इतिहास महिंद्रा थारचा Esakal
लाइफस्टाइल

दुसऱ्या महायुद्धामुळे बनली Mahindra Thar; World War मधील अमेरिकेच्या सहभागामुळे थारची निर्मिती

सध्या भारतीय बाजारात महिंद्रा थारला Mahindra Thar मोठी मागणी आहे. यापूर्वी देखील महिंद्राच्या विविध जीप मॉडेलला Jeep Models भारतात मोठी पसंती देण्यात आली होती. मात्र सध्या बाजारात थारला मोठी मागणी असून थारची हवा पाहायला मिळतेय

Kirti Wadkar

महिंद्रा कंपनीची थार चांगलीच लोकप्रिय आहे. थार ही एक जीप मॉडल असली तरी तिचा रांगडा रुबाब रस्त्यावरील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा आहे. थार कार Thar म्हणजे एक स्टेटस सिंबल आहे. मार्केटमध्ये अनेक प्रिमियम आणि लक्झरी अशा कोट्यवधींच्या कार्स असल्या तरी महिंद्रा थारची एक स्वत:ची वेगळी ओळख आहे. Know the history of todays most popular Mahindra Thar Luxury Car

सध्या भारतीय बाजारात महिंद्रा थारला Mahindra Thar मोठी मागणी आहे. यापूर्वी देखील महिंद्राच्या विविध जीप मॉडेलला Jeep Models भारतात मोठी पसंती देण्यात आली होती. मात्र सध्या बाजारात थारला मोठी मागणी असून थारची हवा पाहायला मिळतेय. जितकी ही गाडी खास आहे तितकाच तिचा भारतातील निर्मितीचा प्रवास खास आहे.

दुसऱ्या महायुद्धात जीपची निर्मिती

भारतीय बाजारातील जीपची एंट्री आणि भारतातील जीपची निर्मिती यामागे एक खास इतिहास आहे. जीपच्या निर्मितीसाठी खरं तर दुसरं महायुद्ध हे एक मोठं कारण आहे आणि दुसरं तितकचं महत्वाचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचा सहभाग.

१९४० सालामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. यावेळी दुसऱ्या World War मध्ये अमेरिकेने देखील सहभाग घेण्यास तयारी सुरु केली. अमेरिकेच्या युद्ध विभागाला US War Department तयारी करत असताना काही खास गाड्यांची गरज लक्षात आली. ज्या गाड्या भक्कम असतील मात्र टँक किंवा ट्रकपेक्षा हलक्या असतील. जेणेकरून खराब रस्त्यांवर त्या सहज चालतील. शिवाय खड्डे किंवा चिखलात अडकल्यास त्या काढणं सैनिकांना शक्य होईल.

हे देखिल वाचा-

अमेरिकेने अशा गाड्या तयार करण्याची जाहिरात ऑटोमोबाईल कंपन्यांनाना उद्देशून दिली. मात्र या गाड्या अगदी कमी वेळेत तयार करण्याची अट असल्याने केवळ २ कंपन्या पुढे आल्या.

बँटम आणि विलिज या दोन कंपन्या पुढे आल्या. यात विलिजने थोडा वेळ वाढून मागितला. याला अमेरिकेने नकार दिला. दुसरीकडे बँटम कंपनीची स्थिती खराब असतानाही बँटमने पहिला प्रोटोटाइप तयार केला. या पहिल्या BRC-40 ला पहिली पसंती देण्यात आली. मात्र अगदी कमी वेळेत बँटमला आवश्यक निर्मिती करणं अशक्य असल्याने गाडी डिझाइन करण्याचं काम विलीज आणि फोर्ड मोटरला सोपण्यात आलं. या नव्या गाडीसाठी विलिज कंपनीचं 60Hpचं गो डेव्हिल पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार होतं.

अशा प्रकारे दोन कंपन्यांच्या मदतीने दोन जीपचा जन्म झाला. Willys MB आणि Ford GPW।. यात गाड्यांमध्ये अमेरिकी सेनेकडून काही बदल करण्यात आले. यानंतर सेनेला Willys MB आणि Ford GPW model देण्यात आले. या गाड्यांना जीप म्हंटलं जाऊ लागलं. १९४३ सालामधये विलिज कंपनीने जीप Jeep ला एक ब्रॅण्ड म्हणून रजिस्टर केलं होतं.

