Contraceptive Pills sakal
लाइफस्टाइल

Contraceptive Pills: प्रेग्नन्सी टाळण्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स घेताय? मग या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्या

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात.

Aishwarya Musale

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. या गोळ्यांचे अनेक प्रकार आहेत. पण जर तुम्ही या गोळ्या पहिल्यांदा घेत असाल किंवा घेतल्यानंतरही तुम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती नसेल, तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. या गोळ्या घेतल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डिप्रेशन

गर्भनिरोधक गोळ्या सतत खाल्ल्याने मानसिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्समध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागतो. यामुळे तुमचा मूड खराब राहतो.

मूड खराब असणे

बर्‍याच वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने मूड खराब होतो. त्यामुळे चिडचिड, टेन्शन, प्रत्येक मुद्द्यावर राग येणे, ताणतणाव इत्यादी प्रकार घडू लागतात. यामुळे भावनिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. या प्रकरणात, डॉक्टरांशी बोला.

कामवासना

जेव्हा तुम्ही खूप गर्भनिरोधक गोळ्या खातात तेव्हा त्यामुळे कामवासना कमी होऊ शकते. या दरम्यान तुम्हाला सेक्समध्ये रस कमी होतो. म्हणूनच या गोळ्या जास्त घेणे टाळावे.

रक्ताची गुठळी

एका अहवालानुसार, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढतो. जर तुम्हाला रक्त गोठण्याची लक्षणे दिसली तर नक्कीच डॉक्टरांशी बोला.

वजन वाढणे

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढू शकते, असेही मानले जाते.

पीरियड्स मिस होते

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने हलकी पाळी येऊ शकते. याशिवाय पीरियड्सही मिस होऊ शकतात. यामुळे तुमची मासिक पाळी देखील विस्कळीत होऊ शकते.

मळमळ

बर्थ कंट्रोल टॅबलेट घेत असताना तुम्हाला मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मेट्रोचा दरवाजा उघडला अन् बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पोलिसांनी चोप-चोप चोपलं, काय घडलं असं नेमकं ?

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या CEC बैठकीसाठी AICC मुख्यालयात दाखल

CID Teaser: ठरलं! CID चा दुसरा सीझन येणार; टीझरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांना ओळखलंत का?

IPL 2025 Auction: LSG फ्रँचायझी नाही, तर केएल राहुलच रिटेन्शनची ऑफर नाकारणार? नवे अपडेट्स आले समोर

SCROLL FOR NEXT