Kojagari Pornima 2023 : शरद पौर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा असेही म्हणतात. दिवाळीच्या आधी येणारी कोजागिरी पौर्णिमा ही आज साजरी केली जाणार आहे. ही पोर्णिमा थोडी स्पेशल असणार आहे कारण, या पौर्णिमेच्या दिवशीच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे.
ही पौर्णिमा सर्व बारा पौर्णिमांमध्ये श्रेष्ठ मानली जाते. पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्ण महारसांची निर्मिती सुरू करतात. पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.
काही लोकांच्या कुंडलीत दोष असतात. त्यात चंद्र दोषही असतो. चंद्रदोषाचा थेट आपल्या आरोग्यावर आणि प्रगतीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यासाठी काही खास उपाय करणे गरजेचे असते. चंद्र दोषातून मुक्ती व्हावी यासाठी अनेक उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत.
आज असलेली कोजागरी पौर्णिमा तुम्हाला चंद्रदोषातून मुक्ती मिळवून देणारी असणार आहे. त्यामुळे तुम्हीही घरीच हे उपाय करू शकता.
चंद्रदोष काय आहे?
जोतिष्य शास्त्रामध्ये 9 प्रमुख ग्रह मानले गेले आहेत. या ग्रहांच्या स्थितीनुसार मनुष्याची कुंडली ठरवली जाते. कुंडलीत प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. कुंडलीतील शुभ ग्रह माणसाला प्रगतीकडे घेऊन जातात, तर अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनात अनेक अडचणी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्र व्यक्तीची मानसिक स्थिती दर्शवतो.
कुंडलीत चंद्र जर शुभ ग्रह आणि शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे मानसिक बल आणि संतुलन चांगले राहते. जर कुंडलीतील चंद्र दोष असेल तर त्याला अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र दोषाचा प्रभाव काय असतो आणि त्याचे उपाय काय आहेत हे जाणून घेऊया.
कुंडलीत चंद्र दोष असेल तर कसे ओळखावे
जेव्हा कुंडलीत चंद्र दोष असतो. तेव्हा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर सर्वात आधी परिणाम होतो. यासोबतच माणसाच्या स्वभावात आणि वागण्यात बदल होऊ लागतात. छोट्या गोष्टींवरूनही व्यक्तीला काळजी, चिंता,नैराश्य वाटू लागते.
निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या दोषाचा आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. चंद्रदोष असेल प्रभावित व्यक्तीला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे रक्तदाबाशी संबंधित समस्या सुरू होतात. याशिवाय स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.
चंद्रदोषापासून मुक्तीसाठीचे उपाय
मंत्राचा जप
कुंडलीत चंद्रदोष असेल, महादशा, अंतरदशा किंवा प्रत्यंतरदशा चालू असेल किंवा चंद्र सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल. तर अशा लोकांनी आज चंद्राची पूजा करून मोत्याच्या माळेने ओम सोम मंत्राचा जप करावा.
आरोग्याच्या समस्या
ज्यांना रक्तदाब, पोट किंवा हृदयाशी संबंधित आजार, खोकला, सर्दी किंवा डोळ्यांशी संबंधित आजार आहेत त्यांनी या दिवशी चंद्राची पूजा केल्याने या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.
विद्यार्थांनी मन एकाग्रतेसाठी काय करावं?
ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नाही ते चंद्रयंत्र धारण करून परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये चांगले गुण मिळवू शकतात. या पौर्णिमेमध्ये सर्व प्रकारचे ऋण, रोग आणि दारिद्र्य यांपासून मुक्ती देण्याची शक्ती आहे.
माता लक्ष्मीचे आज घरी स्वागत करा
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी महालक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन होते. ती घरोघरी जाऊन सर्वांना आशीर्वाद देते, पण जे दार बंद करून झोपले आहेत त्यांच्या दारातून लक्ष्मीजी परत जातात. शास्त्रात याला कोजागर व्रत असेही म्हणतात. या दिवसाच्या लक्ष्मीपूजनामुळे सर्व ऋणातून मुक्ती मिळते.
म्हणूनच याला कर्जमुक्ती पौर्णिमा असेही म्हणतात. या रात्री श्री सूक्ताचे पठण, कनकधारा स्तोत्र, विष्णु सहस्त्र नामाचा जप आणि श्रीकृष्णांच्या मधुराष्टकाचे पठण केल्याने इच्छित कार्य सिद्धीस जाते. भक्ताला श्रीकृष्णाचा सहवास प्राप्त होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.