Personal Accident Cover benefits Esakal
लाइफस्टाइल

तुमच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी Personal Accident Cover गरजेचं

Personal Accident Cover म्हणजेच व्यक्तीगट दुर्घटना विमा Insurance ही एका प्रकारची पॉलिसी आहे. ज्यामुळे आकस्मिकरित्या आलेलं अपंगत्व किंवा मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानातून सावरण्यास मदत होते

Kirti Wadkar

कोणाच्या आयुष्यात एकादी दुर्दैवी घटना कधी घडेल याचा काही नेम नाही. एखादी दुर्घटना किंवा अपघातामुळे त्या व्यक्तीचं आणि त्याच्या कुटुंबियांच संपूर्ण आयुष्यचं बदलून जातं. Know the Importance of Personal Accident Cover for your Family

एखाद्या व्यक्तीच्या अपघतानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबावर Family दु:खाचा डोंगर तर कोसळतोच मात्र एखाद्या गंभीर दुखापतीवरील उपचारांवर Treatment होणाऱ्या मोठ्या खर्चाचा त्यांच्यावर प्रचंड ताण येऊ शकतो.

अशा कठिण काळी व्यक्तीवर किंवा त्याच्या कुटुंबावर आर्थिक ताण येऊ नये यासाठीच पर्सनल अॅक्सिडंट कव्हर Personal Accident Cover असणं गरजेचं आहे.

Personal Accident Cover म्हणजेच व्यक्तीगट दुर्घटना विमा Insurance ही एका प्रकारची पॉलिसी आहे. ज्यामुळे आकस्मिकरित्या आलेलं अपंगत्व किंवा मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानातून सावरण्यास मदत होते.

या पॉलिसीमध्ये अपघातामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा कोणताही भाग त्याने गमावल्यास, अपंगत्वामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाला एकरकमी रक्कम मिळते. यासाठीच हा विमा असणं गरजेचं आहे. या विमाच्या इतर काय फायदे आणि आणि तो काढणं का गरजेचं आहे. हे जाणून घेऊयात.

Personal Accident Coverमध्ये या दुर्घटनांचा समावेश

दुर्घटना किंवा अपघात म्हंटलं की अनेकांना केवळ रोड एक्सिडंट असा विचार समोर येतो. मात्र या विम्यामध्ये अनेक दुर्घटनांचा समावेश केला जातो. यामध्ये अगदी बाथरुममध्ये पडल्यापासून ते जीममध्ये वर्कआउट करताना झालेली दुखापतही कव्हर होते.

तसंच गॅस सिलेंडर ब्लास्ट, विजेचा झटका, पाण्यामध्ये बुडणे आणि खेळामध्ये झालेली दुखापत अशा सर्वच दुर्घटनांना कव्हर केलं जात. त्यामुळे हा विमा घेणं गरजेचं ठरतं.

पर्सनल ऍक्सीडेंट इंश्युरंस प्रीमियम

या विम्याचा प्रिमियम हा व्यक्तीने कव्हर केलेल्या एकूण रक्कमेवर आणि व्यक्तीच्या नोकरीच्या श्रेणीवर अबलंबून असतो. ज्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये अधिक धोका आहे, त्यांचा प्रिमियम हा सुरक्षित नोकरी असलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त असू शकतो.

तुम्हाला किती कव्हर हवं आहे यावर तुमचा प्रिमियम ठरत असतो. साधारणपणे तुम्ही वार्षिक पगाराच्या १५-२० पट कव्हर घेणं फायदेशीर ठरतं. हे विमा अत्यंत स्वस्त असतात.

शिवाय Personal Accident Cover पॉलिसी घेतल्यानंतर कोणत्याही वेटिंग पिरियड शिवाय पहिल्या दिवसापासून तुम्हाला कव्हेर लागू होतं. मृत्यू सोबतच एखाद्या दुर्घटनेत अपंगत्व आल्यास तुम्हाला या पॉलिसीची मदत होते.

या विकलांगता होतात कव्हर

कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व - विकलांगतेच्या या प्रकारात एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या एखाद्या महत्वपूर्ण अवयवास मोठी दुखापत झाल्यानंतर पूर्णपणे एखादा अवयव निकामी झाल्यास कव्हर मिळू शकते. यामध्ये पूर्ण अंधत्व, दोन्ही हात गमावणं, पाय गमावणं, बहिरेपण, मानसिक संतुलन गमावणं अशा काही पूर्ण अपगंत्वामध्ये पॉलिसी विम्याची पूर्ण रक्कम दिते.

कायमचे अंशिक अपंगत्व- यामध्ये वक्तीच्या कोणत्याही एका अवयवास अपंगत्व आल्यास कव्हर दिलं जातं. ज्यामध्ये एक हात गमावणं, ऐकण्याची क्षमता कमी होणं. एका डोळ्याची दृष्टी जाणं, हाताची किंवा पायाची काही बोटं गमावणं अशा दुर्घटनांचा समावेश होतो.

अशा स्थितीमध्ये विम्याच्या रक्केमचा काही टक्के भाग दिला जातो. यासाठी विमा घेतानाच एक लिस्ट दिली जाते. ज्यामध्ये कोणत्या अपंगत्वासाठी किती टक्के विम्याची रक्कम दिली जाईल हे सांगण्यात आलेलं असतं.

हे देखिल वाचा-

तात्पुरते संपूर्ण अपंगत्व- जर एखादी व्यक्ती एखाद्या अपघातामुळे काही काळासाठी अंथरुणाला खिळली असेल. तिला तात्पुरत अपंगत्व आलं असेल तर ही श्रेणी ग्राह्य धरली जाते. यामध्ये प्रत्येक आठवड्याला ठराविक रक्कम विमा धारकाला किंवा त्याच्या कुंटुबाला दिली जाते.

या तीन श्रेणींशिवाय मृत्यूनंतरही कुटुंबाला विम्याची रक्कम दिली जाते. यासाठीच अपघातांमुळे आलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी Personal Accident Cover महत्वाचं ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा

Share Market Today: शेअर बाजारात काय होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

IND vs AUS : विराट कोहलीचा डिफेन्स, जसप्रीचा बाऊन्सर अन् टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला चॅलेंज, Video

Latest Maharashtra News Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

'महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका'; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT