोटिंगची आवश्यकता आहे, तिथे कोटिंग करून देते.
डीलरकडून मात्र या कोटिंगच्या नावाखाली पैसे उकळले जाऊ शकता. अंडर बॉ़डी कोटिंगचा खर्च तुम्ही वाचवू शकता. कार खरेदी करताना हे कोटिंग नको असल्याचं सांगून तुम्ही चक्क २० ते ३० हजारांची बचत करू शकता.
एक्सटेंडेड वॉरंटी
अनेकदा डीलरशीपकडून कार खरेदी केल्यानंतर एक्सटेंडेट वॉरंटीसाठी विविध प्लान सांगितले जातात. मात्र कार खरेदी करताना एक्सटेंडेट वॉरंटी घेण बंधनकारक नाही. त्यामुळे तुम्ही यास नकार देऊ शकता. काही वेळेस कार विक्रेत्याकडून खरेदीदाराला न विचारताच ही किंमत जोडून एक्सटेंडेड वॉरंटी दिली जाते. त्यामुळे तुमचं इनवॉइस आणि बिल नीट तपासून घ्या.
अशा प्रकारे कार खरेदी करत असताना तुम्हाला नको असलेल्या अॅक्सेसरीज किंवा इतर गोष्टींचे चार्ज तुमच्या कारच्या ऑन रोड किमतीमध्ये जोडण्यात आलेले नाहीत हे नीट पडताळून पाहिल्यास तुमचे पैसे नक्की वाचतील.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.