kahwa tea health benefits Esakal
लाइफस्टाइल

कॅफेन फ्री Kahwa Tea मुळे अनेक समस्या होतील दूर, जाणून घ्या या Healthy काश्मिरी चहाची रेसिपी

kahwa tea health benefits: कावा किंवा काव्हा चहा Kahwa Tea हा काश्मिरमधील Kashmir पारंपरिक चहा असून तो अत्यंत सुंगंधित आणि स्वादिष्ट असतो. मुळात हा चहा कॅफेन फ्री असल्याने त्याचे आरोग्यासाठी कोणतही नुकसान नसून अनेक फायदे आहेत

Kirti Wadkar

Kahwa tea health benefits: चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय म्हणून ओळखलं जातं. अधिकतर भारतीयांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. असे अनेक चहाप्रेमी आहेत जे दिवसातून २-३ वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहाचं Tea सेवन करतात. Know the recipe and Benefits of Kashmiri Kahwa Tea

चहा प्यायल्याने रिफ्रेश वाटतं असलं तरी जास्त चहाचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत. यासाठीच अलिकडे अनेकजण ग्रीन टी, हर्बल टी अशा चहाच्या Green Tea वेगवेगळ्या प्रकारांकडे वळू लागले आहेत. अशातच चहासाठी आणखी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे काश्मिरी कावा.

कावा किंवा काव्हा चहा Kahwa Tea हा काश्मिरमधील Kashmir पारंपरिक चहा असून तो अत्यंत सुंगंधित आणि स्वादिष्ट असतो. मुळात हा चहा कॅफेन फ्री असल्याने त्याचे आरोग्यासाठी कोणतही नुकसान नसून अनेक फायदे आहेत.

काश्मिरी कावा चहा हा विविध गरम मसाल्यांपासून तयार केला जातो. यामध्ये दालचिनी, वेलची, केसरसह विविध गरम मसाल्यांचा वापर केला जातो.

कावा चहामुळे शरीर डिटॉक्स Detox होण्यास मदत होते. तसचं यातील गरम मसाल्यांमधील गुणधर्मांमुळे आरोग्याच्या Health अनेक समस्या दूर होतात.

जर तुम्हाला चहाचं व्यसन मोडायचं असले तर चहाच्या जागी पर्यायी चहा म्हणून तुम्ही कावा चहाचा पर्याय नक्कीच निवडू शकता. यासाठीच आज आम्ही तुम्हाला कावा चहाची खास रेसिपी. तसचं या चहाचे फायदे सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

कावा चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य-

४ कप पाणी, ४-५ वेलची, १ इंच दालचिनीचा तुकडा, केशराच्या ५-६ काड्या, एक चमचा वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, ३-४ लवंग, ३-४ काळिमिरी, गुळवेलचे १-२ तुकडे, सुंठ, ग्रीन टीची पानं. साखर किंवा मध, बारीक किसलेले बदामाचे काप.

कावा चहाची कृती

  • २ कप कावा चहा तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये ४ कप पाणी टाकून गॅस सुरू करावा.

  • त्यानंतर एका खलबत्त्यामध्ये वेलची आणि दालचिनी हलकी कुटून ती पाण्यात टाकावी, त्यानंतर त्यात केसर, गुलाबाच्या पाकळ्या, ३-४ लवंग, काळिमिरी तसचं गुळवेल टाकावं.

  • त्यानंतर या चहात सुंठाचे १-२ तुकडे टाकावे. तसचं गुळवेलचे तुकडे आणि १ चमचा ग्रीन टी ची पानं टाकावी.

  • सर्व साहित्य पाण्यात टाकल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पातेल्यावर झाकणं ठेवावं.

  • आता १० मिनिटं चहा उकळू द्यावा.

  • त्यानंतर यात २ चमचे साखर टाकावी.

  • साखरेचा वापर टाळायचा असल्यास तुम्ही वरून १ चमचा मध घेऊ शकता.

  • साखर टाकून एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

  • चहा सर्व्ह करण्यासाठी कपमध्ये बारीक किसलेला बदाम किंवा बदामाचे बारीक काप टाकावे.

  • त्यानंतर गाळणीच्या मदतीने कपमध्ये चहा ओतावा.

  • अशा प्रकारे तुमचा गरम मसाल्यांच्या दरवणाऱ्या सुंगधाने तयार असलेला कावा तुम्हाला रिफ्रेश करेल.

कावा चहाचे फायदे (kahwa tea health benefits)

रोगप्रतिकार क्षमता वाढते- कावामध्ये टाकण्यात आलेल्या विविध गर मसाल्यांमधील अँटीऑक्सिडंट्स तसचं बदाममधील पोषक तत्वांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे कोणत्याही व्हायरल आजारांपासून संरक्षण होण्यासही कावा चहा फायदेशीर ठरतो.

वजन कमी होण्यासाठी- वजन कमी करण्यासाठी चहाला एक योग्य पर्याय म्हणून कावा फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसचं चयापचय क्रिया जलद झाल्याने देखील वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते- कावा किंवा काव्हाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. योग्य पचन होवून शरीरातील विषारी पदार्थ Toxic Substances बाहेर टाकण्यास म्हणजेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी कावाचं सेवन उपयुक्त ठरतं. तसचं पोटातील बॅक्टेरियल इंफेक्शन बरं करण्यासाठी हा चहा गुणकारी आहे.

हे देखिल वाचा-

निरोगी त्वचेसाठी- कावा चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रमाणा जास्त असल्याने याचा त्वचेला देखील फायदा होतो. या चहाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. तसचं त्वचा ड्राय होत नाही.

ताण कमी होतो- कावा चहाचा मोहक सुगंध आणि चव यामुळे मूड ताजा होण्यास मदत होते. यामुळे मेंदूला Brain आवश्यक पोषक तत्व मिळतात. यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. तसचं नेहमीच्या चहा प्रमाणेच कावाच्या सेवनामुळे देखील रिफ्रेश होण्यास मदत होते.

त्यामुळे कॅफेन फ्री अशा कावाचा तुम्ही पर्यायी चहा म्हणून दिनचर्येत समावेश करू शकता. मात्र या चहामध्ये गरम मसाले असल्याने दिवसातून एकदाच या चहाचं सेवन करावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT