new car buying guide in Marathi Esakal
लाइफस्टाइल

New Car खरेदी करताय? मग या टिप्स वापराल तर होईल मोठी बचत

new car buying tips: कार विक्रेते डिलर हे त्यांच्या व्यवसायात अर्थातच नफा Profit कमावण्यासाठी कारच्या किमती काहीशा वाढवून सांगतात. तर दुसरीकडे त्यांना ग्राहक देखील गमवायचा नसतो. यासाठी जर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या आणि डिलरशी चर्चा केली तर तुम्हाला एखादं चांगलं डील मिळू शकतं

Kirti Wadkar

कार खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र कार खरेदी करण्यासाठी लाखोंचं बजेट Budget असणं गरजेचं आहे. कार ही एक मोठी गुंतवणूक असल्याने खूप विचारपूर्वक कार निवडणं किंवा बजेट ठरवावं लागतं. Know How To save money while purchasing new car from dealer

अशा वेळी तुमच्या पसंतीची कार खरेदी Car Purchase करत असताना काही वेळेस तुम्हाला ती महाग वाटल्याने तुम्ही कारचं मॉडेल Car Model बदलण्याचा विचार करू शकता. मात्र जर तुम्ही काही हजारांसाठी तडजोड करत असाल तर थांबा.

कार विक्रेते डिलर हे त्यांच्या व्यवसायात अर्थातच नफा Profit कमावण्यासाठी कारच्या किमती काहीशा वाढवून सांगतात. तर दुसरीकडे त्यांना ग्राहक देखील गमवायचा नसतो. यासाठी जर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या आणि डिलरशी चर्चा केली तर तुम्हाला एखादं चांगलं डील मिळू शकतं.

एकीकडे जरी डीलरला जास्त नफा मिळवण्याच्या ट्रीक ठाऊक असल्या तरी दुसरीकडे जर तुम्ही देखील काही ट्रीक वापरून मॅनेजरशी चर्चा करून काही ऑफर आणि सूट मिळवू शकलात तर तुमचं कारचं स्वप्न पूर्ण होईल.

ऑफर

नवी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ठरवलेल्या कारची संपूर्ण माहिती ऑनलाइन गोळा करा. विविध ऑनलाइन साईटवर उपलब्ध असलेल्या किमतींची तुलना करा. तसंच अनेक ऑटोमोबाईल कंपन्या कार खरेदीवर विविध ऑफर्स देत असतात. या ऑफर्सची माहिती जाणून घ्या.

बहुतांश लोक लोन Car Loan घेऊन कार खरेदी करत असतात. अशावेळी बँकांकडूनही व्याज दरात आणि कार खरेदीवर विशेष सूट असते. याची माहिती करून कार खरेदी केल्यास तुमची बचत होईल.

हे देखिल वाचा-

अॅक्सेसरीज पॅकेज

कार खरेदी करताना अनेकदा त्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या सर्व अॅक्सेसरीज असतीलच असं नाही. सीट कव्हर, स्पीकर, मॅट अशा अॅक्सेसरीज अनेकदा कारसोबत येत नसल्याने वेगळ्या खरेदी कराव्या लागतात. शिवाय जेव्हा तुम्ही डीलरकडे कार खरेदी करण्यास जाता तेव्हा सेल्स टीमकडून विविध अॅक्ससेरीज तुम्हाला विकण्याचा प्रयत्न केला जातो.

या अॅक्सेसरीजची काही वेळा किंमत अधिक असू शकते. तेव्हा तुम्ही त्या विकत घेण्यास नकार देऊन बचत करू शकता. तसंच तुम्ही डीलरशीपला काही अॅक्सेसरीज फ्रि देण्यासाठी आग्रह करा किंवा अॅक्सेसरीजचं एखादं पॅकेज तयार करून त्यावर मोठी सूट मागा. इथं पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.

इन्श्युरन्स

अनेकदा डीलर कारसोबत विमा देतात. या विम्याचा प्रीमियम हा ग्राहकालाच भरावा लागतो. इन्श्युरन्स कंपनीसोबत काही करार किंवा बिझनेस पार्टनरशीपमुळे हे प्रिमियम अनेकदा महाग असतात. त्यामुळे डीलरकडून कारचा विमा घेणं टाळा. त्याएवजी तुम्ही ऑनलाइन काही कंपन्या सर्च करून स्वस्तात विमा घेऊ शकता.

याचसोबत जर तुम्हाला एक्सेंडेड वॉरंटीची गरज भासत नसल्यास तुम्ही तो पर्याय रद्द करून थोडी बचत करू शकता. अशाप्रकारे कार खरेदी करताना माहिती गोळा करून योग्य डील केल्यास कार खरेदीवर तुमची मोठी बचत होईल.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT