Tyre Codes: कारचे व्हिल्स किंवा टायर हा कारचा Car Tyres एक महत्वाचा भाग आहे. खरं तर संपूर्ण कारचं आणि कारमधील प्रवाशांचा भार या टायरवर असतो. शिवाय टायर्स चांगले असतील तर तुमचा प्रवासही चांगला होईल. Know the Meaning of codes mentions on Car Tyres
यासाठी कारचे टायर हे कायम उत्तम क्वालिटीचे आणि योग्य असलणं गरजेचं आहे.तुम्हाला माहित आहे का कारच्या टायरवर Car Tyres असलेल्या काही आकड्यांमध्ये तसचं कोडमध्ये त्या टायरची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते.
यात टायरच्या साईडवॉलची लांबी किती आहे, टायर जास्तीत जास्त किती लोड घेऊ शकतं आणि किती स्पीड गाठू शकतं. तसचं या टायरवर तो कोणत्या सालात आणि महिन्यात तयार करण्यात आलाय याची देखील माहिती असते.
टायरच्या साइडवॉलवर काही अल्फाबेट आणि नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये एक कोड आढळतो. या कोडवरून तुम्ही टायरची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
मात्र, टायरवर असलेला कोड नेमका असा ओळखायचा किंवा दिलेल्या आकड्यांवरून आणि अल्फाबेटवरून टायरसंबधीची माहिची कशी ओळखावी, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे देखिल वाचा-
टायरचा साइज- या कोडमध्ये टायरची साइज सांगण्यात आलेली असते. समजा टायरचा नंबर P225/45 R17 91V हा कोड टायरवर लिहण्यात आला आहे. इथं सुरुवातीला P लिहिण्यात आला आहे. याचा अर्थ टायर हा पेसेंजर व्हेइकलसाठी आहे. LT लिहण्यात आलेलं टायर लहान ट्रकसाठी तयार करण्यात आलेले असतातत.
टायरची रुंदी- P लिहिण्यात आलेला आकडा २२५ ही साइडवॉल टू साइडवॉल टायरची रुंदी किती आहे हे दर्शवतं. याचाच अर्थ टायरची रुंदी २२५ मिलीमीटर इतकी आहे.
उंची- उदाहरणात घेतलेल्या कोडमध्ये P225/45 R17 91V स्लॅशनंतर असलेला नंबर म्हणजेच 45 ही टायरची उंची आहे. यातून टायरच्या साइडवॉलच्या उंचीची टक्केवारी सांगितली जाते.
याचाच अर्थ साइडवॉलची उंची टायरच्या रुंदीच्या 65 टक्के आहे. जास्त साइडवॉल असलेल्या टायरमुळे कार चालवणं अधिक आरामदायी होतं.
रेडियल- त्यानंतर येणारं R चा अर्थ रेडियल असा आहे. जर इथं B असेल तर टायर बायस प्रकाराचं असतं.
रिम साइज- R नंतर येणारा नंबर म्हणजेच १७ यावरून टायरची रिम साइज लक्षात येते. म्हणजेच हा टायर १७ इंच व्यास असलेल्या रिमसाठी तयार करण्यात आलं आहे.
टायरची भार पेलण्याची क्षमता- शेवटचे २ नंबर म्हणजे ९१ हे कारच्या टायरचं लोड इंडेक्स आहे. यावरून एक टायर किती लोड घेऊ शकतो हे कळतं. मात्र यासाठी तुम्हाला लोड इंडेक्स तपासावा लागेल.
लोड इंडेक्सनुसार टायरमवर ९१ नंबर असल्यास एक टायर जवळपास ६१५ किलो लोड घेऊ शकतो.
स्पीड- तर अगदी शेवटी असलेलं V हे अक्षर स्पीडचं चिन्ह आहे.
अशा प्रकारे तुम्ही टायरवर असलेल्या नंबर आणि अल्फाबेटच्या मदतीने टायरसंबधींची माहिती ,जाणून घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.