Kojagiri Festival 2024: Sakal
लाइफस्टाइल

Kojagiri Festival 2024: कोजागरीच्या चांदण्यांत दूध प्राशन आरोग्यदायी

Kojagiri Festival 2024: चंद्र येतो पृथ्वीच्या अत्यंत जवळ, जागरणाला विशेष महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

Kojagiri Festival 2024: टिपूर चांदणं दिसतं ते आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला. याच पौर्णिमेला कोजागरी किंवा शरद पौर्णिमा म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला खूप महत्त्वाचे मानले. म्हणून आश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध प्राशनाला महत्त्व आहे. या रात्री कोजागरी व्रत आणि कौमुदी व्रत करण्यात येते.

कोजागरी पौर्णिमेला रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवून त्यात केशर आदी मसाला घालून ग्रहण करण्याला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. या रात्रीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले, ‘‘कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरिता लाभदायक असल्याने अनेक प्रकारच्या वनौषधी या चंद्र प्रकाशाच्या किरणाने सिद्ध होतात.

या रात्री दूध सेवन करतात. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्त्व असतं हे तत्त्व चंद्राच्या किरणांमधून अधिक मात्रेत शक्ती खेचण्याचे काम करते. यामुळेच पूर्वीपासून ऋषिमुनींनी दूध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगितले आहे. या रात्री महालक्ष्मी आकाशातून भ्रमण करते आणि ‘कोजागरती’ अर्थात कोण जागरण करत आहे हे पाहते. जागरण करणाऱ्यावर प्रसन्न होते. त्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो म्हणूनदेखील या दिवशी जागरण करण्याचे विशेष महत्त्व आहे.’’

मध्यरात्रीच करा कोजागरी साजरी

पांडव गुरुजी म्हणाले, या पुण्य पर्वकाळात मेरू श्री यंत्राची घरी, व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना करून विशिष्ट प्रकारे उपासना करावी. मध्यरात्री बाराच्या सुमारास इंद्र लक्ष्मी आणि चंद्राचे पूजन करून औक्षण करावे. चंद्राचे त्या दुधामध्ये प्रतिबिंब पाहून पूजन करून नमस्कार करावा व ते दूध सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे. या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा कमळ गट्टा माळेने १०८ वेळेस जप करावा. बुधवारी (ता. १६ ) संध्याकाळी ८ः४१ मिनिटानंतर पौर्णिमा पर्वकाळ सुरू होत असून, तो गुरुवारी (ता. १७) ४:५६ मिनिटांनी संपत आहे. मध्यरात्रीला पौर्णिमा १६ तारखेला असल्यामुळे १६ तारखेलाच कोजागरी पौर्णिमा साजरी करावी, असे पांडव गुरुजी यांनी सांगितले.

शहरात ५० हजार लिटर दुधाची मागणी

कोजागरी पौर्णिमेला मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे. शहरात जवळपास ५० हजार लिटर दुधाची मागणी आहे. यादिवशी मसाला दूध बनवले जाते. मसाला दूध बनवून सुरांच्या मैफलीत तर काही ठिकाणी गरबा खेळून कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. शहरात जवळपास ५० हजार लिटर दुधाची मागणी आहे. कोजागरीनिमित्त वेगवेगळ्या दूध डेअऱ्यांवर तसेच खासगी विक्रेत्यांकडे नागरिकांनी दुधाची बुकिंग करून ठेवली असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार, बदनामीची भीती दाखवून उकळले १ कोटी

Vivek Kolhe : कोल्हेंच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब, अमित शहांची दिल्लीत भेट : पक्ष न सोडण्याचे संकेत

Guru Pushyamrut 2024: धनत्रयोदशीपूर्वी आज गुरूपुष्यामृतचा शुभ योग, केलेल्या कामाचे मिळेल चांगले फळ

Success Story: सीएची नोकरी सोडली; आईसोबत सुरु केला व्यवसाय, वर्षाला कमावतोय 50 लाख रुपये

IND vs NZ, Pune Test: गौतम गंभीर काल म्हणालेला KL Rahul च्या पाठिशी अन् आज बिचाऱ्याला पाणी आणायला ठेवलं

SCROLL FOR NEXT