सुरक्षित कार Esakal
लाइफस्टाइल

Safe Cars- या गाड्यांमध्ये मिळेल तुम्हाला चांगली सुरक्षा

त्याचप्रमाणे कार निर्माते देखील कारमध्ये अधिक अधिक सेफ्टी फिचर Car Safety Features देण्याचा प्रयत्न करत आहेत. कार खरेदी करताना सेफ्टीच्या दृष्टीने चांगली असलेली कार अनेकांना खरेदी करायची असते. मात्र बाजारातमध्ये असलेल्या कारमधून नेमकी कोणती कार Car निवडावी असा प्रश्न अनेकांना पडतो

Kirti Wadkar

कार खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे कारची सेफ्टी. अनेकजण कार कशी दिसते, तिचे लूकस् कसे यापेक्षा कारचे सेफ्टी Car Safety म्हणजेच सुरक्षितता महत्वाची असते. भारतात सध्या वाहनाच्या सुरक्षिततेच्या नियमांमध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. Know the Safest cars which are available in India

त्याचप्रमाणे कार निर्माते देखील कारमध्ये अधिक अधिक सेफ्टी फिचर Car Safety Features देण्याचा प्रयत्न करत आहेत. कार खरेदी करताना सेफ्टीच्या दृष्टीने चांगली असलेली कार अनेकांना खरेदी करायची असते. मात्र बाजारातमध्ये असलेल्या कारमधून नेमकी कोणती कार Car निवडावी असा प्रश्न अनेकांना पडतो.

यासाठीच आम्ही तुम्हाला सध्या भारतातील टॉप १० सुरक्षित कारचे पर्याय सांगणार आहोत.

भारतामध्ये सध्याच्या घडीला फॉक्सवॅगन, महिंद्रा आणि टाटा अशा कंपन्यांच्या विविध कार उपलब्ध आहेत ज्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.

Volkswagen Virtus- या कारला सेफ्टीच्या बाबतीत NCAPकडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलेलं आहे. ही एक प्रिमियम सेडान कार असून ही कार डायनॅमिक लाइन (कम्फर्टलाइन, टॉपलाइन आणि हायलाइन) आणि परफॉर्मन्स लाइन (जीटी प्लस) या दोन व्हेरिटंयमध्ये उपलब्ध आहे. भारतात या कारची एक्स शोरुम किंमत ११.४७ लाख ते १८.७७ लाख इतकी आहे.

Skoda Slavia- स्कोडाच्या स्लाविया कारला देखील NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. स्कोडा स्लाविया अॅक्टिव, अॅम्बिशन, अॅम्बिशन प्लस आणि स्टाइल या चार वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पॅसेंजर सेफ्टीसाठी या कारमध्ये ६ एअर बॅग्स देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत या कारमध्ये आइएसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि रियर पार्किंग सेन्सर्स देण्यात आले आहेत.

Volkswagen Taigun - फॉक्सवेगन टायगुन ही देखील सेफ्टीच्या दृष्टीने एक उत्तम कार आहे. या कारला देखील ५ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलं आहे. ही एक ५ सीटर कार असून यात ६ एयर बॅग्स देण्यात आल्या आहेत. तसंच सेफ्टी फिचर्समध्ये यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट-असिस्ट असे काही खास फिचर्स पाहायला मिळतात. या कारची एक्स शोरुम किंमत ११.६१ लाख इतकी आहे.

Skoda Kushaq - स्कोडाने नुकतंच कुशकचं नवं लिमिटेड एडिशन लॉन्च केलं आहे. या कारला देखील Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. कुशक ही एक कॉम्पेक्ट SUV असून या कारची किंमंत ११.५९ ते १९.६९ अशी वेरिंयट नुसार आहे.

Skoda Kushaq मध्ये ६ Air Bags आणि बीएस सह ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) तसंच रियर व्ह्यू कॅमेरासारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

हे देखिल वाचा-

Mahindra Scorpio N - महिंद्रा स्कॉर्पियो ही भारतातील सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम अशी ओळखली जाणारी कार आहे. गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आलेल्या महिंद्रा Scorpio N ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. ही कार देखील ४ वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये मल्टीपल एयर बॅग्स देण्यात आल्या आहेत.

तसंच महिंद्रा स्कॉर्पिओ एनमध्ये रियर पार्किंग कॅमेरा, हिल असिस्ट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल असे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. या कारच्या बेसिक मॉडलची एक्स शोरुम किंमत ही १२.७४ लाख इतकी आहे.

या ५ कार सोबतच बेस्ट सेफ कारमध्ये महिंद्राच्या XUV300 आणि Mahindra XUV700 या कारचा देखील समावेश आहे.

तसंच टाटाच्या Punch, Altroz आणि Nexon या तीन कारला देखील Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने बेस्ट कार पाहत असाल तर हे काही पर्याय तुम्ही निवडू शकता.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT