Kolhapuri Chappal esakal
लाइफस्टाइल

April Fools' Day : कोल्हापुरी चप्पलच्या बाबतील तुम्हाला कोणी एप्रिल फुल तर करत नाही ना? असे ओळखा अस्सल कोल्हापुरी!

कोल्हापुरीच्या नावाखाली एप्रिल फुल बनू नका, खरं पायतान कसं ओळखायचं? वाचा

सकाळ डिजिटल टीम

आजकाल एखादे लग्न यात्रा, उत्सव किंवा कॉलेजचा ट्रॅडिशनल डे असो प्रत्येकजण रूबाब मारताना दिसतो तो म्हणजे कोल्हापुरी पायतानाचा. पांढरा शर्ट, डोक्यावर फेटा, हातात फट् फट् आवाज करणारी बुलेट. अन् पायात कर- कर वाजणारी कोल्हापुरी चप्पल.

तरुणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर हा ट्रेण्ड दिसून येतोय. यामध्ये मुलींचाही सहभाग कमी नाही. कोल्हापूरची रांगडी भाषा, इथली खाद्यसंस्कृती, लोककला यांच्याबरोबर कोल्हापूरी चपलेला देखील जगभरात मानाचे स्थान असल्याचे दिसते.

पुण्याच्या माणसाची ओळख जशी भाषेवरून होते, अगदी तसेच कोल्हापुरी चप्पल घातलेला कोल्हापूरी मराठी माणूस असे समीकरणच पडलं आहे.

कोल्हापुरी साज आणि बाज काही औरच आहे. कोल्हापुरी चपला असे नाव पडण्याचे कारण कोल्हापुरची भौगोलिक, राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी होय. चारही दिशांना जोडणारी मोठी व्यापारी केंद्रे, नवनवीन तंत्रज्ञान स्विकारून उद्योगास चालना देणारे नवीन उद्योजक, सहकार क्षेत्राची मोठी परंपरा याचबरोबर गुळाची मोठी व्यापारपेठ या करवीर नगरीला लाभली आहे.

करवीरच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराबाई तसेच ऐन स्वातंत्र्याच्या काळात शाहू महाराजांची कारकिर्द पाहीली आहे. अखंड सांस्कृतिक परंपरा असलेल्या कोल्हापूरची जगभरात वेगळी ओळख आहे.हा कोल्हापुरी पायताणाचा समृद्ध वारसा अनेक वर्षांचा आहे.

पहिले कोल्हापुरी चप्पल १३ शतकात उदयास आले. ते अति जाड चामड्याचे होते. त्यानंतर १९२० साली सोदाग्र कुटूंबाने नवीन पद्धतीच्या चपला तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला. त्याची ओळख कोल्हापुरी चप्पल अशी झाली.

तसे पाहता आदीमानवाच्या काळात चामड्याचे कपडे वापरले जायचे. पायाला प्राण्यांचीच कातडी गुंडाळली जायची. पण,  नंतरच्या काळात चामड्याचे चप्पल आले. त्यातही पुणेरी जोडा प्रसिद्ध होता पण आता तो नामशेष झाला. कोल्हापुरी आणि जयपुरी चढाव या आपल्या पुर्वीच्याच स्थानात टिकून आहेत.

कोल्हापूरच्या संस्थान काळात राजर्षी शाहु राजांनी अनेक जंगली प्राणी पाळले होते. यावेळी जनावरासाठी तुरे, चामड्याचे तुरे, खोगीर रिकाँबी पट्टे, चढाव, म्यान, चाबुक, गळपट्टे तसेच सैनिकांच्या गणवेशासाठी कमरपट्टे अशा अनेक प्रकारच्या चर्मवस्तू लागायच्या.

त्या वस्तू बनवण्यासाठी राजवाडयात अनेक कुशल चर्मकार कारागार उपस्थित असत. छत्रपती शाहू महाराजांची शरीरयष्टी बलाढ्य अशी असल्याने त्यांच्यासाठीचे चप्पल भक्कम जोडणीचे व बारीक नक्षीकाम केलेले आणि करा- करा वाजणारे असेच होते. राजर्षी शाहूराजांच्या चपलेसारखेच चप्पल बनवून घेण्याचीही सध्या तरुणाईमध्ये दिसते.

कोल्हापुरी चपलाची अनेक नावे आहेत. त्यात खास कापशी, पुडा मोरकी, पुडा पंचिक, पुडा अधणी, गांधीवादी अशी नावे आहेत. दिसायला आकर्षक आणि सुंदर बारिक नक्षीकाम असलेली हे चप्पल आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. शरिरातील उष्णता शोषून घेऊन ते शरिराला गारवा देतात.

सध्या एक व्यवसाय म्हणून चपलेकडे पाहताना त्यात अनेक समस्या भेडसावत आहेत. कोल्हापुरात चामड्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे बाहेरून चामड्याची आयात करावी लागते. सध्या कोलापूरात चैन्नई, मदभावी, अथनी, मिरज येथून चामडे आपले जाते. कोल्हापूरात एकूण ३५० चपलांची दुकाने आहेत. कोल्हापुरात शिवाजी चौकात असणारी चप्पल लाईन प्रसिद्ध आहे.

कोल्हापुरचे चर्मकार बांधव घरोघरी ऑर्डरप्रमाणे काम करतात आढळतात तसेच सुभाषनगर परिसरात चपलांचे कारखानेही आहेत. कच्या मालाचा अपुरा पुरवठा चामड्याचे वाढलेले दर, भांडवलासह प्रशिक्षणाचा अभाव, कारागिराची रोडावत चाललेली संख्या, अशा विविध कारणांनी हा व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे.

या सर्वाबरोबरच परगुती व्यावसायिकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे आताच्या तरुण पिढीने या परंपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना अशी परिस्थिती चर्मकार कारागीर, व्यावसायिक व विक्रेत्यांची झाली आहे. घरगुती कारागिरांमध्ये चपलांसाठी लागणारे नाजुक नक्षीकाम महिलावर्ग करतो. त्यामुळे तरुण नसले तरी महिला मात्र अजुनही याकडे आपले रोजचे काम म्हणून पाहतात.

कोल्हापूरी चपलेल्या पेटंटचा मुद्दा अद्यापही संपलेला नाही महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्याठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळोखे यांनी या पेटंटसाठी बरेच प्रयत्न केलेत. पण अद्यापी पेटंट कोल्हापुरला मिळालेले नाही. असे असले तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका लघुपटात कोल्हापूरी चपलेचा सहभाग झाला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. कराकरा वाजणारं, व्यक्तीमत्वाचा रुबाब वाढविणारं, उष्णतेपासून बचाव करणार, जाडजूड असूनही बारीक नक्षीकामाचं वेगळेपण दर्शविणारं कोल्हापुरी चप्पल अनेकांच्या व्यक्तीमत्वाची शान आहे.

कोल्हापुरी चप्पलचा रुबाब लहानगी पोरं पण करत्यात

कसे ओळखायचे अस्सल कोल्हापुरी चप्पल

जुन्या कराराच्या कौशल्यावरच कोल्हापुरी चपलेची शान तरली आहे. विदेशातही कोल्हापुरी चपलेची प्रदर्शने भरविली जातात. कोल्हापूरी चपलेची वैशिट्ये पाहताना एक बाब लक्षात येते की, त्यावरील काम हे नाजूक असते. तर त्या चपला टिकायला मजबूत असतात. या चपला इतर चपलांसारखे उंचवट्याच्या नसतात. कोल्हापुरी चपलेच्या मधोमध एक पट्टी व अंगठा असतो. त्याचा पृष्ठभाग चामड्याचा असतो. तर, तळ लाकडी असतो.

कोल्हापूरी चपलेच्या मध्यमाभगी एक नक्षीदार गोंडा असलेली पट्टी व अंगठा, अंगठ्याच्या बाजूला पट्टीपासून जोडलेल्या दोन वेण्या अशा स्वरुपाच्या या चपला चॉकलेटी, केशरी, पांढरा, सोनेरी अशा रंगामध्ये उपलब्ध आहेत. यांच्या किमती २५० पासून ५००० ते ७००० पर्यंत आहेत.

तरुणांसाठी जसा राजेशाही थाट असलेल्या चपला मिळतात तशाच तरुणीसाठी आकर्षक मोजडया, पायताण, जुती व गोंडे, लेस, टिकल्या लावून आकर्षक दिसतील अशा स्वरुपाच्या मोजड्या आणि कोल्हापुरी चपलाही उपलब्ध आहेत. उंच टाचेच्या चपलांची (हिल्सची) क्रेझ आहे. त्यामुळे पारंपारिकतेची झालर टिकवून थोडा मोडर्न लूक तरुणींच्या चपलांना दिलेला, आढळतो. तरुणीमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा चपलांची मागणी आहे.

करवीरनगरीला आई अंबाबाईचा वरदहस्त लाभला आहे. पन्हाळगड पांडवलेणी, पश्चिम घाट असा ऐतिहासिक ठेवा कोल्हापूरकडे आहे. त्यामुळे इथे देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकही मोठया प्रमाणावर सहभागी होत असतात. उन्हाळी व हिवाळी सुट्टी पर्यटकांनी खचखचुन भरलेल कोल्हापूर पहायला मिळतं. याचा फायदा कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. त्यामूळे कोल्हापुरी चपलेची महती जगभर पसरली आहे.

जुन्या कलाकारांच्या कौशल्यावरच कोल्हापुरी चपलेची शान तरली आहे. विदेशातही कोल्हापुरी चपलेची प्रदर्शने भरविली जातात. कोल्हापूरी चपलेची वैशिट्ये पाहताना एक बाब लक्षात येते की, त्यावरील काम हे नाजूक असते. तर त्या चपला टिकायला मजबूत असतात. या चपला इतर चपलांसारखे उंचवट्याच्या नसतात. कोल्हापुरी चपलेच्या मधोमध एक पट्टी व अंगठा असतो. त्याचा पृष्ठभाग चामड्याचा असतो. तर, तळ लाकडी असतो.

कोल्हापूरी चपलेच्या मध्यमाभगी एक नक्षीदार गोंडा असलेली पट्टी व अंगठा, अंगठ्याच्या बाजूला पट्टीपासून जोडलेल्या दोन वेण्या अशा स्वरुपाच्या या चपला चॉकलेटी, केशरी, पांढरा, सोनेरी अशा रंगामध्ये उपलब्ध आहेत. यांच्या किमती २५० पासून ५००० ते ७००० पर्यंत आहेत.

तरुणांसाठी जसा राजेशाही थाट असलेल्या चपला मिळतात तशाच तरुणीसाठी आकर्षक मोजडया, पायताण, जुती व गोंडे, लेस, टिकल्या लावून आकर्षक दिसतील अशा स्वरुपाच्या मोजड्या आणि कोल्हापुरी चपलाही उपलब्ध आहेत. उंच टाचेच्या चपलांची (हिल्सची) क्रेझ आहे. त्यामुळे पारंपारिकतेची झालर टिकवून थोडा मोडर्न लूक तरुणींच्या चपलांना दिलेला, आढळतो. तरुणीमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा चपलांची मागणी आहे.

करवीरनगरीला आई अंबाबाईचा वरदहस्त लाभला आहे. पन्हाळगड पांडवलेणी, पश्चिम घाट असा ऐतिहासिक ठेवा कोल्हापूरकडे आहे. त्यामुळे इथे देशातील पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकही मोठया प्रमाणावर सहभागी होत असतात. उन्हाळी व हिवाळी सुट्टी पर्यटकांनी खचखचुन भरलेल कोल्हापूर पहायला मिळतं. याचा फायदा कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. त्यामूळे कोल्हापुरी चपलेची महती जगभर पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT