लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो. लग्न करून जोडीदाराबरोबर (Partner) आयुष्य काढताना एकमेकांबरोबर सुख दु:ख शेअर करत मानसिक, शारिरिक, कौटुंबिक, आर्थिक जबाबदारी शेअऱ करत संसार केला जातो. त्या संसारात (Marriage) काही अडचणी आल्याच तर मार्ग काढला जातो. नवरा-बायको(Husband-Wife) एकमेकांबरोबरच कुटुंबाचीही सक्षमपणे काळजी घेतात, पण हे चित्र गेल्या काही वर्षात खूपच बदलले आहे. लोकांचा लग्न करण्यापेक्षा एकटं राहण्याकडे कल खूपच वाढतो आहे. गेल्या १० वर्षापासून एकटं राहण्याचा ट्रेंड सुरू झाला. गेल्या ५ वर्षांत तो खूपच वाढला. पण कोरोना काळात अनेकांना एकटं राहणं योग्य आहे, असं वाटू लागलं. म्हणजेच एकटं राहण्याकडे आजची तरूणाई गंभीरपणे बघत आहेत. सिंगल राहण्याचा त्यांचा विचार का आहे? हे जाणून घेणंही गरजेचं आहे. (Why People Live single )
आम्ही राहतो सिंगल (Reasons Of Being Single)
औरंगाबादचा रोहन देशमुख म्हणतो, मी 35 वर्षांचा अविवाहित (सुखी) पुरुष असून जोडीदाराशिवाय एकटाच मस्त जगतो. लग्न संस्था चुकीची आहे या मताचा मी नाही, किंबहुना एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी ती गरजेची असेलही पण प्रत्येक व्यक्ती लग्नाच्या साच्यात खुश राहीलच याची खात्री नाही. काही लोकांना नेहमी समूहात राहायला आवडते तसे काहींना एकटे राहायला आवडते. प्रत्येक व्यक्तीच्या सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. शिवाय जगात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतांना आणि भारता सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात लग्न, मुलबाळ करून आपला कार्बन फूटप्रिंट वाढवण्यापेक्षा सिंगल राहणे व्यवहार्य वाटते.
माध्यमात काम करणारा पुण्यातला तुषार वांगळे ( नाव बदलंल आहे) आयुष्यभर एकाच महिलेसोबत सेक्स करणं मला अयोग्य वाटतं. नात्यांच्या कोणत्याच जबाबदाऱ्या मला नको आहेत. आपल्या विवाह पद्धतीबद्दल मला आक्षेप आहे. मला विवाह नको तर सहवास हवा. मग तो कोणाचाही असेल. अशा विचारसरणीच्या व्यक्तीसोबत मला नक्कीच मैत्री करायला आवडेल, असेही तो म्हणतो.
माध्यमात काम करणारी मुंबईची मधुरा नेरूरकर (नाव बदलंल आहे) म्हणते, मी स्वतः सक्षम आहे आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्या. लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं याचा मी कधीच विचार करत नाही. मी स्वतःचं घर घेतलंय.. पगारही चांगला आहे..मी स्वतःचं स्वतः पाहू शकते... तिशीपर्यंतच्या प्रवासाने, ब्रेकअपने मला भक्कम केलं. ब्रेकअपच्या डिप्रेशनमधून निघताना अनेक गोष्टी शिकले.. त्यातून कळलं की, तो समाजच असतो जो सतत म्हणत असतो की आपण एकटं राहू शकत नाही.. पण असं काही नाहीए. आता एकटं जगताना मस्त वाटतं. (Why People Live single )
पुण्यातला तेजस रानडे म्हणतो, "लग्न म्हणजे आपले अधिकार अर्ध्यानी कमी करणे आणि जबाबदाऱ्या दुप्पट करणे" हे आर्थर शोपेनहावर ह्यांचे संदर्भ सोडून घेतलेले वाक्य काही विवाहितांना बरोबरही वाटत असेल. मुळातच शिक्षण आणि नोकरी नंतरचा ओघवता टप्पा म्हणजे लग्न आणि त्यानंतर प्रजनन असे आपल्याकडे गृहीत धरलेले असते. पण काळ बदलत आहे. नवीन पिढीतल्या लोकांना लग्न आणि मुलं हे कर्तव्य नसून तो अनेक पर्यायांपैकी एक पर्याय वाटतो. काहीजणांना "वस्तूसारखी" मुलगी बघून केलेल्या पद्धतीतले sexism उमगू लागले आहे, काहींना लिव्ह इन रिलेशनशिप योग्य वाटू लागली आहे तर काही विवाहित जोडपी आता "childless" म्हणजे अपत्यरहितच्या जागी "childfree by choice" म्हणजे स्वच्छेने अपत्यमुक्त राहू लागली आहेत. मलाही एकटं राहणं जास्त चांगलं वाटंत, असंही तेजस म्हणतो.
पुण्याचा आशिष कोकणे (नाव बदललं आहे) मी लग्न केलं होतं. पण तिच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअऱ करणं मला खूपच जड गेलं. ती मैत्रीण होती तेच बरं होतं असं वाटायला लागलं. मी कुठल्या जबाबदारीत स्वत:ला अडकवून ठेवू शकत नाही, याची जाणीव झाली. तिलाही माझं म्हणणं पटलं. आम्ही घटस्फोट घेतला. मी आता कोणत्याच नात्यात नाही. एकटं राहणं मला जास्त आवडतं. (Why People Live single )
समुपदेशक काय म्हणतात? (relationship Counselor Opinion )
सिंगल राहण्याच्या ट्रेंडबाबात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि रिलेशनशीप काऊन्सिलर सलमा प्रभू म्हणाल्या की, गेल्या १० वर्षापासून एकटं राहण्याचा ट्रेंड सुरू झाला. गेल्या ५ वर्षांत तो खूपच वाढला. पण कोरोना काळात अनेकांना एकटं राहणं योग्य आहे, असं वाटू लागलं. याची अनेक कारणे आहेत.
१) मुला-मुलींना त्यांचे करिअऱ बघायचे असते. लग्न करण्याची त्यांना गरज वाटत नाही. लग्न झाल्यानंतर त्या अनुषंगाने घर चालवणे, जेवण करणे, खर्च वाढतो. एकूणच लग्नानंतर जबाबदाऱ्या अधिक वाढतात.पुढे मुलांना वाढविणे, दोघांच्याही आई-वडिलांची काळजी या गोष्टी आजच्या मुलांना जमत नाहीत. त्यांना स्वत:चे काम अधिक आवडते. जॉब सेटिस्फेक्शन त्यांच्या दृष्टीने महत्वाचे असते.
२) सुरूवातीला लग्न झाल्यानंतर शारीरिक गरज भागविता येत असे. लग्नाशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित करू नयेत, असे लोकं मानायचे. पण आता शारीरिक संबंधांना बंधन राहिलेले नाही. पर्यायाने लिव्ह इन पेक्षा लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप वाढलेले आहे.
३) दुसऱ्यांची जबाबदारी मी का घेऊ? मला माझी स्पेस प्रिय असाही एक दृष्टीकोन वाढत आहे. मला एकट्याने गोष्टी करायला आवडतात. त्या करायला वेळ हवा. अशा कितीतरी गोष्टी यात असतात.
४) मुलांपेक्षा मुलींमध्ये मोठा बदल घडतोय. लग्नाची गरज नाही. थोडा काळ एकत्र राहू, बघू जमतंय का? पण लग्न नको. असा कल मुलींचा खूप वाढतो आहे. त्यांनाही दुसऱ्यांची जबाबदारी नको वाटतेय. कोविड काळात अनेकांना एकटं राहण्याचं महत्व जास्त वाटतंय, त्यांना आजुबाजुचं दुषित वातावरण बघता आता जबाबदारी नको वाटतेय, असंही सलमा म्हणाल्या. (Why People Live single )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.