अमेरिकेच्या सर्व सुरक्षा दलांमध्ये जीपचा वापर केला जाऊ लागला. महायुद्धाच्या शेवटापर्यंच जवळपास ६ लाख ४० हजार जीप तयार करण्यात आल्या होत्या. या गाड्या युद्धात अॅम्ब्युलन्स म्हणूनही वापरल्या जाऊ लागल्या.

१९४५ सालामध्ये युद्ध संपल्यानंतर लष्करातील जीपची मागणी घटली. त्यानंतर उरलेल्या जीप सामान्य लोकांसाठी बाजारात आणल्या गेल्या. जीपची बाजारात मागणी वाढत असल्याचं पाहून विलिज कंपनीने सामान्यांसाठी सिव्हिलियन जीप मॉडेल लॉन्च केलं. CJ-2A या मॉडलला फारशी पसंती मिळाली नाही.

भारतात अशी झाली जीपची एंट्री

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात भारतातील आघाडीचे बिझनेसमन जगदीश चंद्र महिंद्रा आणि कैलाश चंद्र महिंद्रा यांनी अमेरिकेचे काही दौरे केले होते. यावेळी जीपनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने विलिज कंपनीसोबत करार केला आणि स्वातंत्र्य मिळताच १९४७ सालामध्ये भारतात ७५ जीप आयात करण्यात आल्या.

सुरुवातीला मुंबईमध्ये विलिज कंपनीच्या जीप असेंबल करण्यात येत. त्यानंतर १९४९ सालामध्ये विलिज कंपनीने भारतात CJ-3A कंपनीचं उत्पादन सुरु केलं आणि भारतात पहिली ऑफ रोड कार तयार करण्यात आली.

हे देखिल वाचा-

महिंद्राच्या पहिल्या ऑफ रोड कारला भारतीयांची पसंती

महिंद्राने तयार केलेल्या विलिज CJ-3A जीपला भारतीय मार्केटमध्ये मोठी पसंती मिळाली. यानंचर ४ वर्षातच ही जीप अपग्रेड करून CJ-3B मॉडेल लॉन्च करण्यात आलं. महिंद्राचं हे पहिलं SUV मॉडल होतं.

यानंतर भारतात ऑफ रोड कारचा बोलबाला वाढला. त्यानंतर महिंद्रा विलिज कंपनीतून विभक्त झाली. १९८५ सालामध्ये CJ-3B जीपचा लूक बदलून Mahindra MM 540 हे नाव देण्यात आलं. विलिजपासून विभक्त झाल्यानंतर Mahindra MM 550 ही जीप लॉन्च केली.

त्यानंतर महिंद्रा क्लासिक लॉन्च झाली. २००० सालामध्ये महिंद्रा रक्षण तर २००६ सालामध्ये महिंद्रा लिजंड लॉन्च झाली. गाड्या लॉन्च होत असल्या तरी मागणी थोडी कमी होत होती. त्यानंतर २१व्या शतकाच्या सुरुवातीला आली बोलेरो आणि स्कॉर्पियो. या गाड्या लॉन्च झाल्यानंतर जीपची मागणी आणखी घटली.

त्यानंतर २०१० मध्ये महिंद्राने महिंद्रा थार लॉन्च केली आणि कारप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. थारला भारतीयांची पसंती मिळू लागली. २०१५ सालामध्ये थारचं पहिलं अपग्रेड करण्यात आलं.

त्यानंतर नवे नियम लक्षात घेत २०१९ सालामध्ये कंपनी ने Mahindra Thar 700 Signature Edition लॉन्च केलं. यावर आनंद महिंद्रा यांची सही आणि स्टिकर लावून मार्केटिंग करण्यात आलं.

तर २०२० सालामध्ये कंपनीने थारचं नवं व्हर्जन लॉन्च केलं. ज्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. आजवर जवळपास या गाडीचे १ लाख युनिट् विकण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT